लोन ॲपवरून तुम्ही देखील झटपट कर्ज घेत आहात का? ‘ही’ काळजी घ्या,नाहीतर अडकाल फसवणुकीच्या सापळ्यात

बऱ्याचदा जीवनामध्ये अनेकदा अचानक पणे आपत्कालीन परिस्थिती उद्भवते व तातडीची पैशांची गरज निर्माण होते. त्यामुळे निर्माण झालेली पैशांची गरज पूर्ण करण्यासाठी आवश्यक असलेला पैसा आपल्याकडे असेल किंवा तेवढी बचत आपल्याकडे असेल असे होत नाही.

त्यामुळे साहजिकच व्यक्ती अशा परिस्थितीत पैसा उभा करण्यासाठी नातेवाईक, मित्रमंडळी यांच्याकडून पैसे उभा करण्याचा प्रयत्न करतो. तसेच दुसरे बाब म्हणजे बँका व इतर वित्तीय संस्थांच्या माध्यमातून कर्ज घेण्यासाठी प्रयत्न करते. परंतु कर्जाची प्रक्रिया वेळ खाऊ असल्याने आपत्कालीन परिस्थितीमध्ये वेळेत पैसा उपलब्ध होत नाही.

यावेळी मात्र बरेच जण झटपट कर्ज मिळण्याचे जे काही पर्याय आहे त्याची निवड करतात. कारण आपल्याला माहित आहे की अशी अनेक ॲप्स मोबाईलवर उपलब्ध आहेत की त्या माध्यमातून आपल्याला ताबडतोब कर्ज मिळते. आता अनेक बँका तसेच नॉन बँकिंग फायनान्स कंपनी देखील मोबाईल ॲप्लिकेशनच्या माध्यमातून ताबडतोब कर्ज देऊ करतात.

तसेच याकरता आपल्याला मोजकेच कागदपत्रे द्यावी लागतात व कमीत कमी कालावधीत कर्ज मिळते. परंतु अशाप्रकारे मोबाईल ॲप्लिकेशन वरून झटपट कर्ज घेताना मात्र काळजी घेणे खूप गरजेचे आहे. नाहीतर आपण खूप मोठ्या समस्या मध्ये अडकण्याची शक्यता नाकारता येत नाही. अशा झटपट कर्ज देणाऱ्या ॲप्लिकेशनच्या जाळ्यात अडकून काहीजणांनी आत्महत्या केल्याचे देखील घटना घडलेल्या आहेत.

 मोबाईल ॲप्लिकेशन वरून इन्स्टंट लोन घेताना ही काळजी घ्या

1- सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे तुम्हाला ज्या लोन ॲप्लिकेशनच्या माध्यमातून कर्ज घ्यायचे आहेत ते किती विश्वासार्ह आहे ते तपासून पहावे. शक्यतो जे आपल्याला परिचित आहेत अशाच लोन एप्लीकेशन वरून कर्ज घ्यावे. यामध्ये आपण उदाहरणादाखल बजाज फायनान्स,

टाटा फायनान्स तसेच श्रीराम फायनान्स व महिंद्रा फायनान्स यांचे उदाहरण घेऊ शकतो. तसेच तुम्ही ज्या कंपनीकडून कर्ज घेणार आहात ती आरबीआयकडे नोंदणीकृत आहे का नाही हे पाहणे गरजेचे आहे. तसेच तुम्ही कर्ज घेताना जी माहिती देणार आहात ती या ॲप्लिकेशन सुरक्षित आहे ना याची देखील खात्री करून घ्यावी.

2- तसेच अशा विविध प्रकारच्या एप्लीकेशन वरून देण्यात येणाऱ्या कर्जाच्या अटी, व्याजदर तसेच परतफेडीचा कालावधी व इतर चार्जेस याचा तुलनात्मक अभ्यास करूनच निर्णय घ्यावा. तसेच काही हिडन चार्जेस म्हणजेच छुपे खर्च आहेत का ते देखील तपासून पहावे.

तसेच आपण जे कर्ज घेणार आहात त्याचा ईएमआय किती आहे हे देखील पाहून घ्यावे.तसेच आपला सिबिल स्कोर पाहून तुम्हाला कोणत्या व्याजदरात कर्ज दिले जात आहे तो व्याजदर योग्य आहे का हे देखील पाहणे गरजेचे असते.

तसेच आपल्याला जितके कर्जाची गरज असेल तितकेच कर्ज घ्यावे. कर्ज मिळत आहे म्हणून अनावश्यकपणे कर्ज घेऊ नये. तसेच आपण जे कर्ज घेत आहात त्याचा ईएमआय आपल्याला देणे शक्य आहे का हे पाहूनच कर्ज घ्यावे.

 सापळ्यात अडकू नका

आजकालच्या जगात इन्स्टंट लोन मिळणे ही गरज आहे परंतु तुम्ही जेव्हा अशा एप्लीकेशनच्या माध्यमातून कर्ज घेतात तेव्हा ते ॲप सुरक्षित असतीलच असे नाही. अगोदर आपल्याला झटपट कर्ज ॲप आर्थिक समस्यांचे जलद समाधान आहे असे वाटते.

परंतु नंतर मात्र हीच एप्लीकेशन आर्थिक घोटाळे आणि ग्राहकाच्या डेटाचा गैरवापर करून तुम्हाला एखाद्या सापळ्यात अडकवू शकतात. त्यामुळे सगळ्या गोष्टींची काळजी घेऊनच अशा एप्लीकेशन वरून कर्ज घ्यावे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe