Farmer Success Story: मोसंबी बागेत मुक्तसंचार पद्धतीने सुरू केले गावरान कोंबडी पालन! अंडी व कोंबड्या विक्रीतून लाखोत उत्पन्न, वाचा यशोगाथा

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Farmer Success Story:- शेतीला जोडधंदा करणे हे आताच्या कालावधीमध्ये खूप महत्त्वाची बाब असून अनेक प्रकारच्या नैसर्गिक आपत्तीमुळे दिवसेंदिवस शेतीमधील खर्च निघणे देखील खूप कठीण बाब झालेली आहे. नेमके हातात उत्पन्न यायची वेळ येते व तेव्हाच काहीतरी नैसर्गिक आपत्तीचा प्रकोप होतो व शेतकऱ्यांचे खूप  मोठ्या प्रमाणावर नुकसान होते.

त्यामुळे शेतकऱ्यांनी शेती करण्यासोबतच पशुपालन तसेच कुक्कुटपालन व शेळीपालनासारखा जोडधंदा निवडणे व तो यशस्वी करणे खूप गरजेचे आहे. याच मुद्द्याला धरून जर आपण जालना जिल्ह्यातील घाणेवाडी येथील भाऊसाहेब व यमुनाबाई कावले या दाम्पत्याचा विचार केला तर या दांपत्याने उत्तम अशा शेतीसोबतच गावरान कोंबडी पालनाचा व्यवसाय सुरू केला व त्या माध्यमातून खूप चांगल्या प्रकारची आर्थिक समृद्धी मिळवली आहे. याच दाम्पत्याची यशोगाथा आपण या लेखात बघणार आहोत.

 गावरान कोंबडी पालनातून आर्थिक समृद्धी

याबाबत सविस्तर वृत्त असे की, घाणेवाडी हे जालना जिल्ह्यातील छोटेसे गाव असून गावात राहणारे भाऊसाहेब कावले यांच्याकडे पाच एकर शेती असून त्यामध्ये त्यांनी दोन एकर क्षेत्रात मोसंबी लागवड केलेली आहे व दीड एकर मध्ये बारमाही प्रकारचा भाजीपाल्याची लागवड ते करतात. तसेच सहा ते सात वर्षांपासून ते एका एकर मध्ये कपाशीचे बीजोत्पादन घेत असून उत्तम प्रकारे त्यांची शेतीचे नियोजन आहे.

क्षेत्र कमी असल्यामुळे शेतीला काहीतरी पूरक व्यवसायाची साथ देऊन अर्थकारण भक्कम कसे करता येईल यासाठी भागवत हे सतत प्रयत्नशील होते. त्याकरता त्यांनी दहा शेळ्या विकत घेऊन शेळी पालन व्यवसाय सुरू केला. परंतु यामध्ये काही समस्या उद्भवल्याने त्यांनी हा व्यवसाय थांबवला व या ऐवजी इतर काही पर्यायांची चाचपणी सुरू केली.

याबाबत माहिती घेणे सुरू असताना त्यांना छत्रपती संभाजी नगर जिल्ह्यातील कुंबेफळ या ठिकाणी मोसंबी बागेमध्ये मुक्त संचार पद्धतीने गावरान कोंबडी पालन  कसे केले जाते याबाबतची माहिती मिळाली. ही पद्धत त्यांना आवडली व त्यांनी देखील स्वतःच्या दोन एकर मोसंबी बागेपैकी एका एकरमध्ये अशाच मुक्त संचार पद्धतीने कोंबडी पालन करावे असे मनात ठरवले.

त्यानंतर त्यांनी 2021 मध्ये 30 गावरान कोंबड्यांची खरेदी केली व व्यवसायाचा श्री गणेशा केला. याकरिता त्यांनी एका एकर बागेसाठी आजूबाजूने साध्या पद्धतीने  व कमीत कमी खर्च करून सहा फूट उंचीची जाळी देखील लावली. 2021 ते 2022 या एक वर्षाच्या कालावधीमध्ये त्यांची कोंबड्यांची संख्या आता 600 पर्यंत गेलेली आह

परंतु यामध्ये उपलब्ध जागेत कोंबड्यांना मोकळी जागा मिळावी याकरिता संख्या कमी करून ती आटोपशीर ठेवण्याचा प्रयत्न केलेला आहे. आता सध्या त्यांच्याकडे छोटी पिल्ले व मोठ्या कोंबड्या असे मिळून 300 पर्यंत कोंबड्यांची संख्या आहे. कोंबड्यांसाठी खाद्याची तजवीज म्हणून ते हॉटेलमधील उरलेले अन्न आणि भाजीपाला मार्केट मधील वाया जाणारा भाजीपाला याचा प्रामुख्याने वापर करतात.

दररोज तीन क्रेट एवढे हॉटेलमधील खाद्य या कोंबड्यांना लागते व भाजी बाजारातून खाद्य संकलित करण्यासाठी ते येथील कामगारांना मजुरी देतात व या थोड्याफार मजुरीच्या जीवावर ते खाद्य संकलित करतात. तसेच मुक्त संचार पद्धतीने व्यवसाय असल्यामुळे रोगराईला देखील थारा नसतो.

यामुळे कोंबड्यांची मरतुक देखील एकदम कमीत कमी होते. या कोंबड्यां करता बागेमध्ये पाण्याची व खाद्याची देखील सुविधा करण्यात आलेली आहे. मोसंबी बागेत कोंबडी पालन सुरू केल्यामुळे बागेतील तणदेखील नियंत्रणात आलेले आहे व शेतीला कोंबडी खत देखील उपलब्ध झाले आहे.

 अशा पद्धतीने आहे विक्री व्यवस्थापन

या कोंबडी पालनातून भागवत यांना एका दिवसाला 40 ते 50 अंडी उत्पादन मिळते व महिन्याचा विचार केला तर जवळपास एक हजार तीनशे ते 1400 इतके अंडे मिळतात. या एकूण अंडी उत्पादनातून ते तीनशे ते साडेतीनशे अंडी उबवणीसाठी ठेवतात व उरलेले अंड्यांची विक्री प्रति नग पंधरा रुपये दराने करतात.

ते शनिराज ऍग्रो या नावाने अंड्यांची विक्री जालना शहरात देखील करतात. जालना शहरात अशा अनेक ठिकाणी फलक लावल्यामुळे जालना शहरातून देखील ग्राहकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. कारण त्यांच्या या क्षेत्रापासून जालना शहर पाच किलोमीटर अंतरावर असल्यामुळे होम डिलिव्हरी देणे देखील त्यांना शक्य होते. होम डिलिव्हरी करता ते अतिरिक्त शुल्क आकारतात. गावात देखील अंड्यांची मोठ्या प्रमाणावर विक्री होते.

तसेच मांसल कोंबडा हा 800 रुपये प्रति नग तर कोंबडी 400 रुपये प्रति नग या दराने विक्री केली जाते. गाव परिसरातील आठ ते दहा हॉटेल व्यवसायिक देखील त्यांच्याशी जोडले गेले असल्यामुळे त्यांना या कोंबड्यांची विक्री केली जाते. गावरान कोंबड्यांना चांगली मागणी असल्यामुळे त्यांचा खप देखील चांगला होतो.

साधारणपणे 15 ते 20 कोंबड्यांची महिन्याला विक्री होते. एवढेच नाही तर भागवत यांनी शंभर अंडी उबवणूक क्षमतेचे यंत्र देखील घेतलेले आहे व त्यानुसार प्रति नग पन्नास रुपये दराने ते गावरान कोंबडीच्या पिल्लांची विक्री देखील करतात. अशा पद्धतीने भागवत कावले यांनी शेतीला गावरान कोंबडी पालनाची जोड देऊन खूप चांगल्या पद्धतीने आर्थिक उत्पन्न मिळवायला सुरुवात केलेली आहे.