दूध उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा! ‘या’ जिल्ह्यातील दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होणार 9 कोटी 50 लाख रुपये! वाचा माहिती

Ajay Patil
Published:
milk subsidy

राज्यातील दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या समोर अनेक प्रकारच्या समस्या असून यामध्ये जनावरांच्या खाद्याचे वाढलेले भाव तसेच यावर्षी दुष्काळी परिस्थितीमुळे निर्माण झालेली चारा टंचाई, पाण्याची कमतरता इत्यादी बऱ्याच समस्या आपल्याला सांगता येतील.

त्यातल्या त्यात दुधाला मिळणारे दर हे पुरेसे नसल्यामुळे दूध उत्पादक त्यांच्या माध्यमातून दुधाच्या भावासंबंधी सातत्याने मागणी करण्यात येत होती. यानुसार शासनाने प्रति लिटर पाच रुपयांचे अनुदान देण्याचे जाहीर केलेले होते.

यामध्ये संबंधित दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या खात्यावर प्रतिलिटर  27 रुपये जेव्हा दूध संकलन संस्था जमा करेल तेव्हा यामध्ये शासन पाच रुपयाचे अनुदान देणार आहे.

यानुसार आता राज्य सरकारने जाहीर केलेले प्रति लिटर पाच रुपये दूध अनुदानासाठी सांगली जिल्ह्यातील दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या खात्यावर नऊ कोटी 50 लाख रुपये जमा होणार आहेत.

 सांगली जिल्ह्यातील दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होणार दूध अनुदान

याबाबत सविस्तर वृत्त असे की, राज्य शासनाने  प्रति लिटर पाच रुपये दूध अनुदान जाहीर केलेले होते व त्यानुसार सांगली जिल्ह्यातील जे काही दूध संकलन संस्था आहेत त्या संस्थांच्या माध्यमातून एकूण 79 हजार 362 प्रस्ताव सादर करण्यात आलेले होते.

त्या प्रस्तावांची छाननी होऊन आता शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर नऊ कोटी 50 लाख रुपये जमा करण्याची महत्वपूर्ण प्रक्रिया सुरू झाल्याची माहिती जिल्हा दुग्ध व्यवसाय अधिकारी नामदेव दवडते यांनी दिलेली आहे.

या अनुदानाचा लाभ घेण्यासाठी सरकारने अनुदान योजनेनुसार दूध उत्पादक शेतकऱ्यांना संबंधित जनावरांची टॅगिंग आणि त्यांच्या अनुवंशिकतेविषयी शासनाच्या संकेतस्थळावर ऑनलाईन माहिती माहिती भरणे आवश्यक आहे.

एवढेच नाही तर या दूध अनुदान योजनेनुसार जेव्हा संबंधित दूध संकलन संस्था  दुध उत्पादक शेतकऱ्यांच्या खात्यावर प्रति लिटर सत्तावीस रुपये याप्रमाणे पैसे जमा करेल तेव्हा शासन पाच रुपयाचे अनुदान देणार आहे.

त्यामुळे आता या दूध अनुदान योजनेच्या माध्यमातून जिल्ह्यातील खाजगी व सहकारी संस्थांना दुधाचा पुरवठा करणाऱ्या अनेक दूध उत्पादक शेतकऱ्यांना याचा फायदा मिळालेला आहे.

 राहिलेले अनुदान पुढील आठवड्यात वितरित केले जाईल

यामध्ये एकूण जे प्रस्ताव दाखल झालेले आहेत त्यांची अजून छाननी सुरू असून ती पूर्ण झाल्यानंतर पुढील आठवड्यामध्ये शेतकऱ्यांच्या खात्यावर उर्वरित अनुदान वितरित होणार असल्याची माहिती समोर आलेली आहे. यामध्ये ज्या प्रस्तावांची छाननी झाली त्यांना मंजुरी मिळाल्याने दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर थेट हे अनुदान वितरित करण्यात येत आहे.

 दूध उत्पादक शेतकऱ्यांची माहिती संगणक प्रणालीमध्ये भरण्यासाठी मुदत वाढ

महत्वाची बाब म्हणजे या दूध अनुदान योजनेच्या माध्यमातून 11 जानेवारी ते 10 मार्च या कालावधीत दूध उत्पादक शेतकऱ्यांची माहिती संगणक प्रणालीमध्ये भरायची होती.

परंतु त्याला आता मुदत वाढ देण्यात आली असून आता ही माहिती संगणक प्रणाली मध्ये 15 एप्रिल पर्यंत भरता येणार आहे. तसेच 26 मार्चपर्यंत ज्या जनावरांची पडताळणी झालेली असेल त्यांचा देखील या योजनेमध्ये समावेश करण्यात येणार आहे.

 कोणत्या प्रकल्पाला मिळाले किती अनुदान?

1- हेमंत बाबा देशमुख दूध प्रकल्प, आटपाडी मिळालेले अनुदान 68 लाख रुपये

2- चितळे डेअरी भिलवडी सहा कोटी रुपये

3- राजारामबापू पाटील दूध संघ, इस्लामपूर एक कोटी 65 लाख

4- श्रीनिवासा मिल्क, मिरज चाळीस लाख रुपये

5- अग्रणी दूध प्रकल्प मांजर्डे 63 लाख रुपये

6- 7 इतर प्रकल्प 14 लाख रुपये

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe