Electric Tractor : भारताचा पहिला स्वदेशी इलेक्ट्रिक ट्रॅक्टर लॉन्च! अल्पभूधारक शेतकऱ्यांना होईल फायदा

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Electric Tractor :- जर सध्या आपण डिझेल आणि पेट्रोलचे दर पाहिले तर ते अतिउच्च पातळीवर पोहोचल्यामुळे साहजिकच डिझेल आणि पेट्रोलचा वापर परवडणे शक्य नाही. साहजिकच डिझेलचे दर वाढले तर ट्रॅक्टरचा शेतात वापर करताना त्याचा खर्च वाढणार हे निश्चित असते. त्यामुळे उत्पादन खर्चात देखील वाढ होते. याच सगळ्या पार्श्वभूमीवर आता इलेक्ट्रिक वाहनांच्या निर्मितीला पेव फुटले असून इलेक्ट्रॉनिक्स कार आणि बाईक निर्मितीकडे कंपन्यांचा कल वाढला असून ग्राहक देखील मोठ्या प्रमाणावर इलेक्ट्रिक वाहनांच्या वापराकडे वळले आहेत.

याच पार्श्वभूमीवर आता भारतीय ट्रॅक्टर उद्योगांनी देखील उत्पादनक्षमता आणि तंत्रज्ञानाच्या बाबतीमध्ये गेल्या  काही दशकांपासून उत्तम प्रगती केले असून त्या जोरावर आता सीएसआयआर- सीएमईआरआय यांच्या विविध श्रेणी आणि क्षमतेचे ट्रॅक्टरचे डिझाईन आणि विकासामध्ये मोठा वाटा आहे.

यांचा ट्रॅक्टर निर्मितीचा प्रवास पाहिला तर हा साधारणपणे 1965 मध्ये स्वदेशी विकसित करण्यात आलेले स्वराज ट्रॅक्टर पासून सुरू होतो व त्यांनी त्यानंतर 2000 मध्ये 35 एचपी चे सोनालीका ट्रॅक्टर आणि 2009 मध्ये 12 एचपी शक्ती असलेले लघु डीजल ट्रॅक्टर लहान व अल्पभूधारक शेतकऱ्यांच्या मागणीनुसार तयार केले. याही पुढे जात सीएमईआरआयने ट्रॅक्टर निर्मितीमध्ये प्रगत तंत्रज्ञानाचा वापरासह काम करण्यास सुरुवात केली व यामुळे आता ई ट्रॅक्टरचा विकास झाला आहे.

 अल्पभूधारक शेतकऱ्यांना आहे इलेक्ट्रॉनिक ट्रॅक्टरची गरज

सी एस आय आर आणि सीएमईआरआयने सीएसआयआर प्रायमा ईटी 11 नावाचा कॉम्पॅक्ट इलेक्ट्रिक ट्रॅक्टर तयार केला असून हा प्रामुख्याने भारतातील लहान आणि सीमांत शेतकऱ्यांच्या ज्या काही गरज आहेत त्या पूर्ण करण्यासाठी खास करून स्वदेशी डिझाईन आणि स्वदेशी तंत्रज्ञानाने विकसित केला आहे.

 काय आहेत या इलेक्ट्रिक ट्रॅक्टरची वैशिष्ट्ये?

1- या इलेक्ट्रिक ट्रॅक्टरचा मुख्य उद्देश कृषी क्षेत्रातील वापराच्या मागणीची पूर्तता करणे हा आहे. त्यामुळेच हे ट्रॅक्टर अशाप्रकारे डिझाईन केले आहे की त्याची कुशलता, ट्रान्समिशन एंगेजमेंट व लिव्हर तसेच पॅडल पोझिशन या सर्व गोष्टी अत्यंत चांगल्या पद्धतीने डिझाईन करण्यात आले असून शेतकऱ्यांची गरज लक्षात घेऊन सगळ्या पद्धतीची या ट्रॅक्टरची डिझाईन करण्यात आली आहे.

2- विशेष म्हणजे हे ट्रॅक्टर महिलांसाठी अनुकूल असे बनवण्यात आले असून त्याकरिता यामध्ये विकसित तंत्रज्ञान वापरण्यात आली आहे. महिला या ट्रॅक्टरला सहजपणे ऑपरेट करू शकतील अशा पद्धतीचे सर्व प्रकारचे लिव्हर आणि स्विच या मध्ये ठेवण्यात आले आहे.

3- शेतकरी बंधू घरातील जे काही पारंपारिक घरगुती चार्जिंग सॉकेट चा वापर करून सात ते आठ तासांमध्ये हे ट्रॅक्टर संपूर्णपणे चार्ज करू शकतात व या चार्जिंग वर ते चार तासांपेक्षा जास्त वेळ ट्रॅक्टर शेतामध्ये चालू शकतात. शेती सोडून इतर कामासाठी हे ट्रॅक्टर चालवायचे असेल तर चार्जिंग वर सात तासांपेक्षा जास्त काळ हे ट्रॅक्टर चालू शकते.

भारतातील शेतकऱ्यांचा विचार केला तर सामान्यपणे सकाळपासून दुपारी 11 ते 12:00 वाजेपर्यंत काम करतात व दुपारनंतर संध्याकाळपर्यंत विश्रांती घेतात. या कालावधीमध्ये हे ट्रॅक्टर व्यवस्थित चार्ज करून तुम्हाला पुन्हा दुपारनंतर ते शेतातील कामासाठी वापरता येणे शक्य आहे.

4- तसेच हे ट्रॅक्टरची वजन उचलण्याची क्षमता ही 500 किलो व त्यापेक्षा जास्त क्षमतेच्या  असून सुसज्ज असे ट्रॅक्टर आहे. शेतामध्ये कामासाठीच नव्हे तर वाहतुकीसाठी देखील हे ट्रॅक्टर खूप महत्त्वपूर्ण असे आहे. हे ट्रॅक्टर 1.8 टन क्षमतेची ट्रॉली जास्तीत जास्त 25 किलोमीटर प्रति तास वेगाने ओढू शकते.

5- तसेच आवश्यक असणारे कव्हर्स आणि गाईड त्याच्यामध्ये देण्यात आलेले असल्यामुळे ते चिखल आणि पाण्यापासून देखील स्वतःचे संरक्षण करण्यासाठी सक्षम आहे.

6- या ट्रॅक्टरमध्ये आत्याधुनिक स्वरूपाची लिथियम आयन बॅटरी चा वापर करण्यात आलेल्या असून शेती वापरासाठी लवकर डिस्चार्ज न होणारी ही बॅटरी असून शेतकऱ्यांसाठी खूप उपयुक्त आहे.

7- यामध्ये V2L नावाचे पोर्ट म्हणजेच लोड करण्यासाठी वाहन याचा अर्थ ट्रॅक्टर चालू नसताना याची बॅटरी ऊर्जा पंपिंग आणि सिंचन इत्यादी इतर दुय्यम कामांसाठी देखील वापरली जाऊ शकते.