Post Office Scheme: पोस्ट ऑफिसच्या ‘या’ योजनेत 1,2,3 आणि 5 वर्षाकरिता 2 लाख रुपये गुंतवले तर किती परतावा मिळेल? वाचा माहिती

पैसे कमावणे व त्या पैशांची बचत करून योग्य ठिकाणी गुंतवणूक करण्याला खूप महत्त्व असते. सध्या गुंतवणुकीचे अनेक पर्याय उपलब्ध असून प्रत्येक गुंतवणूकदार त्यांची आवड आणि मुख्य परतावा या दृष्टिकोनातून गुंतवणूक पर्याय निवडत असतात. या सगळ्यांमध्ये पोस्ट ऑफिस आणि बँक यांच्या योजनांना खूप मोठ्या प्रमाणावर गुंतवणूकदारांकडून पसंती दिली जाते.

Ajay Patil
Published:
post office scheme

Post Office Scheme:- गुंतवणूक ही संकल्पना मुळात आर्थिक स्वरूपाची असली तरी ती व्यक्तीच्या सामाजिक आणि भविष्यकालीन जीवनावर खूप मोठा प्रभाव पडत असते. कारण व्यक्तीचे जर आर्थिक दृष्टिकोनातून समृद्ध परिस्थिती असेल तर त्याचे भविष्यकालीन जीवन समृद्ध असतेस आणि सामाजिक जीवनात देखील त्याला तितकाच मानसन्मान मिळत असतो.

पैसे कमावणे व त्या पैशांची बचत करून योग्य ठिकाणी गुंतवणूक करण्याला खूप महत्त्व असते. सध्या गुंतवणुकीचे अनेक पर्याय उपलब्ध असून प्रत्येक गुंतवणूकदार त्यांची आवड आणि मुख्य परतावा या दृष्टिकोनातून गुंतवणूक पर्याय निवडत असतात. या सगळ्यांमध्ये पोस्ट ऑफिस आणि बँक यांच्या योजनांना खूप मोठ्या प्रमाणावर गुंतवणूकदारांकडून पसंती दिली जाते.

कारण या ठिकाणी केलेली गुंतवणूक सुरक्षित राहतेच आणि परतावा देखील उत्तम मिळतो. या अनुषंगाने जर आपण गुंतवणुकीची सुरक्षितता आणि मिळणारा परतावा या दृष्टिकोनातून पोस्ट ऑफिसची डिपॉझिट स्कीम म्हणजेच मुदत ठेव योजना बघितली तर ती तुमच्यासाठी एक सुरक्षित योजना असून या ठिकाणी केलेल्या गुंतवणुकीवर कुठल्याही प्रकारची जोखीम गुंतवणूकदाराला नसते.

त्यामुळे आपण या लेखात पोस्ट ऑफिस एफडी स्कीममध्ये जर दोन लाख रुपयांची गुंतवणूक केली तर कालावधीनुसार किती परतावा मिळू शकतो? याची माहिती बघणार आहोत.

 कसे आहे पोस्ट ऑफिसच्या एफडी स्कीमचे स्वरुप?

पोस्ट ऑफिसच्या या योजनेमध्ये इतर बँकांच्या मुदत ठेव योजनेपेक्षा जास्त व्याज मिळते व महत्त्वाचे म्हणजे हे व्याज तीन महिन्यांनी खात्यात जमा होते व या माध्यमातून गुंतवणूकदाराला निश्चित उत्पन्नाची हमी मिळते. ज्यांना थोडी देखील  जोखीम हवी नसेल अशा गुंतवणूकदारांसाठी पोस्ट ऑफिस एफडी स्कीम महत्त्वाची आहे.

या योजनेमध्ये तुम्ही एक वर्ष तसेच दोन वर्ष, तीन किंवा पाच वर्षांसाठी गुंतवणूक करू शकतात. या योजनेत कमीत कमी 1000 रुपये तुम्ही खाता उघडू शकता व कमाल गुंतवणुकीला कुठल्याही प्रकारची मर्यादा नाही. या योजनेत एकल किंवा जॉईंट म्हणजे संयुक्त खाते उघडता येते व जास्तीत जास्त तीन व्यक्ती मिळून खाते उघडू शकतात.

 या योजनेचा कालावधी मिळणारा नफा

1- एक वर्षाच्या कालावधी करिता दोन लाख रुपयांची गुंतवणूक केली तर यामध्ये साबण 6.9% वार्षिक व्याजदर मिळतो व ज्याचा फोटो तुम्हाला एक वर्षात 14,161 रुपये मिळतात. म्हणजेच तुमची केलेली दोन लाख रुपये गुंतवणूक आणि त्यावर मिळालेले व्याज असे मिळून तुम्हाला एक वर्षात दोन लाख 14 हजार 161 रुपये परत मिळतात.

2- दोन वर्षांसाठी दोन लाख रुपयांची गुंतवणूक केली तर या योजनेमधून सात टक्के वार्षिक व्याजदर मिळतो व गेल्या दोन लाख रुपये गुंतवणुकीवर दोन वर्षात तुम्हाला 29 हजार 776 रुपये व्याज मिळते. असे मिळून तुम्हाला दोन लाख 29 हजार 776 रुपये मिळतात.

3- तीन वर्षांसाठी दोन लाख रुपयांची गुंतवणूक केली तर यावर तुम्हाला 7.1% वार्षिक व्याजदर मिळतो केलेल्या दोन लाख रुपये गुंतवणुकीवर तीन वर्षाच्या कालावधीत तुम्हाला एकूण 47 हजार पंधरा रुपये इतके व्याज मिळते व गुंतवलेले दोन लाख व मिळणारे व्याज मिळून तुम्हाला तीन वर्षात दोन लाख 47 हजार पंधरा रुपये इतका रिटर्न मिळतो.

4- पाच वर्षाच्या कालावधी करिता दोन लाख रुपयांचे गुंतवणूक केली तर त्यावर तुम्हाला 7.5% इतका वार्षिक व्याजदर मिळतो व पाच वर्षाच्या कालावधीत तुम्हाला एकूण 89 हजार 990 रुपये व्याज मिळते. अशाप्रकारे पाच वर्षाच्या दोन लाख रुपये गुंतवणुकीवर तुम्हाला एकूण दोन लाख 89 हजार 990 रुपये परत मिळतात.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe