अचानक पैशांची गरज भासली तर बँक ऑफ महाराष्ट्र येणार मदतीला! ताबडतोब देते 20 लाखापर्यंत पर्सनल लोन; वाचा ए टू झेड माहिती

तुम्हाला देखील जर मुलांचे शिक्षण किंवा कार खरेदी करायचे असेल किंवा परदेश प्रवास किंवा इतर काही गोष्टींसाठी पैशांची गरज असेल तर तुम्ही महाराष्ट्र बँकेच्या लोन सुविधेचा फायदा घेऊ शकतात.

Ajay Patil
Published:
personal loan

Bank Of Maharashtra Personal Loan:- जीवनामध्ये व्यक्तीला अचानकपणे मोठ्या प्रमाणावर पैशांची आवश्यकता असते.अचानकपणे किंवा आपत्कालीन परिस्थितीमध्ये आपण वैद्यकीय खर्चाचा समावेश करू शकतो व त्यासोबतच मुलांचे लग्नकार्य, एखाद्या उच्च शिक्षणाच्या अभ्यासक्रमासाठी भरावे लागणारे शुल्क इत्यादी आणि इतर गोष्टींकरता आपल्याला पैसा लागू शकतो.

परंतु हवा असलेला संपूर्ण पैसा आपल्याकडे असेलच असे होत नाही व त्यामुळे बरेचजण कर्जाचा आधार घेतात. कर्जामध्ये जास्तीत जास्त व्यक्ती हे पर्सनल लोनचा पर्याय निवडतात.देशातील सर्वच बँकांच्या माध्यमातून पर्सनल लोन दिले जाते

त्यामुळे तुम्हाला देखील जर मुलांचे शिक्षण किंवा कार खरेदी करायचे असेल किंवा परदेश प्रवास किंवा इतर काही गोष्टींसाठी पैशांची गरज असेल तर तुम्ही महाराष्ट्र बँकेच्या लोन सुविधेचा फायदा घेऊ शकतात.

बँक ऑफ महाराष्ट्रकडे विस्तृत श्रेणीचे वैयक्तिक कर्ज उपलब्ध असून या माध्यमातून त्वरित कर्ज देऊन बँक तुमची आर्थिक गरज भागवू शकते.

बँक ऑफ महाराष्ट्राच्या पर्सनल लोनचे किती प्रकार आहेत?

बँक ऑफ महाराष्ट्राच्या माध्यमातून जे काही पर्सनल लोन दिले जाते त्याचे प्रकार असून यामध्ये….

1- महा बँक पर्सनल लोन स्कीम फॉर ऑल

2- महा बँक पर्सनल लोन स्कीम फॉर बीपीसीएल एम्प्लॉईज

3- सॅलरी गेन स्कीम म्हणजेच पगार असणाऱ्या व्यक्तींकरिता इत्यादी प्रकार आपल्याला सांगता येतील.

1- महा बँक पर्सनल लोन स्कीम फॉर ऑल – या माध्यमातून पगारदार आणि स्वयरोजगार/व्यावसायिकांच्या वैयक्तिक गरजा पूर्ण करण्यासाठी कर्ज दिले जाते व कर्जाची रक्कम साधारणपणे वीस लाखापर्यंत असते व परतफेडीचा कालावधी जर बघितला तर तो पगारदार व्यक्तींकरिता सात वर्षे व इतरांसाठी पाच वर्षापर्यंत आहे.

2- महा बँक पर्सनल लोन स्कीम्स फॉर बीपीसीएल एम्प्लॉईज- बीपीसीएल कर्मचाऱ्यांसाठी महा बँक पर्सनल लोन योजना ही खूप महत्त्वाची योजना असून यामध्ये बीपीसीएल- पब्लिक सेक्टर युनिट मध्ये जे काही कर्मचारी आहेत ते पर्सनल लोन घेऊ शकतात. या माध्यमातून कर्जाची रक्कम ही 20 लाखापर्यंत असून कर्जाचा कालावधी सात वर्षांपर्यंत आहे. विशेष म्हणजे या प्रकारात कर्जावर कुठल्याही प्रकारचे प्रक्रिया शुल्क लागत नाही.

बँक ऑफ महाराष्ट्र कडून कुणाला कर्ज मिळू शकते?
बँक ऑफ महाराष्ट्राच्या माध्यमातून केंद्र किंवा राज्य सरकारातील कर्मचारी तसेच सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रमांमध्ये कार्यरत असलेली व्यक्तीना बँक ऑफ महाराष्ट्रातून सहजपणे कर्ज मिळवता येते. तसेच प्रसिद्ध असलेल्या कार्पोरेट कंपन्या व सार्वजनिक किंवा खाजगी क्षेत्रातील व्यक्ती देखील आपल्या दैनंदिन गरजा पूर्ण करण्यासाठी ओव्हरड्राफ्ट सुविधेचा लाभ घेऊन पर्सनल लोन घेऊ शकतात.
यामध्ये केंद्र व राज्य सरकार आणि सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रम कर्मचाऱ्यांसाठी- त्यांच्या मासिक पगाराच्या पाचपट किंवा जास्तीत जास्त रक्कम पाच लाख रुपये कर्ज म्हणून मिळते.
केंद्र व राज्य सरकार आणि सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रम कर्मचाऱ्यांच्या व्यतिरिक्त असलेल्या व्यक्तींना त्यांच्या पगाराच्या तीन पट किंवा जास्तीत जास्त कमाल पाच लाख रुपये इतके कर्ज मिळते. या दोन्हींमध्ये कर्जासाठी आवश्यक प्रक्रिया शुल्क जर बघितले तर ओव्हर ड्राफ्ट रकमेच्या वार्षिक 0.50% किंवा कमीत कमी पाचशे रुपये पर्यंत प्रक्रिया शुल्क लागू शकते.

सिबिल स्कोरनुसार पर्सनल लोनवर आकारण्यात येणारे व्याजदर
1- सिबिल स्कोर 750 आणि त्यावर असेल तर पर्सनल लोन साठी 9.45% इतका व्याजदर आकारला जातो.

2- सिबिल स्कोर 700 ते 749 असेल तर पर्सनल लोनसाठी 10.30% इतका व्याजदर आकारला जातो.

3- सिबिल स्कोर 650 ते 699 दरम्यान असेल तर पर्सनल लोनकरिता 11.30% व्याजदर आकारला जातो.

4- सिबिल स्कोर 600 ते 649 च्या दरम्यान असेल तर पर्सनल लोनसाठी 12.80% इतका व्याजदर आकारला जातो.

बँक ऑफ महाराष्ट्र मधील वैयक्तिक कर्जाकरिता खालील पात्रता निकष पूर्ण करणे गरजेचे आहे

1- अर्जदार 21 ते 60 वर्षे वयोगटातील असते गरजेचे आहे.

2- अर्जदाराचे वार्षिक उत्पन्न किमान दीड लाख रुपये आणि कमाल तीन लाख रुपये इतके असले पाहिजे.

3- अर्जदाराला कोणत्याही कंपनीत किमान दोन वर्षाचा काम करण्याचा अनुभव असणे गरजेचे आहे.

पर्सनल लोनसाठी आवश्यक कागदपत्रे

1- यामध्ये पासपोर्ट आकाराचा फोटो असलेला योग्य प्रकारे भरलेला अर्ज

2- ओळखीचा पुरावा म्हणून तुमचा पासपोर्ट किंवा मतदार ओळखपत्र, आधार कार्ड आणि ड्रायव्हिंग लायसन्स इत्यादी पैकी कोणत्याही एकाची फोटो फोटो प्रत

3- पत्त्याचा पुरावा म्हणून वीज बिल, रेशन कार्ड, पासपोर्ट इत्यादी पैकी कोणत्याही एकाची फोटो प्रत

4- उत्पन्नाचा पुरावा म्हणून पगाराची स्लिप, बँक खात्याचे स्टेटमेंट, आयकर रिटर्न आणि फॉर्म 16 इत्यादी

5- रोजगार प्रमाणपत्र म्हणून एक वर्षापासून सतत नोकरी असल्याचे प्रमाणपत्र( जे पगारदार अर्जदार असतील त्यांच्यासाठी आवश्यक)

6- बँकेने मागितलेली कुठलीही इतर कागदपत्रे

कसे घेता येते बँक ऑफ महाराष्ट्राचे पर्सनल लोन?
बँक ऑफ महाराष्ट्र कडून पर्सनल लोन घेताना तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने देखील अर्ज करता येतो व त्यासाठी तुम्हाला बँक ऑफ महाराष्ट्राच्या अधिकृत वेबसाईटवर जावे लागते व तुम्ही बँकेच्या शाखेला भेट देऊन ऑफलाइन पद्धतीने देखील अर्ज करू शकता.

वीस लाख रुपये पर्सनल लोनसाठी किती व्याजदर आकारण्यात येईल?
बँक ऑफ महाराष्ट्र कडून जर वीस लाख रुपये पर्सनल लोन घेतले तर त्याकरिता दहा टक्के ते 12.80% प्रति वर्ष इतका व्याजदर आकारला जातो व या कर्जाचा परतफेडीचा कालावधी पाच वर्षापर्यंत असतो. पगारदारांसाठी हा कालावधी सात वर्षांपर्यंत असतो व या कर्जावर एक टक्के प्रक्रिया शुल्क लागू शकते.

बँक ऑफ महाराष्ट्रच्या 40 लाख रुपये पर्सनल लोनसाठीचे व्याजदर
बँक ऑफ महाराष्ट्र कडून 40 लाख रुपयापर्यंत देखील पर्सनल लोन मिळते व त्यावर साधारणपणे 9.55% ते 10.55% पर्यंत व्याजदर आकारला जातो व या कर्जाचा कालावधी 36 महिन्यांपर्यंत असतो.

या कर्जावर कर्ज रकमेच्या 0.50% ते 2.25 टक्के इतके प्रक्रिया शुल्क आकारले जाते. यावर फोर क्लोजर चार्ज एक टक्क्यांपर्यंत आकारला जातो. ज्यांचे उत्पन्न किमान 20000 ते 25 हजार रुपये प्रति महिना आहे त्यांना चाळीस लाख रुपये पर्यंत पर्सनल लोन मिळते.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe