पैशांची बचत आणि बचतीची केलेली गुंतवणूक हे व्यक्तीला भविष्यकालीन आयुष्यामध्ये आर्थिक दृष्टिकोनातून समृद्ध बनवतेच व एक समृद्ध आयुष्य जगण्याला देखील मदत करते. तुम्ही काटकसर करून जर आज गुंतवणूक करत असाल तर मात्र काही वर्षानंतर तुमच्याकडे लाखो ते कोटीमध्ये पैसा जमा होऊ शकतो.
आता यामध्ये तुम्हाला गुंतवणुकीसाठी चांगली योजना किंवा चांगला पर्याय निवडणे गरजेचे असते. जर आपण गुंतवणूक पर्यायांच्या दृष्टिकोनातून बघितले तर यामध्ये बँकाच्या मुदत ठेव योजना आणि पोस्ट ऑफिसच्या योजना यांना प्रामुख्याने गुंतवणूकदार गुंतवणुकीसाठी प्राधान्य देतात
कारण यामध्ये गुंतवणूक सुरक्षित असतेच परंतु परतावा देखील चांगला मिळतो. गेल्या काही वर्षापासून पोस्ट ऑफिसच्या अनेक योजना देखील गुंतवणूकदारांमध्ये खूप लोकप्रिय होताना दिसून येत आहेत. कारण या योजनांमध्ये गुंतवणूक केली तर काही कालावधीनंतर गुंतवणूकदारांना चांगला नफा मिळतो व सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे गुंतवणुकीच्या बाबतीत धोका अगदी कमी असतो. पोस्टाच्या देखील अनेक आकर्षक योजना आहेत.
यामध्ये जर तुम्हाला कुठल्याही प्रकारचा धोका न पत्करता जास्त पैसे मिळवायचे असतील तर पोस्टाची किसान विकास पत्र योजना म्हणजेच केव्हीपी ही अत्यंत लोकप्रिय अशी योजना आहे. याच योजनेची माहिती आपण या लेखात घेऊ.
किसान विकास पत्र योजनेचे स्वरूप
ही पोस्ट ऑफिसची महत्त्वपूर्ण आणि लोकप्रिय योजना असून गुंतवणूकदारांना अधिकचा नफा मिळावा याकरिता ही योजना सुरू करण्यात आलेली आहे. या योजनेचे सगळ्यात महत्त्वाचे आणि आकर्षक असलेले वैशिष्ट्य म्हणजे या योजनेत काही महिन्यातच पैसे दुप्पट होतात.
या योजनेमध्ये तुम्हाला गुंतवणूक सुरू करायची असेल तर तुम्ही ती 1000 रुपयापासून करू शकतात व कमाल गुंतवणुकीचे कुठलीही यामध्ये मर्यादा नाही. यामध्ये तुम्ही संयुक्त म्हणजेच दुहेरी खाते देखील उघडू शकतात.दहा वर्षापेक्षा जास्त वयाचे मुल असेल तर त्याच्या नावाने देखील खाते उघडता येते. तसेच यामध्ये एखाद्या व्यक्तीला कितीही खाते उघडता येतात.
किसान विकास पत्र योजनेत किती व्याजदर मिळतो?
जर आपण किसान विकास पत्र योजनेच्या दृष्टिकोनातून बघितले तर या योजनेअंतर्गत मिळणारे व्याज तिमाही आधारावर ठरवले जाते. सध्या किसान विकास पत्र योजनेत केलेल्या गुंतवणुकीवर 7.5% व्याज मिळत आहे व हे वार्षिक आधारावर जारी केले जाते. त्यामुळे आपल्याला दिसून येते की या योजनेत केलेल्या गुंतवणुकीवर चांगला व्याजदर मिळत असल्याने गुंतवणूकदारांसाठी योजना फायद्याची आहे.
या योजनेत पाच लाख गुंतवल्यावर मिळतील दहा लाख
तुम्ही या योजनेमध्ये 115 महिने म्हणजे या योजनेच्या परिपक्वतेपर्यंत जर पाच लाख रुपये गुंतवले तर सध्या मिळणाऱ्या 7.5 टक्के व्याजदराने पाच लाख रुपये तुम्हाला मिळतात. म्हणजेच या योजनेची मुदत संपल्यानंतर गुंतवणूकदारांना पाच लाख गुंतवणुकीवर दहा लाख रुपये मिळतात.
यावरून ही योजना गुंतवणूकदारांसाठी खूप फायदेशीर आहे असे आपल्याला दिसून येते. या योजनेत केलेली गुंतवणूक आणि मिळणारा परतावा हा खूप चांगला असल्याकारणाने धोका देखील खूपच कमी असल्यामुळे गुंतवणूकदारांनी या योजनेतून गुंतवणूक करणे गरजेचे आहे.