Gold-Silver Rate Today: सोन्याचा 10 ग्रॅमचा दर पहाल तर सरकेल पायाखालची जमीन! वाचा आजचे सोन्या आणि चांदीचे दर

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Gold-Silver Rate Today:- सध्या दिवाळीचा सण सुरू असून सोने आणि चांदी खरेदी करणाऱ्यांची संख्या लक्षणीयरीत्या वाढल्याचे सध्या चित्र आहे. सध्या सोन्या आणि चांदीच्या दरामध्ये वाढ होताना दिसून येत असून बुलियन मार्केट वेबसाईटनुसार जर विचार केला तर मुंबईमध्ये आज 22 कॅरेट सोन्याची किंमत ५४९८२ रुपये प्रति दहा ग्रॅम इतकी आहे.

तर 24 कॅरेट सोन्याची किंमत 59 हजार 980 रुपये प्रति दहा ग्राम आहे. तसेच पुण्यामध्ये देखील प्रति दहा ग्रॅम 22 कॅरेट सोन्याचा दर हा 54982 तर 24 कॅरेट सोन्याचा दर हा 59 हजार 980 रुपये असेल. यावरून आपल्याला सोन्याच्या दराची पातळी लक्षात येऊ शकते. याच अनुषंगाने आपण सोने आणि चांदीचे आजचे दर किती आहेत? त्याबद्दलची माहिती बघणार आहोत.

 आजचे सोन्याचांदीचे दर

1- 22 कॅरेट सोन्याचे दर 22 कॅरेट सोन्याचे आजचे दर 55 हजार 700 रुपये प्रति दहा ग्रॅम असून एक ग्रॅम 22 कॅरेट सोन्याची किंमत आज 5570 इतकी आहे.

2- 24 कॅरेट सोन्याचे आजचे भाव 24 कॅरेट सोन्याचे आजचे भाव 60750 रुपये प्रति दहा ग्राम असून एका ग्रॅमसाठी आज सहा हजार 75 रुपये इतके पैसे मोजावे लागतील.

3- 18 कॅरेट सोन्याचे आजचे भाव 18 कॅरेट सोन्याचे आजचे भाव 45 हजार 570 रुपये प्रति दहा ग्राम असून एक ग्रॅम 18 कॅरेट सोन्याचे भाव चार हजार 557 रुपये इतके आहे.

 सोन्याची शुद्धता कशी तपासावी?

सोन्याची शुद्धता तपासण्यासाठी तुम्ही ‘बीआयएस केअर ॲप’चा वापर करू शकतात. या ॲप्लिकेशनच्या माध्यमातून तुम्ही सोन्याचे शुद्धताच नाही तर तक्रार सुद्धा नोंदवू शकतात. यामध्ये प्रामुख्याने 24 कॅरेट शुद्ध सोन्यावर 999 असे लिहिलेले असते. 22 कॅरेट शुद्ध सोन्यावर 916 असे लिहिलेले असते. 21 कॅरेट शुद्ध सोन्यावर 875 रुपये लिहिलेले असते. 18 कॅरेट शुद्ध सोन्यावर 750 रुपये लिहिलेले असते तर 14 कॅरेट शुद्ध सोन्यावर 585 लिहिलेले असते.