Home Loan Tips: होमलोनमध्ये कर्जाची पुनर्रचना फायद्याची आहे की तोट्याची? होम लोन घेताना टाळा या चुका

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Home Loan Tips:- स्वतःच्या घराचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी प्रत्येक जण इच्छुक असतात व त्या पद्धतीने तयारी देखील करत असतात. परंतु घरांच्या वाढत्या किमती पाहता प्रत्येकाला स्वतःचे घर घेणे शक्य होत नाही. तसेच ज्या व्यक्तींना ते शक्य असते त्यांच्याकडे देखील पुरेसा पैसा उपलब्ध नसतो व त्यामुळे  गृह कर्जाचा आधार घेतला जातो व घराची खरेदी केली जाते.

गृहकर्ज घेत असताना आपण बँकांच्या माध्यमातून ते घेतो व साहजिकच आहे की कुठलेही कर्ज देताना बँकांच्या काही नियम व अटी असतात व त्या तुम्हाला पूर्ण करणे किंवा पाळणे खूप गरजेचे असते. गृह कर्ज अर्थात  होम लोन हे दीर्घ कालावधीकरिता मिळते व आपल्याला वीस ते तीस वर्ष कालावधी करिता या कर्जाचे ईएमआय भरावे लागू शकतात.

परंतु या कालावधीमध्ये अनेक नियमांचा प्रत्यक्षरीत्या आपल्या कर्जाच्या हप्त्यांवर किंवा कर्जावर परिणाम होत असतो.त्यामुळे काही चुका जर घडल्या तर वीस वर्षाच्या होमलोन पूर्ण करण्यासाठी आपल्याला 25 ते 30 वर्षाचा कालावधी लागू शकतो व आपले खूप मोठ्या प्रमाणावर आर्थिक नुकसान होण्याची शक्यता असते.

 होम लोनच्या कालावधीत वाढ कशी होऊ शकते?

बऱ्याचदा रिझर्व बँकेकडून रेपो रेटमध्ये बदल केले जातात व त्यामुळे व्याजदरात देखील बदल होतात. अशा व्याजदरात बदल झाल्यामुळे गृहकर्जाच्या परतफेडीचा कालावधीत देखील बदल होतो किंवा तो वाढतो. बऱ्याचदा आपण याकडे लक्ष देत नाही. परंतु जेव्हा आपल्या लक्षात येते तेव्हा वेळ झालेला असतो व कर्जाचा कालावधी खूप मोठा होतो. वेळ निघून गेल्यावर आपण बँकेकडे याबाबतची तक्रार करतो व यामुळे काही फायदा होत नाही.

याबाबतीत उदाहरणच घ्यायचे झाले तर जर सुरेशने वीस वर्षाकरिता आठ टक्के दराने तीस लाख रुपयांचे कर्ज घेतले व सुरेश त्यासाठी पंचवीस हजार 93 रुपयांचा ईएमआय भरत आहे. परंतु बँकांचा विचार केला तर बऱ्याचदा बँका गृह कर्ज देताना ते फ्लोटिंग रेट वर देतात. फ्लोटिंग रेट व्याजदर म्हणजे रिझर्व बँकेचा रेपो रेट वर हा फ्लोटिंग  रेट अवलंबून असतो. म्हणजेच रिझर्व बँकेने जर रेपो रेट वाढवला तर गृह कर्जावरील व्याजदर वाढतो व कमी केला तर व्याजदर कमी होतो.

गृह कर्ज घेतल्यानंतर पाच वर्षांनी तुमचा गृह कर्जाचा दर अकरा टक्के होतो व सुरेशने घेतलेल्या 30 लाख रुपयांच्या सुरुवातीची थकीत रक्कम ही 26 लाख रुपयांच्या जवळपास येते. कारण सुरुवातीचे जे काही ईएमआय भरलेले असतात त्यामध्ये व्याजाचा घटक जास्त असतो व मूळ रक्कम ही कमी असते. यामुळे पाच वर्षानंतर सुरेशला वाटेल की ईएमआय करिता अजून पंधरा वर्षे बाकी आहेत.

परंतु असे न होता व्याजदर वाढल्यामुळे तुमच्या कर्जाच्या मुदतीशी तो जुळवून घेतला जातो. ग्राहकांना जास्त हप्त्याचा बोजा सोसावा लागू नये म्हणून बँकांच्या माध्यमातून असे केले जाते. बँकांच्या माध्यमातून देखील अशा प्रकारे काळजी घेणे गरजेचे आहे कारण की जितका जास्तीत जास्त कालावधी करिता ईएमआय भराल तितके जास्त बँकेचे उत्पन्न तुमच्याकडून मिळत राहील.

समजा सुरेशने जर पंचवीस हजार 93 रुपयेच ईएमआय तसाच ठेवला तर तुमच्या कर्जाचा उरलेला कालावधी हा पंधरा वर्षाचा नव्हे तर चक्क 28 वर्षांचा होतो. यामध्ये जर ईएमआय पंधरा वर्षानुसार पाहिला तर तो जवळपास 29 हजार पाचशे रुपयांपर्यंत वाढेल. अशाप्रकारे तुम्ही वीस वर्षात बँकेला किंवा लोकांना पैसे देणार आहात त्यांची परतफेड करण्यासाठी तुम्हाला सुमारे 33 वर्षाचा कालावधी लागतो.

 अशा परिस्थितीतून बाहेर निघण्यासाठी काय कराल?

यामुळे गृहकर्जाचा कालावधी जर तुम्हाला वाढवायचा नसेल तर तुम्ही जेव्हा जेव्हा व्याजदरात वाढ होईल तेव्हा तुम्हाला बँकेशी बोलून तुमच्या कर्जाची पुनर्रचना करणे गरजेचे आहे. कर्जाच्या पुनर्रचनेमध्ये तुम्ही  बँकेला कर्ज परतफेडची मुदत वाढवण्यास नव्हे तर नव्या व्याजदरानुसार ईएमआय वाढवण्यास सांगावे लागते.

परंतु बरेच जण असे करत नाही व इथेच चूक होते व बँकेकडून कर्जाची पुनर्रचना करत नाहीत व जास्त कालावधी करिता पैसे भरत राहतात. त्यामुळे व्याजदर जर वाढला तर त्यानुसार तुमच्या कर्जाची पुनर्रचना म्हणजेच ईएमआय वाढवून घेणे कधीही फायद्याचे ठरते.