Epfo Update: आता कंपनी बदलली तर पीएफ रकमेचे काय? आता नका घेऊ टेन्शन! ईपीएफओने घेतला महत्त्वपूर्ण निर्णय

Ajay Patil
Published:
epfo update

Epfo Update:- देशामध्ये कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेचे खाजगी व सरकारी क्षेत्रातील कोट्यावधी कर्मचारी सदस्य आहेत. कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेच्या माध्यमातून कर्मचाऱ्यांच्या पीएफ खात्यातील योगदानाचे नियमन केले जाते व त्यासंबंधी वेगवेगळे नियम देखील बनवले जातात.

आपल्याला माहित आहे की आपण ज्या ठिकाणी काम करतो त्या ठिकाणी पगारातून ईपीएफ साठी काही रक्कम कापली जाते व ती आपल्या ईपीएफ खात्यामध्ये जमा होत असते. तितकीच रक्कम आपल्या नियोक्त्याकडून कडून देखील कर्मचाऱ्यांच्या ईपीएफ खात्यामध्ये जमा होत असते.

परंतु याकरिता कर्मचाऱ्याला पीएफ साठी युएएन नंबर दिलेला असतो आणि तो तुम्ही कंपनी बदलवली तरी एकच असतो. परंतु यामध्ये एक समस्या अशी होती की, एखाद्या कर्मचार्‍याने कंपनी बदलली तर त्या बदलल्या कंपनीकडे पीएफ रक्कम ट्रान्सफर करण्यासाठी सदस्याला अर्ज करावा लागत होता व त्याकरिता फॉर्म 31 भरणे गरजेचे होते.

परंतु आता या समस्येतून ईपीएफओने कर्मचाऱ्यांची मुक्तता केलेली आहे. आता याबाबत ईपीएफओच्या माध्यमातून एक नवीन नियम लागू करण्यात आला असून कर्मचाऱ्यांनी जर आता कंपनी ट्रान्सफर केली तर त्याची पीएफची रक्कम आपोआप नवीन कंपनीकडे ट्रान्सफर केली जाणार आहे व त्याकरिता सदस्याला कुठल्याही प्रकारचा अर्ज करण्याची गरज भासणार नाही.

 कंपनी बदलली तरी अर्जाविना तुमची पीएफची रक्कम होईल ट्रान्सफर

याबाबत सविस्तर वृत्त असे की, कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेकडून आता देशातील कोट्यावधी सदस्यांकरिता नियमामध्ये एक बदल करण्यात आला असून त्या नियमानुसार आता जर कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेच्या सदस्याने जर नोकरी बदलली तर त्याची पीएफची रक्कम आता नवीन कंपनीकडे ऑटोमॅटिक ट्रान्सफर केली जाणार आहे

व याकरिता सदस्याला अर्ज करण्याची देखील गरज नाही. म्हणजेच अगोदर जर अशी कंपनी बदलल्यानंतर पीएफची रक्कम ट्रान्सफर करायचे असेल तर फॉर्म 31 सबमिट करावा लागत होता. परंतु आता कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेने घेतलेल्या या नवीन निर्णयानुसार कर्मचाऱ्याला पीएफची रक्कम ट्रान्सफर करण्याकरिता फॉर्म 31 भरण्याची गरज नाही.

या अगोदर पीएफ खातेधारकांना त्यांचा युनिव्हर्सल अकाउंट नंबर अर्थात युएएन नंबर असून देखील कंपनी बदलल्यानंतर नवीन कंपनीकडे पीएफ ट्रान्सफर करण्यासाठी अर्ज व इतर गोष्टी पूर्ण करणे गरजेचे होते व याचाच भाग म्हणून फॉर्म 31 भरणे देखील महत्त्वाचे होते.

ही सगळी प्रक्रिया केल्यानंतर काही दिवसात ही रक्कम नव्या कंपनीकडे ट्रान्सफर करण्यात येत होती. परंतु आता घेतलेल्या या नवीन नियमानुसार कर्मचाऱ्याला कुठलीही प्रक्रिया करण्याची गरज नसून ऑटोमॅटिक  पीएफची रक्कम ट्रान्सफर होणार आहे.

 खातेधारकांसाठी युएएन नंबर आहे महत्त्वाचा

युनिव्हर्सल अकाउंट नंबर अर्थात युएएन हा पीएफ खातेधारकांसाठी एक महत्त्वाचे प्लॅटफॉर्म असून या क्रमांकाच्या माध्यमातून पीएफ सदस्याला एका वेळेला अनेक पीएफ खाती लिंक करण्याची सोय उपलब्ध होते एवढेच नाही

तर या क्रमांकाच्या माध्यमातून इतर सेवा देखील पुरवल्या जातात. या क्रमांकाच्या मदतीने ईपीएफओ सदस्य त्याचे युएएन कार्ड आणि पीएफ पासबुक देखील डाऊनलोड करू शकतो व त्याची एकूण शिल्लक किती आहे याची देखील माहिती एसएमएस द्वारे मिळवू शकतो.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe