Gold ETF: सोन्यात गुंतवणूक करायची असेल तर गोल्ड ईटीएफमध्ये ठरेल फायद्याची! काय आहे गोल्ड ईटीएफ? कसे कराल यामध्ये गुंतवणूक?

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Gold ETF:- सध्या दिवसेंदिवस सोन्याच्या दराने प्रचंड प्रमाणात उसळी घेतली असून कधी नव्हे एवढ्या उच्चांकी पातळीवर सध्या सोने आणि चांदीचे दर आहेत. कारण सोन्याचा विचार केला तर यामध्ये केली जाणारी गुंतवणूक ही अगदी खूप वर्षांपासून केली जाते.

आज देखील बरेच व्यक्ती सोने खरेदी करण्याला प्राधान्य देतात. कारण अडीअडचणीच्या कालावधीमध्ये सोन्यातील गुंतवणूक ही बऱ्याचदा फायद्याची ठरते. यामध्ये भौतिक स्वरूपामध्ये सोन्यात गुंतवणूक केली जाते. परंतु आता सोन्यातील गुंतवणुकीचे स्वरूप देखील बदलले असून बदलत्या स्वरूपामध्ये किंवा पर्यायांमध्ये जर तुम्ही सोन्याची गुंतवणूक केली तर गुंतवणूकदारांना त्यापासून चांगला फायदा मिळू शकतो.

सध्या जर आपण एमसीएक्स वर सोन्याचे दर पाहिले तर ते 70 हजाराच्या बरेच पुढे गेलेले आहेत येणाऱ्या काही दिवसांमध्ये यामध्ये वाढ होण्याची शक्यता आहे. त्यामुळे भविष्याकरिता जर तुम्ही सोन्यात गुंतवणूक केली तर ते फायद्याची ठरू शकते. याकरिता सोन्यात गुंतवणूक करण्याचा तुमच्या प्लॅनिंग असेल तर तुम्ही प्रत्यक्ष सोन्याऐवजी गोल्ड ईटीएफमध्ये गुंतवणूक करू शकतात. त्यामुळे या लेखात आपण गोल्ड ईटीएफ म्हणजे नेमके काय व त्याचे फायदे काय मिळतात? याबद्दल माहिती  घेऊ.

 गोल्ड ईटीएफ म्हणजे काय?

गोल्ड ईटीएफ हा एक म्युच्युअल फंडाचा गुंतवणूक पर्याय असून तो प्रामुख्याने सोन्याची वाढते आणि घसरलेले दर यावर अवलंबून आहे. महत्त्वाचे म्हणजे गोल्ड ईटीएफ ची शेअर्स प्रमाणे बीएससी आणि एनएसईवर खरेदी आणि विक्री केली जाते. परंतु या प्रकारांमध्ये तुम्ही गुंतवणूक केली तर तुम्हाला सोनं मिळत नाही.

परंतु या पर्याया मधून जेव्हा तुम्हाला बाहेर पडायचे असते तेव्हा तुम्हाला सोन्याची किमती एवढे पैसे मात्र मिळतात. ज्याप्रमाणे आपण भौतिक सोन्यामध्ये गुंतवणूक करतो त्यापेक्षा यामध्ये गुंतवणूक करणे खूप सोपे आहे. या पर्यायांमध्ये सोने युनिटमध्ये खरेदी केली जाते. म्हणजे अगदी सोप्या भाषेत समजून घ्यायचे असेल तर एक गोल्ड ईटीएफ युनिट म्हणजे एक ग्रॅम सोने  होय. तुम्ही तुमच्या बजेटप्रमाणे यात एक किंवा दोन युनिट सोने खरेदी करू शकतात.

जसे आपण भौतिक स्वरूपामध्ये सोन्याची खरेदी सोनाराच्या दुकानावर करतो तेव्हा तुम्ही एखादी लहान अंगठी खरेदी केली तरी तिचे वजन चार ते पाच ग्रॅम असेल. याकरिता तुम्हाला जास्त पैसा लागतो. परंतु गोल्ड ईटीएफमध्ये तुम्ही कमी किमतीत देखील खरेदी करू शकतात.

सगळ्यात महत्वाचे म्हणजे एसआयपीच्या माध्यमातून देखील तुम्हाला गोल्ड ईटीएफ खरेदी करता येतो. तसेच यामध्ये कुठल्याही प्रकारच्या सुरक्षिततेबद्दल काळजी करण्याची गरज नसते. त्याप्रमाणे तुम्ही शेअर्स किंवा इलेक्ट्रॉनिक सोने डिमॅट खात्यात ठेवू शकतात अगदी त्याचप्रमाणे गोल्ड ईटीएफ मध्ये देखील सुविधा मिळते.

 गोल्ड एटीएफ खरेदी करण्यासाठी किती चार्ज लागतो?

तेव्हा आपण सोन्याची खरेदी करतो तेव्हा आपल्याला ते सोने बनवण्यासाठी चार्ज म्हणजेच मेकिंग चार्ज द्यावा लागतो. त्यामुळे सोन्याचे किमतीत आणखी वाढ होते. परंतु गोल्ड ईटीएफमध्ये या प्रकारचा कुठलाही मेकिंग चार्ज तुम्हाला द्यावा लागत नाही.

गोल्ड ईटीएफ खरेदी करायचा असेल तर तुम्हाला एक टक्का किंवा तिच्या कमी ब्रोकरेज आकारले जाते व तुमच्या यातील पोर्टफोलिओ मॅनेज करण्यासाठी वर्षाला एक टक्के चार्ज द्यावा लागतो. या पद्धतीने यासाठी लागणारा चार्ज बघितला तर तो बहुतेक सोन्याच्या मेकिंग चार्ज पेक्षा खूप कमी आहे.

 गोल्ड ईटीएफमध्ये कशी कराल गुंतवणूक?

याकरता तुम्हाला सगळ्यात आधी डिमॅट खाते उघडावे लागेल व तुम्ही एनएसईवर असलेल्या गोल्ड ईटीएफचे युनिट खरेदी करू शकतात. जेव्हा तुम्ही हे युनिट खरेदी कराल तेव्हा तुमच्या डिमॅट खात्याची लिंक असलेल्या बँक खात्यातून तितकी रक्कम कापली जाते व पुढील एक ते दोन दिवसांनी तुमच्या खात्यामध्ये गोल्ड ईटीएफ जमा केले जातात. तुम्हाला जर हे विकायचे असतील तर ते ट्रेडिंग खात्याद्वारे विकले जातात.