Farming Business Idea: छोट्याशा जमिनीच्या तुकड्यात करा ही शेती! महिन्याला आरामात मिळेल लाखोत कमाई

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Farming Business Idea:- शेती व शेती आधारित अनेक प्रकारचे व्यवसाय असल्यामुळे अनेक शेतकरी बंधू असे व्यवसाय शेतीला जोडधंदा म्हणून करतात आणि त्या माध्यमातून चांगले आर्थिक उत्पन्न देखील मिळवतात. शेतीला जोडधंदा म्हटले म्हणजे आपल्या डोळ्यासमोर पटकन येते ते पशुपालन, शेळीपालन तसेच कुक्कुटपालन यासारखे व्यवसाय.

परंतु या व्यतिरिक्त जर आपण विचार केला तर मधमाशी पालन, ससे पालन तसेच बटेर पालन सारखे अनेक व्यवसाय शेतकरी करू लागले आहेत. यातील काही व्यवसाय आपल्याला खूप नवखे वाटतात किंवा त्याबद्दल आपल्याला पुरेशी माहिती नाही. परंतु या व्यवसायांशी संपूर्ण माहिती घेतली तर आपल्याला कळते की यांची बाजारपेठ चांगली आहे व मागणी असल्यामुळे नफा देखील चांगला मिळू शकतो.

अगदी याच पद्धतीने शेतीशी संबंधित असलेल्या व्यवसायांच्या यादीमध्ये अलीकडच्या कालावधीमध्ये खूप विकसित आणि प्रसिद्ध होत असलेला व्यवसाय म्हणजे मशरूम फार्मिंग होय. मशरूम लागवड ही कमीत कमी जागेमध्ये आणि कमीत कमी खर्चात खूप चांगला नफा मिळवून देणारा शेती संबंधित व्यवसाय असल्यामुळे शेतकऱ्यांनी व्यवस्थित अभ्यास करून जर मशरूम लागवड करण्याचे ठरवले तर नक्कीच आर्थिक दृष्टिकोनातून शेतकऱ्यांना हे फायद्याचे सिद्ध होऊ शकते.

 कमीत कमी जागेत मशरूम लागवड करून मिळेल लाखात नफा

मशरूम ही एक प्रकारची बुरशी असून ही अनेक प्रकारच्या पोषक घटकांनी समृद्ध असते व खाण्यासाठी स्वादिष्ट असण्यासोबतच आरोग्यासाठी देखील खूप फायदेशीर आहे. आरोग्याकरिता मशरूमचे सेवन हे रामबाण उपाय असल्याचे देखील डॉक्टरांचे मत आहे. यामध्ये असलेले अँटिऑक्सिडंट तसेच प्रोटीन, विटामिन डी तसेच सेलेनियम आणि झिंक  मोठ्या प्रमाणावर असल्यामुळे शरीराला अनेक आजारांपासून वाचवण्याचे काम करते.

या सगळ्या आरोग्याला फायदेशीर असल्याच्या कारणामुळे तिला मागणी देखील चांगली असते.  शहरांमधील मोठ्या हॉटेलमध्ये महागड्या डिशच्या स्वरूपामध्ये मशरूम मिळते. व्यापारी तत्त्वावर जर मशरूमचे उत्पादन घेतले तर कमीत कमी जागेत व कमीत कमी भांडवलात चांगले नियोजन केले तर खूप उत्तम नफा मिळतो. शहरातील लोक तसेच शहरातील हॉटेल व्यवसायिकांकडून देखील मशरूमला चांगली मागणी असते.

 मशरूम ची लागवड कशी करावी?

मशरूम फार्मिंग अर्थात मशरूम शेती करायला खूप सोपी असून याकरिता तुम्हाला मोठ्या प्रमाणावर शेतीची गरज भासत नाही. मशरूमची लागवड तुम्ही छोट्या जागेतून किंवा घरातील खोलीतून देखील करू शकतात. याकरता तुम्हाला कंपोस्ट खताची गरज भासते व यामध्ये मशरूमच्या बिया पेरल्या जातात किंवा लागवड केल्या जातात. गहू चा अथवा भाताचा पेंढा वापरून तुम्ही याकरता लागणारे कंपोस्ट खत बनवू शकता.

मशरूमच्या चांगल्या उत्पादनामध्ये तापमान योग्य असणे खूप गरजेचे आहे. मशरूम साठी साधारणपणे 18 सेंटीग्रेड ते 30 सेंटीग्रेड पर्यंत तापमान चांगले असते. परंतु मशरूमच्या काही जाती अशा आहेत की त्यांची लागवड तुम्ही वर्षभरात केव्हाही करू शकतात. मशरूमच्या फायदेशीर जातींचा विचार केला तर त्यामध्ये मिल्की मशरूम, बटन मशरूम तसेच स्ट्रॉ मशरूम, ऑईस्टर मशरूम इत्यादींचा समावेश करता येईल. मशरूम लागवडीकरिता तुम्हाला कमीत कमी जागा तसेच पाणी, काही आवश्यक कच्चामाल तसेच प्लास्टिक, लागणारे बियाणे, हवामान व यंत्रसामग्रीची आवश्यकता भासते.

 मशरूम लागवड प्रशिक्षण

योग्य प्रशिक्षण घेऊन जर मशरूमची लागवड केली तर नक्कीच फायद्याचे ठरू शकते. इतर पिकांच्या लागवडी सारखी मशरूम लागवड नाही त्यामुळे कुठल्याही प्रकारचे प्रशिक्षण न घेता याची लागवड केली तर नुकसान होण्याची शक्यता संभवते. मशरूम लागवडीकरिता प्रशिक्षणाची गरज आहे कारण यामध्ये तुम्हाला लागवडीपासून तर विक्रीपर्यंत कौशल्य आत्मसात करण्यासाठी मदत होते. तसेच मशरूम लागवडीकरिता मिळणारे सरकारी अनुदान व या क्षेत्रातील आव्हाने इत्यादी बद्दल ट्रेन केले जाते.

 मशरूम लागवडीकरिता सबसिडी आणि कर्ज मिळते का?

प्रशिक्षित मशरूम लागवड करणाऱ्या शेतकऱ्यांना लागवडीच्या प्रक्रियेचा प्रोजेक्ट रिपोर्ट तयार केल्यानंतर कर्ज सुविधा प्रदान केली जाते व या प्रोजेक्ट रिपोर्टला राष्ट्रीय कृषी व ग्रामीण विकास बँकेची अर्थात नाबार्डने मान्यता देणे गरजेचे आहे. त्यानंतर आवश्यक असलेली जी काही गरजेची रक्कम आहे त्यावर प्रोसेस करण्याकरिता राष्ट्रीयकृत बँकांना या प्रकरणाची शिफारस केली जाते.

दुसरे महत्त्वाचे म्हणजे राष्ट्रीय फलोत्पादन मंडळ देखील मशरूम  लागवड करणाऱ्या शेतकऱ्यांना पतपुरवठा केलेल्या बॅक अँड सबसिडीच्या स्वरूपात मदत पुरवते. सबसिडी मध्ये एकूण प्रोजेक्ट कॉस्टच्या 20% इतके अनुदान मिळते. म्हणजेच डोंगराळ भागांमध्ये जास्तीत जास्त 30 ते इतर भागांमध्ये कमाल 25 लाखापर्यंत सबसिडी मिळू शकते.