भावांनो श्रीमंत व्हायचं असेल तर ‘या’ गोष्टींचे पालन करणे आहे गरजेचे! वाचा सविस्तर माहिती

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

आपण नोकरी किंवा व्यवसाय करतो आणि प्रचंड प्रमाणात मेहनत करून पैसे कमवतो. यामागे आपण श्रीमंत व्हावे किंवा आपल्याकडे मुबलक प्रमाणामध्ये पैसे असावे ती प्रत्येकाची इच्छा असते. परंतु पैशांचा विनियोग किंवा पैशांची गुंतवणूक याला खूप महत्त्व आहे. तुम्ही किती पैसे कमावता यापेक्षा तुम्ही कमवलेले पैशांची गुंतवणूक कशी करता याला देखील खूप महत्त्व आहे.

हातात आलेला पैसा व त्याचे नियोजन परफेक्ट असणे खूप गरजेचे असते. तुम्हाला जर श्रीमंत व्हायचे असेल तर तुम्हाला काही गोष्टींचे पालन करणे देखील खूप महत्त्वाचे असते. त्यामुळेच तुमच्या हातात आलेला पैशांचे चांगली गुंतवणूक होते व दीर्घकालीन कालावधीमध्ये तुम्ही चांगली संपत्ती उभारू शकतात. त्यामुळे आपण श्रीमंत होण्याच्या दृष्टिकोनातून काही महत्त्वाच्या गोष्टी पाहणार आहोत. त्यामुळे तुम्हाला कमावलेल्या पैशांची गुंतवणूकीचा या माध्यमातून संपत्ती निर्माण करण्यासाठी खूप मोठा फायदा होईल.

 श्रीमंत होण्यासाठी या गोष्टींचा करा अवलंब

1- नियमितपणे गुंतवणुकीची सवय लावा निमितपणे गुंतवणुकीची सवय लावणे किंवा यामध्ये नियमितपणे सातत्य ठेवणे हे खूप महत्त्वाचे आहे. तुम्ही मिळवलेल्या पैशांची नियमितपणे गुंतवणूक करावी. गुंतवणूक करताना ती मासिक किंवा वार्षिक तसेच तुमच्या योगदानाचा किंवा तुमच्या कमाईचा प्रवाह निश्चित केल्यास ते कालांतराने तुम्ही त्यामध्ये वाढ करू शकतात.तुमची गुंतवणूक जर तुम्ही स्वयचलित केली तर त्यामध्ये शिस्त ठेवण्यास मदत होते.

2- गुंतवणुकीला लवकर सुरुवात करावी गुंतवणुकीच्या प्रवासातील एक सर्वात मोठा लेसन म्हणजे चक्रवाढ व्याज होय. ही एक शक्तिशाली अशी संकल्पना असून दीर्घकालीन संपत्ती निर्माण करणाऱ्या व्यक्तींकरिता ती खूप चांगल्या पद्धतीने मदत करू शकते. चक्रवाढ व्याजाचे तुम्हाला जास्त फायदे मिळवायचे असतील तर वेळ हा घटक खूप महत्त्वाचा आहे. तुम्ही जितक्या लवकरात लवकर गुंतवणूक करायला सुरुवात कराल तितका तुमचा पैसा वाढायला जास्तीचा वेळ मिळेल.

त्यामुळे शक्य तितक्या लवकर गुंतवणुकीला सुरुवात केली तर तुम्हाला कंपाऊंडिंग चा फायदा मिळतो. आर्थिक तज्ञांच्या मते तुम्ही लवकर गुंतवणुकीला सुरुवात केली तर चक्रवाढ व्याजाचा फायदा तुम्ही मिळू शकतात व या माध्यमातून पैसे कालांतराने वेगाने वाढू शकतात. लवकर गुंतवणूक सुरू केल्यामुळे आर्थिक सुरक्षितता तर येथेच परंतु आर्थिक स्वातंत्र्य देखील निर्माण होते.

3- गुंतवणुकीचे पर्याय योग्य निवडा चक्रवाढ व्याजाची संधी मिळवायचे असेल तर गुंतवणुकीचे पर्याय देखील महत्त्वाचे ठरतात. यामध्ये तुम्ही पब्लिक प्रॉव्हिडंट फंड तसेच मुदत ठेवी किंवा म्युच्युअल फंड आणि इतर चक्रवाढ व्याजाचा फायदा देणाऱ्या कर बचत योजनांचा पर्याय निवडू शकतात. गुंतवणुकीचे पर्याय निवडताना त्यामधील जोखीम आणि मिळणारा परतावा इत्यादी बाबी समजून घेऊनच गुंतवणूक करावी.

4- गुंतवणूकीवर मिळणारा लाभांश आणि व्याज पुन्हा गुंतवणे चक्रवाढ व्याजाच्या पूर्णपणे उपयोग करण्यासाठी तुमच्या गुंतवणुकीतून जो काही तुम्हाला लाभ किंवा व्याज मिळते ते पुन्हा गुंतवणूक गरजेचे आहे. असे पैसे काढण्याऐवजी त्यांना पुन्हा जमा करणे व कालांतराने त्यांना कंपाऊंड करणे खूप महत्त्वपूर्ण आहे. त्यामुळे तुम्हाला गुंतवणुकीवर मिळणारा एकूण परतावा लक्षणीयरित्या वाढू शकतो.

5- दीर्घ मुदतीकरिता गुंतवणूक करा चक्रवाढ व्याजाचा फायदा घ्यायचा असेल तर दीर्घकाळासाठी गुंतवणुकीचे धोरण ठेवणे महत्त्वाचे आहे. केलेली गुंतवणूक मुदत पूर्ण होण्याआधी काढून घेऊ नका. जास्त कालावधी करिता गुंतवणूक करत रहा तुमचे पैसे वाढू द्या. म्हणजे संयम ठेवणे खूप गरजेचे आहे.

6- कायम गुंतवणूक वाढवण्याकडे भर द्या तुमचे उत्पन्न जर वाढत असेल तर जास्तीत जास्त गुंतवणूक करण्याकडे भर द्या. तुमच्या गुंतवणुकीमध्ये सातत्य ठेवा. या माध्यमातून तुम्ही चक्रवाढ प्रक्रियेला  गती देऊ शकतात व तुमची संपत्ती निर्मिती क्षमतेत वाढ करू शकतात.

7- बाजाराची माहिती ठेवा अपडेट राहा बाजारपेठेतील ट्रेंड काय आहे यासंबंधी तुम्ही अपडेट गरजेचे आहे. बाजारपेठेसंबंधीतील बातम्या तसेच गुंतवणूक योजनांबद्दल कायम अपडेट राहणे गरजेचे आहे. तुमच्या गुंतवणुकीवर मिळणाऱ्या परताव्यानुसार तुम्ही आवश्यकतेनुसार समायोजन करण्यासाठी तयार राहणे गरजेचे आहे.

8- आर्थिक सल्लागारांचा सल्ला घेणे तुम्हाला गुंतवणूक करायचे आहे परंतु पर्यायांबद्दल तुम्हाला पुरेशी माहिती नाही किंवा मार्गदर्शनाची आवश्यकता असेल तर तुम्ही चांगल्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला घेणे गरजेचे आहे. असे सल्लागार तुमची आर्थिक परिस्थिती ओळखतात व तुम्हाला चक्रवाढ व्याजाचा लाभ देणारी एखादे oगुंतवणूक योजनेमध्ये पैसे गुंतवण्यास मदत करतात किंवा चांगला गुंतवणूक पर्याय सुचवतात.

या व अशा काही महत्त्वाच्या बाबींची तुम्ही काळजी घेतली तर तुम्ही केलेल्या गुंतवणुकीवर चांगला परतावा मिळेल व तुम्ही झटपट श्रीमंत होऊ शकतात.