प्रत्येक जणांचे विविध बँकांमध्ये बचत खाते असतात व या बचत खात्याच्या संदर्भात त्या त्या बँकांचे वेगवेगळे नियम असतात व अशा प्रकारचे नियम हे खातेधारकांवर बंधनकारक देखील असतात. याचप्रमाणे बऱ्याच जणांचे आयसीआयसीआय आणि येस बँकेमध्ये देखील बचत खाते आहे
वा आता या दोन्ही बँकांनी काही महत्त्वपूर्ण निर्णय घेतले असून या घेतलेल्या निर्णयाची अंमलबजावणी 1 मे पासून होणार असल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे या बँकांच्या ग्राहकांना आर्थिक दृष्टिकोनातून काही बोजा सहन करावा लागू शकतो तर काही खात्यांच्या संदर्भात देखील काही समस्या निर्माण होऊ शकतात.
आयसीआयसीआय आणि येस बँकेने घेतले महत्त्वपूर्ण निर्णय
येस बँकेच्या माध्यमातून बँकेच्या अधिकृत संकेतस्थळावर याबाबतची माहिती दिली असून त्यांनी दिलेल्या माहितीनुसार या बँकेच्या बचत खात्यांचे जे काही विविध प्रकार आहेत त्यामधील किमान सरासरी शिल्लक मर्यादा बदलण्यात आलेली आहे. ती म्हणजे..
1- येस बँकेच्या प्रोमॅक्स खात्यातील किमान सरासरी शिल्लक म्हणजेच मिनिमम बॅलन्स हा 50 हजार रुपये असेल व कमाल शुल्क हे 1000 रुपये निश्चित करण्यात आले आहे.
2- त्यासोबतच येस बँकेचे बचत खाते प्रो प्लस, Essence SA आणि एस रिस्पेक्ट एसए मधील किमान शिल्लक मर्यादा आता 25 हजार रुपये असणार असून शुल्काची कमाल मर्यादा 750 रुपये निश्चित करण्यात आली आहे.
3- तसेच बचत खाते पीआरओमध्ये किमान शिल्लक दहा हजार रुपये व शुल्कासाठीची कमाल मर्यादा साडेसातशे रुपये निश्चित करण्यात आली आहे.
येस बँकेने घेतला हे खाते बंद करण्याचा निर्णय
येस बँकेच्या माध्यमातून अनेक खाती बंद करण्याचा निर्णय घेतला आहे व यामध्ये सेविंग एक्सक्लुसिव्ह, एस सेविंग सिलेक्ट या खात्यांचा समावेश आहे.
आयसीआयसीआय बँकेने कोणते केले बदल?
आयसीआयसीआय बँकेच्या माध्यमातून देखील किमान सरासरी शिल्लक तसेच रोख व्यवहारासाठी आकारण्यात येणारे शुल्क व एटीएम इंटरचेंज फी इत्यादीमध्ये बदल करण्यात आलेला आहे. एवढेच नाही तर आयसीआयसीआय बँकेच्या माध्यमातून देखील काही खाती बंद करण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे.
साधारणपणे प्रिव्हिलेज अकाउंट्स अडवांटेज वुमन सेविंग अकाउंट, ऍसेट लिंक्ड सेविंग अकाउंट,ऑरा सेविंग अकाउंट व अडवांटेज वूमन सेविंग अकाउंट या खात्यांचा समावेश आहे. ही खाती आयसीआयसीआय बँक आता बंद करणार आहे.
आयसीआयसीआय बँकेने आकारण्यात येणाऱ्या काही शुल्कामध्ये केले हे बदल
1- आयसीआयसीआय बँकेने आता डेबिट कार्ड साठी लागणारे वार्षिक शुल्क दोन हजार रुपये केले आहे व ते ग्रामीण भागासाठी वार्षिक 99 रुपये असणार आहे.
2- एका वर्षामध्ये जर 25 पानी चेकबुक घेतले तर ते निशुल्क असेल. परंतु त्यानंतर घेतलेल्या प्रत्येक पानाकरिता चार रुपये एवढे शुल्क मोजावे लागेल.
3- आईएमपीएस व्यवहाराच्या रकमेवर आता प्रति व्यवहार दोन रुपये 50 पैसे ते 15 रुपये दरम्यान शुल्क आकारले जाणार आहे.
4- एवढेच नाही तर बिगरगृह शाखा व गृह शाखांचे व्यवहार शुल्क आता समायोजित केले जाणार असून यामध्ये थर्ड पार्टी ट्रांजेक्शन चा देखील समावेश करण्यात आलेला आहे.