Fixed Deposite : जर तुम्ही मुदत ठेव योजना म्हणजे एफडी (FD) करण्याच्या विचारात असाल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची आहे. देशातील काही स्मॉल फायनान्स बँका आपल्या एफडीवर उत्तम परतावा ऑफर करत आहेत. जर तुम्ही सुरक्षेसह चांगला परतावा मिळवू इच्छित असाल तर, या बँकांमध्ये गुंतवणूक करणे फायद्याचे ठरेल.
मुदत ठेवी (FDs) आपत्कालीन निधी तयार करण्यात महत्त्वाची भूमिका बजावतात. जोखीममुक्त गुंतवणुकीच्या शोधात असलेल्या अशा गुंतवणूकदारांसाठी सध्या मोठी संधी आहे. कारण अनेक लघु वित्त बँका सध्या FD वर ८.६ टक्क्यांपर्यंत व्याज देत आहेत. आजच्या या लेखात आपण या बँका ३ वर्षाच्या एफडीवर किती व्याजदर ऑफर करत आहेत, ते जाणून घेणार आहोत.
सूर्योदय स्मॉल फायनान्स बँक
सूर्योदय स्मॉल फायनान्स बँक तीन वर्षांच्या एफडीवर ८.६ टक्के व्याजदर देत आहे. लघु वित्त बँकांमध्ये हा सर्वाधिक व्याजदर आहे. दरम्यान, जर एखाद्या व्यक्तीने 1 लाख रुपयांची गुंतवणूक केली तर ती तीन वर्षांत वाढून 1.29 लाख रुपये होईल.
जन स्मॉल फायनान्स बँक
जन स्मॉल फायनान्स बँक तीन वर्षांच्या एफडीवर ८.५ टक्के व्याज देत आहे. म्हणजेच 1 लाख रुपयांची गुंतवणूक तीन वर्षांत 1.29 लाख रुपयांपर्यंत वाढेल.
उत्कर्ष स्मॉल फायनान्स
उत्कर्ष स्मॉल फायनान्स देखील तीन वर्षांच्या FD वर 8.5 टक्के व्याज दर देत आहे.
Fincare Small Finance बँक
Fincare Small Finance Bank तीन वर्षांच्या FD वर 8.11 टक्के व्याजदर देत आहे. याचा अर्थ एखाद्याने 1 लाख रुपये गुंतवले तर ते तीन वर्षांत 1.27 लाख रुपये होईल.
नॉर्थ ईस्ट स्मॉल फायनान्स बँक
नॉर्थ ईस्ट स्मॉल फायनान्स बँक तीन वर्षांच्या एफडीवर ७.७५ टक्के व्याज देत आहे. म्हणजेच 1 लाख रुपयांची गुंतवणूक तीन वर्षांत 1.26 लाख रुपये होईल.
या सर्व बँका तीन वर्षाच्या एफडीवर 8 टक्क्यांपेक्षा जास्त व्याजदर ऑफर करत आहेत, कोणत्याच बँका सध्या 8 टक्क्यांपेक्षा व्याजदर देत नाहीत, तुम्ही चांगला परतावा मिळवू इच्छित असाल तर ही संधी तुमच्यासाठी उत्तम आहे.