Hdfc Business Loan : एचडीएफसी बँकेकडून घ्या 5 लाखापर्यंत बिझनेस लोन! वाचा पात्रता,अटी आणि व्याजदर

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Hdfc Business Loan :- आपल्यापैकी बऱ्याच जणांना नवीन व्यवसाय किंवा स्टार्टअप सुरू करायचा असतो. परंतु बऱ्याच जणांना पैसे नसल्यामुळे असे व्यवसाय सुरू करायला खूप मोठ्या प्रमाणावर अडचणी निर्माण होतात. बऱ्याच लोकांची इच्छा असते की कुठलातरी व्यवसाय सुरू करावा.

परंतु पैशांच्या अडचणीमुळे खूप जणांना व्यवसाय उभारने अशक्य होते. यामध्ये बरेच जण विविध बँकांकडून व्यवसायासाठी कर्ज घेण्यासाठी प्रयत्न करतात. यामध्ये प्रत्येक बँकेचे व्यवसाय कर्ज अर्थात बिजनेस लोनसाठीचे नियम, अटी व इतर बाबी वेगवेगळ्या असतात.

या सगळ्या बँकांमध्ये जर आपण एचडीएफसी बँकेचा विचार केला तर या बँकेकडून तुम्हाला बिजनेस लोनकरिता अर्ज करता येऊ शकतो व तुम्हाला या माध्यमातून कर्ज मिळवून तुम्ही तुमचा व्यवसाय उभारू शकतात. याचा अनुषंगाने या लेखामध्ये आपण एचडीएफसी बिझनेस लोन विषयी ए टू झेड माहिती घेऊ.

एचडीएफसी बँकेकडून देण्यात येणाऱ्या बिजनेस लोनचे स्वरूप

ही खाजगी क्षेत्रातील सर्वात मोठी बँक असून व्यवसाय कर्ज देण्याकरिता ही एक उत्तम बँक मानली जाते. या बँकेमध्ये सर्वात जलद, सुरक्षित आणि कर्ज मंजुरीनंतर तात्काळ बँक खात्यामध्ये पैसे दिले जातात. या बँकेच्या माध्यमातून छोटे व्यावसायिक तसेच दुकानदार व स्वयंरोजगार असलेल्या व्यक्तींना त्यांचा आहे तो व्यवसाय वाढवण्याकरिता,

उत्पादनात वाढ करण्यासाठी तसेच यंत्रसामग्री खरेदी करण्यासाठी व व्यवसाय किंवा स्टार्टअपसाठी जमीन खरेदी करायची असेल तरी तुम्हाला कर्ज मिळते. विशेष म्हणजे तुम्ही घरबसल्या ऑनलाईन प्रक्रियेच्या माध्यमातून एचडीएफसी बँकेकडून बिजनेस लोन घेऊ शकतात.

या ठिकाणी तुम्हाला काही महत्त्वाची माहिती भरावी लागते व आवश्यक कागदपत्रांची पडताळणी केल्यानंतर बँकेकडून कर्ज मंजूर केले जाते व मंजूर कर्जाची रक्कम त्वरित तुमच्या खात्यात ट्रान्सफर केली जाते.

एचडीएफसी बिझनेस लोनसाठीची पात्रता

1- व्यवसायामध्ये असलेल्या व्यक्तींचे वय किमान 21 ते कमाल 65 वर्षांच्या दरम्यान असावे.

2- सगळ्यात महत्वाचे म्हणजे अर्जदार हा भारतीय नागरिक असावा.

3- अर्जदाराकडे आधार कार्ड, पॅन कार्ड आणि पत्त्याचा पुरावा इत्यादी सारखी सरकारने मंजूर केलेली कागदपत्रे असावी.

4- अर्जदाराचा सिबिल स्कोर किमान 750 असावा.

5- एचडीएफसी बिझनेस लोनकरिता एचडीएफसी बँकेत बचत किंवा चालू खाते असणे आवश्यक आहे.

6- व्यवसायाच्या संबंधित आवश्यक कागदपत्र तुमच्याकडे असणे गरजेचे आहे.

7- स्वयंरोजगार असलेल्या व्यक्ती, मालक, खाजगी मर्यादित कंपनी आणि भागीदारी कंपन्या जे उत्पादन व्यापार किंवा सेवांच्या व्यवसायात गुंतलेले आहेत ते एचडीएफसी व्यावसायिक कर्जासाठी अर्ज करू शकता.

8- व्यवसायाची कमीत कमी उलाढाल चाळीस लाख रुपयांपेक्षा जास्त असावी आणि संबंधित व्यक्तीला त्या व्यवसायातील किमान तीन वर्ष किंवा पाच वर्षापेक्षा जास्त कामाचा अनुभव असणे गरजेचे आहे. तसेच मागील दोन वर्षापासून ज्यांचा व्यवसाय फायद्यात चालू आहे त्यांना या कर्जाचा लाभ मिळतो.

9- तसेच व्यवसायाचे कमीत कमी वार्षिक उत्पन्न दीड लाख रुपये प्रति वर्ष असावे. तसेच तुमच्याकडे आयटीआर स्लिप असणे गरजेचे आहे.

एचडीएफसी बिझनेस लोनसाठी लागणारी कागदपत्रे

एचडीएफसी बिझनेस लोन घेण्याकरिता अर्जदाराकडे पॅन कार्ड, केवायसी कागदपत्रे( ओळखीचा पुरावा, पत्त्याचा पुरावा, जन्माचा पुरावा), गेल्या सहा महिन्याचे बँक स्टेटमेंट, कार्यालयाच्या पत्त्याचा पुरावा, व्यवसाय सातत्य म्हणजेच व्यवसाय सुरू असल्याचा पुरावा, उत्पन्नाच्या गणनेसह नवीनतम आयटीआर, सीए कडून प्रमाणीत/ ऑडिट झाल्यानंतर मागील दोन वर्षाचा व्यवसायाचा ताळेबंद आणि नफा व तोटा खाते म्हणजेच बॅलन्स शीट इत्यादी कागदपत्रे लागतात.

एचडीएफसी बँकेकडून बिझनेस लोन घेण्यासाठी अशा पद्धतीने करा ऑनलाईन अर्ज

1- याकरिता सर्वप्रथम तुम्हाला एचडीएफसी बँकेच्या व्यवसायाच्या वेबसाईटवर जावे लागेल.

2- त्यानंतर तुमच्या मोबाईल नंबर सह साइन अप करा.

3- साइन अप केल्यानंतर तुमच्यासमोर एक नवीन पेज उघडेल व त्या ठिकाणी मोबाईल नंबर, एचडीएफसी बँकेचा खाते क्रमांक तसेच कर्जाची रक्कम इत्यादी माहिती भरल्यानंतर प्रोसिड या बटणावर क्लिक करा.

4- त्या ठिकाणी तुम्हाला एक अर्ज भरावा लागेल आणि आवश्यक कागदपत्रे अपलोड करावे लागतील.

5- कागदपत्रे अपलोड केल्यानंतर तुम्हाला अटी व शर्तींवर ई स्वाक्षरी करावी लागेल. त्यासोबतच ई साइन करिता तुम्हाला आधार क्रमांक द्यावा लागेल.

6- त्यानंतर तुमच्या नोंदणीकृत मोबाईल क्रमांकावर मिळालेला ओटीपी टाकावा लागेल.

7- ओटीपी टाकल्यानंतर सर्व तपशील भरल्यानंतर ऑफर पुष्टी करण्याकरिता पुढे जा वर टॅप करा.

8- त्यानंतर तुमचे बँक तपशील जसे की खाते क्रमांक, आयएफएससी कोड इत्यादी टाकावा.

9- तुमची कर्जाची रक्कम मंजूर 24 तासांच्या आत तुमच्या खात्यात जमा होते.

किती मिळू शकते तुम्हाला कर्ज?

तुम्हाला एचडीएफसी बँकेकडून व्यवसाय उभारण्याकरिता पाच लाखापासून ते पन्नास लाखापर्यंत कर्ज मिळू शकते. एचडीएफसी बँकेच्या बिझनेस लोनसाठी चा व्याजदर किती आहे? तुम्हाला जर एचडीएफसी बँकेकडून बिजनेस लोन घ्यायचे असेल तर त्यासाठीचा व्याजदर हा 11.90% वार्षिक व्याजदरापासून सुरू होतो.

कर्ज परतफेडीचा कालावधी किती असतो?

तुम्ही बारा महिने ते 48 महिन्यांच्या कालावधीत हे कर्ज परतफेड करू शकतात.