Insurance By ATM Card:- आज-काल जर तुम्ही कुठल्याही बँकेमध्ये खाते उघडले तर तुम्हाला बँकेकडून मिळणाऱ्या किटसोबत एटीएम कार्ड म्हणजे डेबिट कार्ड देखील मिळते. आता एटीएम कार्ड म्हटले म्हणजे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की एटीएम मधून पैसे काढण्यासाठी या कार्डचा वापर केला जातो. एखाद्या शॉपिंगसाठी आपण कुठे गेलोत किंवा हॉटेल, रेस्टॉरंट किंवा पेट्रोल पंप वर पेट्रोल किंवा डिझेल भरण्यासाठी गेलो तर अशा ठिकाणी आपण एटीएम कार्ड स्वाईप करून समोरच्याचे पेमेंट करत असतो.
इतपर्यंत आपल्याला नक्कीच एटीएम कार्डचा उपयोग माहिती आहे. परंतु एटीएम कार्ड वर वापरकर्त्याला विमा संरक्षण देखील मिळत असते हे अजूनपर्यंत तरी कित्येक जणांना माहिती नसेल. एटीएम कार्डच्या माध्यमातून ज्या सुविधा दिल्या जातात त्यातील विमा सुरक्षा ही सुविधा खूप महत्त्वाची आहे.
परंतु माहिती नसल्यामुळे आणि बँकांच्या माध्यमातून देखील याबाबत काहीच माहिती दिली जात नसल्याने बरेच ग्राहक हे अनभिज्ञ असतात. त्यामुळे या लेखात आपण एटीएम कार्डच्या माध्यमातून किती विम्याचा फायदा व कोणाला मिळू शकतो? याबद्दलची माहिती थोडक्यात बघू.
कोणत्या बँकांच्या माध्यमातून एटीएम कार्डवर दिला जातो विमा?
यामध्ये जेव्हा बँकेकडून एटीएम कार्ड जारी केले जाते तेव्हाच ग्राहकांना अपघात विमा आणि अकाली मृत्यू विमा दिला जात असतो. यामध्ये एटीएम कार्ड नुसार अपघात आणि अकाली मृत्यू पावलेल्या व्यक्तीच्या परिवाराला वेगवेगळ्या पद्धतीचा विमा हा दिला जात असतो.
यामधील जर बँकांचा प्रमुख नियम बघितला तर 45 दिवसांपासून जर कोणत्याही राष्ट्रीयकृत किंवा गैर राष्ट्रीयकृत बँकेचे एटीएम वापरत असाल तर त्याला एटीएम कार्डच्या श्रेणीनुसार विम्याची रक्कम मिळत असते.
उदाहरणच घ्यायचे झाले तर एखाद्याकडे जर क्लासिक कार्ड असेल तर त्याला एक लाख रुपये इतके विमा संरक्षण मिळते तर प्लॅटिनम कार्ड वर दोन लाख रुपये, ऑर्डीनरी मास्टर कार्ड असेल तर त्यावर पन्नास हजार रुपये,
प्लॅटिनम मास्टर कार्ड असेल तर त्यावर पाच लाख किंवा दीड ते दोन लाखापर्यंत विमा मिळू शकतो. परंतु ज्यांच्याकडे व्हिजा कार्ड असेल त्यांना एक लाख रुपयापर्यंत विमा संरक्षण मिळते व रुपे कार्डवर देखील एक ते दोन लाख रुपयापर्यंतचा विमा मिळत असतो.
परिस्थितीनुसार कसे आहे विमा मिळण्याचे स्वरूप?
वरती जे काही एटीएम कार्ड सांगितलेले आहेत त्याचा वापर जर तुम्ही करत असाल तर तुम्हाला विमा मिळत असतो. समजा एटीएम कार्डधारकाचा जर एखाद्या अपघातात एक हात किंवा एक पाय अपंग झाला तर त्या व्यक्तीला पन्नास हजार रुपयांचा विमा दिला जातो.
त्यानुसार एखाद्याचे दोन्ही हात किंवा पायांना अपंगत्व आलेले आहे किंवा मृत्यू झाला तर कार्डनुसार त्या व्यक्तीला एक ते पाच लाख रुपये पर्यंत विमा दिला जातो. समजा एखाद्या एटीएम कार्ड धारकाचा अकाली पद्धतीने मृत्यू झाला तर त्याच्या वारसाला संबंधित बँकेच्या शाखेमध्ये विम्याच्या दाव्याकरिता अर्ज दाखल करणे गरजेचे असते व त्याकरिता एफआयआरची प्रत, केलेल्या उपचाराचे प्रमाणपत्र आणि इतर बँक सांगेल ते कागदपत्रे जमा करणे गरजेचे असते.
अशा पद्धतीने काही दिवसांनी मृत झालेल्या कुटुंबियांच्या बँक खात्यामध्ये या विम्याची रक्कम येते. यामध्ये जर एटीएम कार्डधारकाचा मृत्यू झाला तर त्याचे मृत्यू प्रमाणपत्र तसेच एफआयआर प्रत, त्या व्यक्तीवर असलेल्या आश्रित म्हणजेच अवलंबून असणाऱ्यांचे प्रमाणपत्र तसेच मृत व्यक्तीचे आवश्यक प्रमाणपत्राच्या मूळ प्रति बँकेला सादर करावे लागतात व या सगळ्या प्रक्रियेनंतर तुम्हाला विमा मिळत असतो.