EMI Reduce Tips: ‘या’ गोष्टी केल्या तर गृहकर्जाचा हप्ता करू शकतात कमी! महिन्याचा आर्थिक बोजा होईल कमी

Ajay Patil
Published:
emi reduce tips

EMI Reduce Tips:- स्वतःचे घराचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी आता होम लोनचा पर्याय उपलब्ध असल्यामुळे आणि होमलोन मिळवण्याची प्रक्रिया बँकांकडून सुलभ करण्यात आल्याने सहजपणे होम लोन उपलब्ध होते. त्यामुळे बरेच व्यक्ती होम लोनचा पर्याय निवडून स्वतःचे घर खरेदी करतात.

होमलोनचा कालावधी पाहिला तर तो 15 ते 20 वर्षाचा किंवा त्यापेक्षा जास्त असतो. त्यामुळे साहजिकच आपल्याला त्या कालावधीपर्यंत या कर्जाचे हप्ते नियमितपणे फेडणे गरजेचे असते. परंतु इतक्या मोठ्या दीर्घ कालावधीपर्यंत नियमितपणे कर्जाचे हप्ते भरताना मात्र बऱ्याचदा आर्थिक नियोजन बिघडते व काही समस्यांना तोंड द्यावे लागते.

बऱ्याचदा मध्यंतरीच्या कालावधीमध्ये काही गोष्टी घडतात व त्यामुळे महिन्याला ईएमआय भरणे कठीण जाते. होम लोनचे हप्ते थकण्याची शक्यता वाढते व त्यामुळे खाते डिफॉल्ट होऊ शकते. अशा प्रसंगी जर तुम्हाला तुमच्या गृह कर्जाचा हप्त्याची रक्कम कमी करायचे असेल तर तुम्ही ती कमी करून घेऊ शकतात.

यामध्ये हप्त्याची रक्कम कमी केली तर तुमचा लोनचा कालावधी वाढतो व त्यावर तुम्हाला अधिकची व्याज देखील भरावी लागते. या अनुषंगाने आपण या लेखात होम लोनच्या मासिक हप्त्याचा बोजा कमी करण्यासाठी काय करता येईल? याबद्दलची माहिती बघू.

 हे पर्याय वापरले तर होमलोनचा हप्ता करू शकतात कमी

1- लोन ट्रान्सफर करणे यामध्ये तुम्ही लोन हस्तांतर म्हणजे ट्रान्सफर सुविधेचा फायदा मिळवू शकतात. परंतु या पर्यायांमध्ये तुमचे री पेमेंट रेकॉर्ड उत्तम असणे गरजेचे आहे. यामुळे तुम्हाला तुमच्या शिल्लक गृह कर्जाची रक्कम दुसऱ्या बँकेमध्ये ट्रान्सफर करता येईल. अशाप्रकारे तुम्ही गृहकर्जाची रक्कम दुसऱ्या बँकेत ट्रान्सफर केल्यामुळे त्या नवीन बँकेत तुम्हाला कमी व्याजदराने कर्ज मिळणे शक्य होते व ऑटोमॅटिक हप्त्याची रक्कम कमी होते.

2- लोन प्री पेमेंट यामध्ये तुम्ही होम लोन प्री पेमेंट करू शकतात. म्हणजे जेव्हा मध्यंतरीच्या कालावधीमध्ये तुमच्याकडे बऱ्यापैकी पैसा येतो अशावेळी तुम्ही प्री पेमेंट करू शकतात. कर्जाचे प्री पेमेंट केल्यामुळे  कर्जाचे हप्ते कमी व्हायला मदत होते व जेव्हा तुम्ही प्री पेमेंट करतात तेव्हा आपली कर्जाची जी काही मूळ रक्कम असते त्यामधून प्री पेमेंट केलेली रक्कम कमी होण्यास मदत होते व त्यामुळे महिन्याचा हप्ता कमी होतो.

3- लोन रिस्ट्रक्चर करणे यामध्ये तुम्ही घेतलेले कर्ज रिस्ट्रक्चर करू शकतात. यामध्ये तुमचा कर्जाचा हप्ता वाढतो मात्र होमलोन लवकर संपण्यास मदत होते. या पर्यायाचे महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे यामध्ये तुम्हाला व्याज देखील कमी द्यावे लागते.

4- कर्जाच्या मासिक हप्त्याची रक्कम कमी करणे प्रत्येक महिन्याला जर तुम्हाला कर्जाच्या हप्ते भरताना आर्थिक दृष्टिकोनातून काही समस्या येत असतील तर तुम्ही चालू असलेल्या मासिक हप्त्याची रक्कम कमी करू शकतात. मात्र यामध्ये तुमच्या कर्जाचा कालावधी वाढतो व कालावधी वाढल्यामुळे त्यावर अधिक व्याज देखील द्यावे लागू शकते. परंतु कर्जाच्या हप्त्याची रक्कम मात्र कमी होण्यास मदत होते.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe