Home Loan: बँक ऑफ महाराष्ट्र कडून मिळेल कमी व्याजदरात होमलोन, जाणून घ्या होमलोन विषयी महत्त्वाच्या पाच गोष्टी

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Home Loan:- स्वतःच्या घराचे स्वप्न पूर्ण करण्याच्या दृष्टिकोनातून अनेक व्यक्ती बँकेच्या माध्यमातून गृह कर्ज अर्थात होम लोनचा पर्याय स्वीकारतात. अनेक बँकांच्या माध्यमातून होम लोनची सुविधा देण्यात येते. जर आपण वेगवेगळ्या बँकांचा विचार केला तर यामध्ये व्याजदरात देखील बराच फरक असतो.

तसेच प्रक्रिया शुल्क वगैरे यामध्ये देखील फरक आपल्याला दिसून येतो. त्यामुळे तुम्हाला होम लोन घेताना कोणती बँक किती व्याजदराने कर्ज देते इत्यादी बद्दल माहिती असणे खूप गरजेचे आहे. तसेच होमलोन घेताना व्याजदर जितका महत्त्वाचा आहे तितकाच काही महत्त्वाच्या बाबी देखील आहेत त्या देखील माहीत असणे तेवढेच गरजेचे आहे.

या बँकांमध्ये जर आपण बँक ऑफ महाराष्ट्राचा विचार केला तर नुकतेच महाराष्ट्राच्या माध्यमातून होम लोनचे व्याजदर 8.35 टक्क्यांपर्यंत कमी करण्यात आलेली असून एवढेच नाही तर कर्जावरील प्रोसेसिंग फी देखील माफ करण्यात आलेली आहे. म्हणजेच आधी पेक्षा बँक ऑफ महाराष्ट्रने होमलोनचा दर 0.15 टक्क्यांनी कमी करून 8.35 टक्क्यांपर्यंत केला आहे. त्यामुळे बँक ऑफ महाराष्ट्र होमलोन विषयीची माहिती आपण या लेखात घेऊ.

 बँक ऑफ महाराष्ट्र होम लोनचे महत्वाची वैशिष्ट्ये

1- सध्या बँक ऑफ महाराष्ट्राच्या माध्यमातून होम लोन वर 8.35% ते 11.15% इतका व्याजदर आकारला जात आहे.

2- होमलोनची कमाल मुदत 30 वर्षापर्यंत/वयाच्या 75 वर्षापर्यंत आहे.

3- तसेच बँक ऑफ महाराष्ट्र कडून यावर कुठल्याही प्रकारचे प्री पेमेंट / प्री क्लोजर/ पार्ट पेमेंट शुल्क आकारले जात नाही.

4- तसेच कार आणि शैक्षणिक कर्जामध्ये होम लोन घेणाऱ्याला आरओआयमध्ये सवलत मिळते.

5- तसेच बँक ऑफ महाराष्ट्रकडून होम लोनवर कोणत्याही प्रकारचे शुल्क आकारले जात नाही व कोणतेही छुपे शुल्क म्हणजे हीडन चार्जेस लागत नाहीत.

होमलोन घ्या परंतु या महत्त्वाच्या गोष्टींचा विचार करा

1- सर्वप्रथम कर्ज किती कालावधीसाठी आहे हे पहावे शक्यतोवर अल्पमुदतीच्या होम लोनची निवड न करण्याचा सल्ला दिला जातो. कारण कर्जाचा कालावधी जितका कमी असतो तितके कमीत कमी व्याज आपल्याला द्यावे लागते. त्यामुळे कर्ज घेताना त्याचा कालावधी लक्षात घेणे गरजेचे आहे.

2- प्री पेमेंट पेनल्टीबद्दल माहिती ठेवावी बँकांच्या माध्यमातून कर्जाच्या पूर्व पेमेंटवर दंड आकारला जातो. अशा परिस्थितीमुळे बँकांच्या माध्यमातून संपूर्ण माहिती घेणे गरजेचे आहे. या संबंधीच्या महत्त्वपूर्ण अटी व नियम देखील काळजीपूर्वक वाचून घ्यावे.

3- टर्म इन्शुरन्स घेणे गरजेचे जेव्हा तुम्ही होमलोन घेता त्यावेळेसच मुदत विमा कवच घेणे खूप गरजेचे आहे. समजा अचानक मृत्यू झालास होमलोन फेडण्याचे टेन्शन वाढण्याची शक्यता असते. टर्म इन्शुरन्स मुळे कुटुंबाला आर्थिक सुरक्षा मिळते.

4- तुमचे व्यवहार असलेल्या बँकेकडूनच कर्ज घ्या ज्या बँकेमध्ये तुमचे खाते आहे आणि तुमच्या मुदत ठेवी वगैरे ठेवल्या आहेत अशा बँकेतून कर्ज घ्यावे. कारण बँक त्यांच्या नियमित ग्राहकांना सहज आणि वाजवी व्याजदरामध्ये कर्ज देत असते.

5- बँकाच्या ऑफर्स जाणून घेणे गरजेचे बँकांच्या माध्यमातून बऱ्याचदा कर्जदारांना खूप चांगल्या पद्धतीच्या ऑफर देण्यात येतात. या परिस्थितीमध्ये कर्ज घेण्यापूर्वी बँकांच्या कोणकोणत्या ऑफर्स आहेत त्या जाणून घेणे गरजेचे आहे व प्रोसेसिंग फी बद्दल देखील माहिती करून घ्यावी.

 काही प्रमुख बँकांचे होम लोनचे व्याजदर

1- स्टेट बँक ऑफ इंडिया तीस लाखापर्यंत कर्जावर 8.40 ते 10.15%, तीस लाखांपेक्षा जास्त आणि 75 लाखांपर्यंत 8.40% ते 10.5% आणि 75 लाखांपेक्षा जास्त कर्ज असेल तर 8.40% ते 10.5%

2- बँक ऑफ इंडिया तीस लाखापर्यंत ८.३०% टक्के ते 10.75%, तीस लाखांपेक्षा जास्त आणि 75 लाखांपर्यंत 8.30 ते 10.75% आणि 75 लाखांपेक्षा जास्त 8.30 ते 10.75%

3- कॅनरा बँक तीस लाखांपर्यंत 8.50% ते 11.25%, तीस लाखांपेक्षा जास्त आणि 75 लाखांपर्यंत 8.45% ते 11.25 टक्के आणि 75 लाखांपेक्षा जास्त 8.40% ते 11.15%

4- बँक ऑफ बडोदा तीस लाखांपर्यंत 8.40% ते 10.65%, तीस लाखांपेक्षा जास्त आणि 75 लाखांपर्यंत 8.40% ते 10.65% 75 लाखांपेक्षा जास्त 8.40% ते 10.90%

5- पंजाब नॅशनल बँक तीस लाखांपर्यंत 8.45% ते 10.25 टक्के, तीस लाखांपेक्षा जास्त आणि 75 लाखांपर्यंत 8.40% ते 10.15% आणि 75 लाखांपेक्षा जास्त 8.40% ते 10.15%