Mutual Fund SIP : करोडपती होण्यासाठी SIP मध्ये दरमहा किती गुंतवणूक करावी लागेल? वाचा…

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Mutual Fund SIP : श्रीमंत होण्यासाठी चांगली नोकरी आवश्यक नाही तर, योग्य गुंतवणूक करणे गरजेचे आहे. योग्य गुंतवणूक करून तुम्ही कमी पैशातही श्रीमंत होऊ शकता. फक्त तुमच्याकडे उत्तम योजना असणे गरजेचे आहे. अशीच एक योजना म्हणजे म्युच्युअल फंड SIP, तुम्ही SIP मध्ये गुंतवणूक करून भविष्यात श्रीमंत होऊ शकता. होय, अगदी कमी गुंतवणूक करून जास्त पैसे कमावू शकता.

तज्ज्ञांचे असे म्हणणे आहे की सिस्टिमॅटिक इन्व्हेस्टमेंट स्कीम (SIP) द्वारे म्युच्युअल फंडात गुंतवणूक केल्याने दीर्घकालीन उत्कृष्ट परतावा मिळतो. कारण, गुंतवणूकदारांना चक्रवाढ परताव्याचा लाभ मिळतो. जर तुम्हालाही एका म्युच्युअल फंडाद्वारे करोडपती व्हायचे आहे, तर तुम्हाला त्याबद्दल योग्य माहिती असणे आवश्यक आहे. जर तुम्हाला भविष्यात करोडपती व्हायचे असेल तर तुम्हाला दरमहा 10,000 रुपयांची SIP सुरु करावी लागेल.

मागील आकडेवारीनुसार, 10,000 रुपयांची SIP रक्कम 20 वर्षात गुंतवणूकदाराला लक्षाधीश बनवू शकते. तर, 20 हजार मासिक ठेवीदारांना 15 वर्षांत लक्षाधीश आणि 13 वर्षांत 25,000 गुंतवणूक करून करोडपती बनवू शकते. दुसरीकडे, जर दरमहा 30,000 रुपयांची गुंतवणूक केली तर 12 वर्षांपेक्षा जास्त कालावधीसाठी SIP द्वारे गुंतवणूकदार करोडपती होऊ शकतो .

गुंतवणूकदार कोणत्याही वार्षिक वाढीशिवाय 40,000 च्या मासिक SIP सह फक्त 10 वर्षांमध्ये लक्षाधीश होऊ शकतात, तर 50,000 मासिक SIP तुम्हाला सुमारे नऊ वर्षांत लक्षाधीश बनवेल. सात वर्षांमध्ये 75000 आणि 1 लाखाची मासिक SIP केवळ पाच वर्षात तुम्हाला करोडपती बनवेल. जर तुम्हाला कमी कालावधीत करोडपती व्हायचे असेल तर तुम्हाला गुंतवणुकीची रक्कम वाढवावी लागेल. पण जर तुम्हाला कमी गुंतवणुकीत जास्त परतावा असेल तर तुम्हला दीर्घकालीन गुंतवणूक करावी लागेल.

गुंतवणूक करताना फक्त “म्युच्युअल फंडाचा 15 X 15 X 15 नियम लक्षात ठेवण्याची गरज आहे. हा नियम सांगतो की, जर गुंतवणूकदाराने 15 वर्षांसाठी 15,000 ची गुंतवणूक केली, तर तो 15% परताव्याची अपेक्षा करू शकतो आणि मॅच्युरिटी रक्कम सुमारे 1 कोटी मिळवू शकतो.”