बँकेतून कुठल्याही प्रकारचे कर्ज घेतले आणि कर्जदाराचाच मृत्यू झाला तर कर्ज परतफेडीचे काय? काय आहेत नियम?

कुठलीही बँक कर्ज देताना अटी व शर्ती तसेच नियमांच्या अधीन राहुन कर्ज देत असते. परंतु एखाद्या वेळी ज्या व्यक्तीने कर्ज घेतले आहे अशा व्यक्तीचा मृत्यू झाला तर मात्र अशावेळी कर्ज कोण परतफेड करेल?हा देखील एक मोठा प्रश्न या निमित्ताने आपल्यासमोर येतो.

Ajay Patil
Published:
bank loan refund rule

कर्ज घेणे सध्या अगदी सहज आणि सोपे झाले आहे व अनेक बँकांच्या माध्यमातून कर्जाची प्रक्रिया देखील आता सुटसुटीत आणि सोपी झाल्याने गेल्या काही वर्षापासून जर आपण बघितले तर कर्जाचा आकडा आपल्याला सातत्याने वाढताना दिसून येत आहे.

या घेण्यात येणाऱ्या कर्जामध्ये होम लोन, कार लोन तसेच वैयक्तिक म्हणजेच पर्सनल लोन इत्यादींचा मोठ्या प्रमाणावर समावेश आहे. तसेच दुसरे म्हणजे सध्या क्रेडिट कार्ड वापराचा ट्रेंड मोठ्या प्रमाणावर असल्याचे आपल्याला दिसून येते व हा देखील एक कर्जाचाच प्रकार आहे.

कुठलीही बँक कर्ज देताना अटी व शर्ती तसेच नियमांच्या अधीन राहुन कर्ज देत असते. परंतु एखाद्या वेळी ज्या व्यक्तीने कर्ज घेतले आहे अशा व्यक्तीचा मृत्यू झाला तर मात्र अशावेळी कर्ज कोण परतफेड करेल?

हा देखील एक मोठा प्रश्न या निमित्ताने आपल्यासमोर येतो. तर यामध्ये जर आपण बघितले तर कोणत्या प्रकारचे कर्ज घेतलं आहे? यावर ते सगळं अवलंबून असल्याचे आपल्याला दिसून येते.

 कर्ज घेतलेल्या कर्जदाराचा मृत्यू झाला तर कर्जाची परतफेड कोण करेल?

1- होम लोनच्या बाबतीत जर आपण घर खरेदीसाठी किंवा घर बांधण्यासाठी होम लोन घेतलेले असेल तर त्या बदल्यात तारण म्हणून आपण घराचे कागदपत्रे किंवा आपण ज्या रकमेचे कर्ज घेत आहात त्या रकमेएवढी कुठली तरी मालमत्ता आपल्याला बँकेकडे तारण ठेवणे गरजेचे असते.

त्यामुळे अशा परिस्थितीत जर होम लोन घेतलेल्या कर्जदाराचा मृत्यू झाल्यास त्या लोनची परतफेडीची जबाबदारी ही व्यक्तींच्या वारसांवर किंवा त्याचा कोणी सह अर्जदार असेल तर त्याच्यावर असते. समजा त्यांनी जर त्या घेतलेल्या कर्जाची परतफेड केली नाही तर बँक त्यांच्याकडे कर्ज घेतेवेळी तारण ठेवलेल्या मालमत्तेचा लिलाव करून पैसे वसूल करण्याचा निर्णय घेऊ शकते.

दुसरी बाब म्हणजे जर एखाद्या व्यक्तीने त्यांनी घेतलेल्या गृह कर्जाचा विमा घेतला असेल तर त्याच्या मृत्यूनंतर उर्वरित कर्जाची जी काही थकबाकीची रक्कम असेल ती विमा कंपनीच्या माध्यमातून वसूल केली जाऊ शकते.

2- कार लोनच्या बाबतीत सध्या मोठ्या प्रमाणावर लोन घेऊन कार खरेदी करण्याचे प्रमाण मोठ्या प्रमाणावर वाढलेले आहे. यामध्ये जर एखाद्या व्यक्तीने वाहन कर्ज घेतले असेल व त्याचा मृत्यू झाला तर व्यक्तीचे वारस किंवा इतर कुटुंबातील सदस्य यांना कर्ज परतफेड करण्याबाबत सांगितले जाते.

परंतु कुटुंबातील सदस्य किंवा वारसांकडून जर कर्जाची रक्कम परतफेड करण्यास समस्या निर्माण झाली किंवा ते असमर्थ ठरले तर बँक किंवा कर्ज देणाऱ्या फायनान्स कंपन्यांच्या माध्यमातून संबंधित वाहन किंवा कार जप्त केले जाऊ शकते व त्या वाहनाची किंवा कारची विक्री करून बँक अथवा फायनान्स कंपन्या त्यांच्या कर्जाचे थकबाकी वसूल करू शकतात.

3- वैयक्तिक कर्ज किंवा पर्सनल लोनच्या बाबतीत सध्या आपत्कालीन परिस्थितीत आर्थिक गरज भागवण्यासाठी पर्सनल लोन घेण्याचे प्रमाण देखील खूप मोठ्या प्रमाणावर वाढले आहे व या पर्सनल लोनचे एक वैशिष्ट्य असे असते की हे असुरक्षित प्रकारातले कर्ज असते.

म्हणजेच पर्सनल लोन घेण्यासाठी तुम्हाला कुठल्याही गोष्टीचे तारण ठेवण्याची आवश्यकता नसते. जर एखाद्या व्यक्तीने पर्सनल लोन घेतलेले असेल व कुठल्याही कारणाने जर त्याचा मृत्यू झाला तर बँकेच्या माध्यमातून कुटुंबातील कोणत्याही सदस्याला त्या पर्सनल लोनची परतफेड करण्यास सांगितले जाऊ शकत नाही.

कारण पर्सनल लोन हे संबंधित व्यक्तीने त्याच्या उत्पन्नाच्या आधारावर घेतलेले असते. जर पर्सनल लोन घेतलेल्या कर्जदाराचा मृत्यू झाला तर त्यासोबत ते लोन देखील संपुष्टात येते.

4- क्रेडिट कार्डच्या बाबतीत क्रेडिट कार्डवर आपण जी काही रक्कम वापरतो ती देखील एक कर्ज स्वरूपातच मानली जाते व ही रक्कम परत करण्याची जबाबदारी ही संबंधित क्रेडिट कार्ड धारकाची असते.

परंतु दुर्दैवाने जर क्रेडिट कार्डधारकाचा मृत्यू झाला तर बँक ही कर्जाची थकबाकी राईट ऑफ करते व कुटुंबातील कोणत्याही व्यक्तीला क्रेडिट कार्डवरील खर्च केलेल्या रकमेबद्दल परतफेड करण्यास जबाबदार धरू शकत नाही.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe