Post Office Scheme: पोस्टाच्या ‘या’ योजनेत जितकी गुंतवणूक कराल तितके मिळवाल व्याज! वाचा योजनेची ए टू झेड माहिती

post office fd scheme

Post Office Scheme:- गुंतवणूक ही संकल्पना प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यात खूप महत्त्वाची असून आयुष्य जर सुखा समाधानाने आणि शांततेत व्यतीत करायचे असेल तर गुंतवणुकी शिवाय पर्याय नाही. कारण भविष्यामध्ये अचानकपणे उद्भवणाऱ्या अनेक आर्थिक गरजांसाठी तुम्हाला गुंतवणूक करणे गरजेचे आहे.

परंतु गुंतवणूक करताना ती सुरक्षित अशा पर्यायांमध्ये आणि ज्यातून आपल्याला चांगला परतावा मिळेल अशा ठिकाणी करणे गरजेचे आहे. यामध्ये जर पाहिले तर बरेच गुंतवणूकदार बँकांच्या मुदत ठेव योजनांना आणि सरकारी अल्पबचत योजनांना प्राधान्य देतात.

परंतु यामध्ये पोस्ट ऑफिसच्या देखील अनेक योजना आहेत व या योजनांमध्ये गुंतवणूक केल्यावर देखील कमीत कमी कालावधीत चांगला फंड जमा करता येणे शक्य आहे. जर आपण यामध्ये पोस्ट ऑफिसच्या गुंतवणूक योजनांच्या दृष्टिकोनातून बघितले तर तुम्ही पोस्ट ऑफिसमध्ये एक वर्ष, दोन वर्ष,

तीन वर्ष आणि पाच वर्षांकरिता एफडी मध्ये गुंतवणूक करू शकतात व या माध्यमातून चांगले व्याज मिळवू शकता. पोस्ट ऑफिसच्या एफडी स्कीमच्या माध्यमातून तुम्ही दहा वर्षांमध्ये तुमची गुंतवलेली रक्कम दुप्पट करू शकतात. पोस्ट ऑफिस टाईम डिपॉझिटद्वारे तुम्ही तुमचे पैसे दुप्पट करू शकतात.

 पोस्ट ऑफिसच्या या योजनेत गुंतवलेली रक्कम होईल दुप्पट

पोस्ट ऑफिसच्या एफडी स्कीममध्ये तुम्ही दहा वर्षांमध्ये तुमची रक्कम दुप्पट करू शकतात. परंतु याकरिता तुम्हाला पाच वर्षे पूर्ण होण्यापूर्वी एक महत्त्वाची गोष्ट करावी लागेल. पोस्ट ऑफिस टाईम डिपॉझिटद्वारे तुम्ही तुमच्या पैसे दुप्पट करू शकतात. पोस्ट ऑफिसच्या या एफडी स्कीममध्ये वेगवेगळ्या कालावधी करिता वेगवेगळ्या प्रकारचे व्याजदर उपलब्ध आहेत.

समजा तुम्ही एक वर्षाच्या कालावधी करिता एफडी केली तर तुम्हाला 6.9 टक्के, दोन वर्षाच्या कालावधी करिता एफडी केली तर सात टक्के व तीन वर्षाच्या एफडीवर 7.1% आणि पाच वर्षाच्या कालावधी करिता एफडी केली तर 7.5% व्याज मिळते.

 रक्कम दुप्पट करायची असेल तर काय करावे?

या माध्यमातून जर तुम्हाला तुमची गुंतवलेली रक्कम दुप्पट करायची असेल तर तुम्हाला सगळ्यात आधी पाच वर्षाच्या एफडीमध्ये गुंतवणूक करावी लागेल व ही एफडी पुढील पाच वर्षाकरिता परत वाढवावी लागेल. पोस्ट ऑफिस टाईम डिपॉझिट खाते तुम्ही वाढवू शकतात.

समजा तुम्हाला एक वर्षाची एफडी मॅच्युरिटीच्या तारखेपासून सहा महिन्याच्या आत, दोन वर्षाची एफडी तिच्या मॅच्युरिटी कालावधीच्या बारा महिन्याच्या आत आणि तीन व पाच वर्षाची एफडी तिच्या मॅच्युरिटी कालावधीच्या 18 महिन्याच्या आत तुम्हाला वाढवता येते.

तसेच तुम्ही खाते उघडाल तेव्हा देखील मॅच्युरिटी नंतर खाते वाढवण्याची विनंती करू शकतात. यामध्ये तुमच्या एफडीची मुदत संपल्यानंतरच्या तारखेला संबंधित टीडी खात्यावर लागू होणारा जो काही व्याजदर आहे तो एक्सटेंडेड पिरेडवर लागू होईल. समजा तुम्ही पोस्ट ऑफिस एफडीमध्ये पाच वर्षांकरिता गुंतवणूक केली तर तुम्हाला 7.5 टक्के दराने व्याज मिळेल.

यामध्ये जर तुम्ही पोस्ट ऑफिस कॅल्क्युलेटर बघितले तर त्यानुसार पाच लाखाच्या गुंतवणुकीवर तुम्हाला दहा वर्षात पाच लाख 51 हजार 175 रुपयांचे व्याज मिळेल.

म्हणजेच दहा वर्षात तुम्ही गुंतवलेल्या पाच लाखांवर तुम्हाला पाच लाखापेक्षा जास्त व्याज मिळते.  म्हणजे तुम्ही यामध्ये गुंतवणुकी इतके व्याज मिळवतात. यामध्ये तुम्ही गुंतवलेली रक्कम व मिळणारे व्याज मिळून दहा वर्षात तुम्हाला दहा लाख 51 हजार 175 रुपये मिळतात.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe