Short Term Courses:- दहावी आणि बारावी हे वर्ष करिअरच्या दृष्टिकोनातून टर्निंग पॉईंट असलेली वर्ष समजली जातात. कारण बारावी पास झाल्यानंतर तुम्हाला करिअरच्या दृष्टिकोनातून कोणत्या शाखेत किंवा कोणत्या कोर्सेसमध्ये शिक्षण घ्यायचे आहे हे ठरवले जाते व या निर्णयाचा फायदा संपूर्ण आयुष्यावर होतो.
या टप्प्यावर जर करिअर निवडण्याच्या दृष्टिकोनातून जर निर्णय चुकला तर मात्र आयुष्यभर पश्चाताप करायची वेळ येऊ शकते. त्यामुळे प्रत्येक पालक या टप्प्यावर मुलांच्या शिक्षणाच्या आणि करिअरच्या दृष्टिकोनातून खूप सावध निर्णय घेत असतात. आता काही दिवसांनी दहावी आणि बारावीचे निकाल लागतील व विद्यार्थी तसेच पालकांमध्ये कोणता कोर्स निवडावा याबाबत विचारविनिमय सुरू होईल.
त्यामुळे या लेखामध्ये आपण स्वतःच्या पायावर आर्थिक दृष्टिकोनातून उभे राहता हवे याकरिता महत्वाचे ठरतील असे काही शॉर्ट टर्म कोर्सेस पाहणार आहोत. अशा प्रकारची कोर्सेस तुम्ही अगदी दोन महिन्यापासून ते दोन वर्षापर्यंतच्या कालावधीत करू शकतात. अशा प्रकारच्या शॉर्ट टर्म कोर्सेसला खर्च देखील कमी लागतो. विशेष म्हणजे तुम्ही बारावीनंतर अशा प्रकारचा शॉर्ट टर्म कोर्स केल्यास तुम्हाला खाजगी क्षेत्रामध्ये चांगले करिअर करण्याची संधी मिळू शकते व तुम्ही चांगला पैसा मिळवू शकतात.
बारावी पास नंतर करा हे शॉर्ट टर्म कोर्सेस
1- वेब डिझाईनिंग– बारावीनंतर जर तुम्हाला कुठला कोर्स करावा असा प्रश्न पडला असेल तर तुम्ही वेब डिझाईनिंगचा सर्टिफिकेट किंवा डिप्लोमा कोर्स करू शकतात. हा एक उत्तम शॉर्ट टर्म कोर्सचा पर्याय असून हा कोर्स तुम्ही सहा महिने तसेच एक वर्षाच्या कालावधी करिता करू शकतात.
सध्या वेब डिझाईनिंग करणाऱ्यांची मागणी मोठ्या प्रमाणावर असून डिजिटल व तंत्रज्ञानाच्या या युगामध्ये येणाऱ्या काळात यात आणखी मागणी वाढू शकते. त्यामध्ये वेबसाईट युजर फ्रेंडली बनवणे हे प्रामुख्याने वेब डिझायनरचे काम असते. हा शॉर्ट टर्म कोर्स पूर्ण केल्यानंतर तुम्हाला खाजगी क्षेत्रामध्ये चांगली नोकरी मिळू शकते. याशिवाय तुम्ही फ्रीलान्सिंग करून देखील घरी बसून लाखोंची कमाई करू शकता.
2- डिजिटल मार्केटिंग कोर्स– सध्या डिजिटल मार्केटिंगची मागणी मोठ्या प्रमाणावर वाढली असून तुम्हाला या क्षेत्रात करिअर करायचे असेल तर तुम्ही डिजिटल मार्केटिंगचा सर्टिफिकेट किंवा डिप्लोमा कोर्स करू शकतात. तसेच तुम्ही यामध्ये फुल टाइम एमबीए कोर्स देखील करू शकतात.
हा कोर्स ऑनलाईन व ऑफलाईन अशा दोन्ही पद्धतीने करता येतो व याचा कालावधी सहा महिन्यापासून ते एक वर्षापर्यंतचा आहे. हा कोर्स पूर्ण केल्यानंतर तुम्ही डिजिटल मार्केटिंगचा व्यवसाय करू शकतात किंवा एखाद्या खाजगी कंपनीमध्ये नोकरी करू शकतात.
3- योगासनांच्या क्षेत्रामध्ये करिअर करता येईल असे कोर्स– योगा इन्स्ट्रक्टर बनणे हा एक करिअरचा उत्तम पर्याय असून बारावीनंतर हा एक चांगला पर्याय आहे. आजकाल अनेक संस्थांमध्ये योगासनांचे कोर्स शिकवले जातात. विशेष म्हणजे भारत सरकारच्या आयुष मंत्रालयाच्या माध्यमातून योगा शिक्षकांच्या ट्रेनिंग करिता अनेक कार्यक्रम राबवले जातात.
या कोर्सेस साठीचा जो काही अभ्यासक्रम आहे तो सरकारमान्य असून योगा शिक्षकाचा कोर्स पूर्ण केल्यानंतर तुम्हाला एक सर्टिफिकेट दिले जाते व त्यानंतर तुम्ही एखाद्या शाळेत किंवा योगा इन्स्टिट्यूटमध्ये योगा शिक्षक म्हणून अर्ज करून नोकरी मिळवू शकतात.
जर तुम्ही तुमच्या घरी किंवा एखाद्या मोकळ्या जागेत लोकांना योगासने शिकवून त्यातून चांगला पैसा मिळवू शकता. सध्या लोक आरोग्याच्या बाबतीत खूप सजग झाल्यामुळे लोकांचा कल मोठ्या प्रमाणावर योगासनांकडे वळला आहे.