Post Office Scheme:- गुंतवणुकीच्या दृष्टिकोनातून पोस्ट ऑफिस आणि बँकेच्या मुदत ठेव योजनांना गुंतवणूकदारांकडून प्रामुख्याने प्राधान्य दिले जाते. परताव्याची हमी तसेच गुंतवणुकीची सुरक्षितता या दृष्टिकोनातून या दोन्ही ठिकाणी पैसे गुंतवणे फायद्याचे ठरते.
इतकेच नाहीतर पोस्ट ऑफिसच्या अनेक बचत योजना तसेच मुदत ठेव योजना गुंतवणुकीच्या दृष्टीने खूप महत्त्वाच्या असून यामध्ये व्याजदर देखील चांगला मिळतो. त्यामुळे गुंतवणूकदार आता पोस्ट ऑफिसच्या माध्यमातून राबवल्या जाणाऱ्या योजनांना देखील गुंतवणुकीसाठी मोठ्या प्रमाणावर प्राधान्य देतात.
अगदी याच पद्धतीने तुम्हाला देखील तुमचे भविष्य आर्थिकदृष्ट्या सुरक्षित करायचे असेल तर तुम्ही पोस्ट ऑफिसच्या योजनांपैकी एक असलेली टाईम डिपॉझिट योजनेमध्ये गुंतवणूक करून चांगले व्याज मिळवू शकतात व व्याजातून चांगला पैसा मिळवू शकतात. व्याजाचा लाभ तर मिळतोच परंतु तुम्हाला या योजनेत केलेल्या गुंतवणुकीवर टॅक्स बेनिफिट म्हणजेच कर लाभ देखील मिळतो.
कसे आहे पोस्ट ऑफिसच्या टाईम डिपॉझिट योजनेचे स्वरूप?
पोस्ट ऑफिसची ही योजना खूपच महत्त्वपूर्ण असून या योजनेमध्ये अगदी लहान मुलांपासून ते वयोवृद्ध लोकांपर्यंत अर्ज करू शकतात व यात पैसे गुंतवू शकतात. या योजनेत जर तुम्हाला पैसे गुंतवायचे असतील तर त्याकरिता तुम्हाला पाच वर्षांकरिता गुंतवणूक करावी लागते.
या योजनेत केलेल्या गुंतवणुकीवर सध्या 7.5 टक्के दराने व्याज दिले जात आहे. यामुळे तुमची एकूण पाच वर्षातील गुंतवणूक आणि त्यावर मिळणारे व्याज असे दोघे मिळून तुम्हाला योजना परिपक्वते नंतर म्हणजेच पाच वर्षानंतर एक चांगली मोठी रक्कम हातात मिळते.
या योजनेतील गुंतवणुकीचा कालावधी आणि मिळणारा व्याजदर
पोस्ट ऑफिसच्या टाईम डिपॉझिट योजनेमध्ये जर तुम्ही गुंतवणूक केली तर ती एक वर्ष तसेच दोन वर्ष, 3 आणि पाच वर्षासाठी करता येते. कालावधीनुसार व्याजदर बघितला तर एक वर्षाच्या गुंतवणुकीसाठी 6.9%, दोन ते तीन वर्षाच्या गुंतवणुकीवर सात टक्के तर पाच वर्षे गुंतवणूक केल्यावर साडेसात टक्के व्याजदर मिळतो.
पोस्ट ऑफिसच्या या योजनेत पाच वर्षासाठी पाच लाखांची गुंतवणूक केली तर…..
समजा तुम्हाला जर पाच वर्षासाठी या योजनेत पाच लाख रुपये गुंतवणूक करायची असेल तर तुम्हाला दिलेल्या गुंतवणुकीवर 7.5% इतका व्याजदर मिळतो.
या हिशोबाने जर बघितले तर पाच वर्षाच्या कालावधीत तुम्ही गुंतवलेल्या पाच लाखांवर दोन लाख 24 हजार 974 रुपये इतके व्याज मिळते. अशा पद्धतीने पाच वर्षानंतर म्हणजेच ही योजना परिपक्व झाल्यानंतर तुम्हाला एकूण गुंतवणूक आणि त्यावर मिळणारे व्याज असे दोघे मिळून सात लाख 24 हजार 974 रुपये मिळतात.
म्हणजेच तुम्ही व्याजातून दोन लाख रुपये या योजनेतून मिळवू शकतात.दुसरे महत्त्वाचे म्हणजे या योजनेत जर तुम्ही गुंतवणूक केली तर आयकर कायदा कलम 80C अंतर्गत तुम्हाला करात सूट मिळते. या योजनेमध्ये दहा वर्षापेक्षा जास्त वयोगटातील मुलांना देखील अर्ज करता येतो.