Highest FD Interest Rate : ‘या’ बँका FD वर देत आहेत सार्वधिक व्याज; पहा यादी

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Highest FD Interest Rate : गेल्या काही काळापासून एफडीच्या दारात सतत वाढ होताना दिसत आहे. आरबीआयने रेपो दरात केलेल्या वाढीमुळे मागील काही दिवसांपासून एफडीवरील व्याजात लक्षणीय वाढ झाली आहे. एफडी ही सुरक्षित गुंतवणूक मनाली जाते म्हणून देशातील ज्येष्ठ नागरिक एफडीमध्ये गुंतवणूक करण्यास प्राधान्य देतात. दरम्यान, आजच्या लेखात आम्ही तुम्हाला त्या बँकांबद्दल माहिती देणार आहोत ज्या FD वर सर्वाधिक व्याज ऑफर करतात.

एफडीवर सर्वाधिक व्याजदर देण्याऱ्या बँका :-

सूर्योदय स्मॉल फायनान्स बँकेच्या वतीने ज्येष्ठ नागरिकांना तीन वर्षांच्या एफडीवर ९.१० टक्के व्याज दिले जात आहेत. त्याच वेळी, बँक या कालावधीतील एफडीवर सामान्य गुंतवणूकदारांना 8.60 टक्के व्याज देत आहे. सूर्योदय स्मॉल फायनान्स सध्या एफडीवर सार्वधिक व्याज देत आहे. जर तुम्हाला तुमच्या गुंतवणुकीवर चांगला परतावा हवा असेल तर तुम्ही येथे गुंतवणूक करू शकता.

नंतर नंबर येतो तो म्हणजे उत्कर्ष स्मॉल फायनान्स बँकेचा या बँकेकडून ज्येष्ठ नागरिकांना तीन वर्षांच्या एफडीवर 8.85 टक्के व्याज दिले जात आहे. सामान्य गुंतवणूकदारांना बँकेकडून या कालावधीतील एफडीवर 8.25 टक्के व्याज दिले जात आहे.

फिनकेअर स्मॉल फायनान्स बँकेच्या वतीने, ज्येष्ठ नागरिकांना तीन वर्षांच्या कालावधीसाठी FD वर 8.60 टक्के व्याज दिले जात आहे. तर सामान्य गुंतवणूकदारांना 8.00 टक्के व्याज मिळत आहे.

त्याचवेळी DCB बँकेकडून ज्येष्ठ नागरिकांना तीन वर्षांच्या FD वर 8.50 टक्के व्याज दिले जात आहे. आणि सामान्य गुंतवणूकदारांसाठी ते 8.00 टक्के आहे.

इंडसइंड बँकेकडून ज्येष्ठ नागरिकांना तीन वर्षांच्या बँक एफडीवर 8 टक्के व्याज दिले जात आहे. त्याच वेळी, सामान्य गुंतवणूकदारांसाठी ते 7.25 टक्के आहे.

एसबीएम बँकेच्या वतीने तीन वर्षांच्या एफडीवर सामान्य गुंतवणूकदारांना 7.3 टक्के आणि ज्येष्ठ नागरिकांना 7.8 टक्के व्याज दिले जात आहे. तुम्ही तुमच्या एफडीवर जास्त परतावा मिळवू इच्छित असाल तर तुमच्यासाठी ही संधी उत्तम आहे.