Epfo Rule: पीएफ खातेदारांना मिळेल 50 हजार रुपयांचा फायदा! परंतु पूर्ण करावी लागेल ‘ही’ अट, वाचा माहिती

Ajay Patil
Published:
epfo rule

Epfo Rule:- कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना ही देशातील जे काही खाजगी व सरकारी क्षेत्रातील काम करणारे कोट्यावधी कर्मचारी आहेत त्यांच्यासाठी महत्त्वाची असलेली संघटना आहे. कर्मचाऱ्यांच्या पगारांमधील जो काही भाग ईपीएफ खात्यामध्ये जमा होतो त्याचे सगळे नियमन कर्मचारी भविष्य निर्वाह निधी म्हणजेच ईपीएफओच्या माध्यमातून केले जाते.

ईपीएफओ मध्ये कर्मचाऱ्यांच्या महिन्यातील पगारांमधून जो काही भाग जमा केला जातो तो कर्मचाऱ्यांना त्यांच्या रिटायरमेंट नंतर पेन्शनच्या स्वरूपामध्ये मिळतो. याव्यतिरिक्त ईपीएफओच्या माध्यमातून असे बरेच नियम आहेत की जे पीएफ खातेदार अर्थात ईपीएफओ सदस्यांसाठी खूप फायद्याचे ठरतात. यातीलच एक जर आपण तरतूद पाहिली तर ती म्हणजे लॉयल्टी कम लाईफ बेनिफिट ही होय.

 ईपीएफओ खातेदारांना मिळेल 50 हजार रुपये पर्यंत फायदा

देशभरात असलेल्या सगळ्या ईपीएफओ सदस्यांकरिता ईपीएफओ च्या माध्यमातून एक महत्त्वाची घोषणा करण्यात आलेली आहे. यामध्ये जर आपण कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेची तरतूद पाहिली तर त्यानुसार ईपीएफ खातेदारांना आता 50 हजार रुपयापर्यंत फायदा मिळू शकणार आहे.

परंतु त्याकरिता कर्मचाऱ्यांना एक महत्त्वाची अट पूर्ण करण्याची गरज आहे व ती म्हणजे जे पीएफ खातेदार असतात त्यांनी जर नोकरी बदलली तर त्यानंतर ईपीएफ खात्यामध्ये त्यांचे योगदान देणे सुरू ठेवणे गरजेचे राहील. म्हणजेच एका खात्यामध्ये सलग २० वर्ष जर योगदान कर्मचाऱ्यांनी दिले तर त्याला लॉयल्टी कम लाईफ बेनिफिटचा फायदा मिळण्याची संधी प्राप्त होते.

या पद्धतीची शिफारस सीबीडीटीने नुकतीच केली होती व त्याला केंद्र सरकारच्या माध्यमातून देखील ग्रीन सिग्नल देण्यात आलेला आहे. अगदी सोप्या भाषेत सांगायचे म्हटले म्हणजे जे कर्मचारी वीस वर्षापासून नियमित ईपीएफ खात्यामध्ये योगदान देत आहेत अशा कर्मचाऱ्यांना 50 हजार रुपयांचा अतिरिक्त लाभ आता मिळणार आहे.

परंतु यामध्ये लक्षात घेण्याची बाब अशी आहे की ईपीएफओच्या शिफारशीचा लाभ घेण्याची पात्रता व्यक्तीच्या पगाराच्या श्रेणीवर देखील अवलंबून असणार आहे. म्हणजे व्यक्तीला पगार किती आहे यावर ते अवलंबून असणार आहे.

उदाहरणच घ्यायचे झाले तर ज्यांना पाच हजार रुपये पर्यंत मूळ वेतन असेल अशा व्यक्तींना तीस हजार, ज्यांना पाच हजार एक ते दहा हजार रुपये वेतन असेल अशांना चाळीस हजार व ज्यांना दहा हजार रुपये पेक्षा जास्त मूळ वेतन असेल अशा व्यक्तींना या अंतर्गत जास्तीत जास्त पन्नास हजार रुपयांचा फायदा मिळू शकतो.

 हा फायदा घेण्यासाठी कर्मचाऱ्यांना काय करावे लागेल?

कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेच्या सदस्यांना जर हा फायदा घ्यायचा असेल तर त्यांनी नोकरी बदलल्यानंतर देखील एकाच ईपीएफ खात्यामध्ये योगदान देणे सुरू ठेवणे गरजेचे राहील.यामध्ये चालू ईपीएफ खाते सुरू ठेवण्याच्या निर्णयाबद्दल पूर्वीच्या आणि सध्याच्या अशा दोन्ही नियोक्त्यानी त्याबाबत माहिती देऊन योगदानांमध्ये सातत्य ठेवणे गरजेचे राहील.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe