Fixed Deposit : जर आपण सुरक्षित गुंतवणूकीबद्दल बोललो तर पहिले नाव समोर येते ते म्हणजे एफडी, एफडीमधील गुंतवणूक ही सर्वात सुरक्षित गुंतवणूक मानली जाते, एफडीची सुविधा बँक तसेच पोस्ट ऑफिस देखील देते. बँक एफडीद्वारे लोक एकाच वेळी मोठी रक्कम जमा करून त्यावर चांगले व्याज मिळवतात.
पण बहुतेकवेळा एफडीमध्ये गुंतवणूक करण्याआधी लोक कचरतात, याचे सर्वात महत्त्वाचे कारण म्हणजे त्यातील परतावा इतर माध्यमांच्या तुलनेत खूपच कमी असतो. अशातच देशातील काही मोठ्या बँकांनी आपल्या एफडीवरील व्याजदर कमी केले आहे. तुम्हीही सध्या एफडी करण्याचा विचार करत असाल तर तुम्हाला हे माहिती असले पाहिजे कोणत्या बँकांनी एफडीवरील व्याजदर कमी केले आहेत. चला तर…
अॅक्सिस बँक
अॅक्सिस बँकेने बँक एफडीवरील व्याजदर कमी केले आहेत. आता Axis Bank 7 दिवस ते 10 वर्षांच्या FD वर 3% ते 7.10% पर्यंत व्याज देत आहे. बँकेने 2 वर्षांपेक्षा जास्त परंतु 5 वर्षांपेक्षा कमी मुदत ठेवींसाठी 10 bps ची कपात केली आहे.
येस बँक
येस बँकेने एफडीवर दिला जाणारा व्याजदर कमी केला आहे. ताज्या व्याजदरांतर्गत, 2 कोटी रुपयांपेक्षा कमी मुदत ठेवी ठेवणाऱ्या सामान्य लोकांना आता बँक एफडीवर 3.25 टक्के ते 7.25 टक्के दराने व्याज दिले जाईल. तर ज्येष्ठ नागरिकांना ३.७५ टक्के ते ८ टक्के दराने व्याज दिले जाईल.
एचडीएफसी बँक
एचडीएफसी बँकेदकडून देखील त्यांच्या एफडीवरील व्याजदर कमी करण्यात आले आहेत. बँकेने आपल्या 35 महिने आणि 55 महिन्यांच्या FD च्या व्याजदरात बदल केला आहे.
या अंतर्गत, 2 कोटी रुपयांपेक्षा कमी एफडीसाठी पहिल्या 35 महिन्यांसाठी 7.20 टक्के आणि 55 महिन्यांसाठी 7.25 टक्के दराने व्याज दिले जात आहे. मात्र आता 35 महिन्यांसाठी 7.15 टक्के आणि 35 महिन्यांसाठी 7.20 टक्के दराने व्याज दिले जात आहे.