Income Tax Rule: घरामध्ये किती रोख रक्कम ठेवू शकतात? किती देऊ शकतात हातउसने पैसे? वाचा माहिती

Ajay Patil
Published:
income tax rule

Income Tax Rule:- सध्या जर आपण देशातील वातावरण पाहिले तर अनेक ठिकाणी आयकर विभागाने धाडी टाकल्या असून बऱ्याच ठिकाणी बेहीशोबी रोख रक्कम जप्त करण्यात आलेले आहेत. अशाच पद्धतीचे सध्या एक प्रकरण खूप देशात गाजले असून झारखंड राज्यातील काँग्रेसचे खासदार धीरज प्रसाद साहू यांच्या परिवाराशी संबंधित अनेक ठिकाणी आयकर खात्याने कारवाई केली व यामध्ये तब्बल 352 कोटींची रोकड जप्त करण्यात आलेली आहे.

हा झाला आयकर विभागाच्या माध्यमातून करण्यात आलेल्या एका कारवाईचा भाग. परंतु या दृष्टिकोनातून आपल्यासारख्या व्यक्तींच्या मनामध्ये नक्कीच प्रश्न येत असेल की आपल्याजवळ आपण किती संपत्ती ठेवू शकतो किंवा किती रोख रक्कम घरात ठेवू शकतो?

कारण समजा आपल्या घरामध्ये जर आयकर विभागाला जास्त प्रमाणामध्ये कॅश सापडली किंवा संपत्ती सापडली तर आपण कोणत्या मार्गाने मिळवली आहे याचा पुरावा किंवा याचा तपशील आपल्याला आयकर विभागाला सादर करणे गरजेचे असते.

जर असा तपशील सादर करण्यामध्ये जर आपण अपयशी ठरलो तर आपल्यावर दंडात्मक कारवाई होण्याची देखील शक्यता असते. या अनुषंगाने आपण किती रोख रक्कम घरात ठेवावी किंवा हात उसने किती पैसे द्यावे? त्याबद्दलचे महत्त्वाची माहिती या लेखात घेणार आहोत.

 कुणाकडून किती रक्कम स्वीकारता येते?

जर आपण याबाबतीत आयकर विभागाचा विचार केला तर त्यांच्यानुसार कर्ज किंवा ठेव म्हणून वीस हजार रुपये किंवा त्यापेक्षा अधिक रक्कम कोणाला देखील कोणाकडून स्वीकारता येत नाही.

यापेक्षा जास्त रक्कम ठेव म्हणून किंवा कर्ज म्हणून स्वीकारण्यावर आयकर विभागाकडून बंदी घालण्यात आलेली आहे. तसेच तुम्हाला मित्र किंवा नातेवाईकांकडून एका दिवसामध्ये दोन लाख किंवा त्यापेक्षा अधिक रोख रक्कम स्वीकारण्यास देखील मनाई करण्यात आलेली आहे.

 किती रुपयांच्या व्यवहारांमध्ये पॅन कार्ड बंधनकारक आहे?

समजा तुम्हाला 50 हजार रुपये किंवा त्यापेक्षा अधिक रकमेचा व्यवहार करायचा आहे तर अशा वेळेला त्या व्यक्तीला पॅन क्रमांक देणे केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाकडून बंधनकारक करण्यात आलेले आहे. पॅन कार्ड शिवाय एका वेळी इतकी रक्कम बँकेत जमा करता येत नाही किंवा काढून देखील घेता येत नाही.

 कोणत्या व्यवहाराची चौकशी होऊ शकते?

समजा एखाद्या व्यक्तीने 30 लाखांपेक्षा अधिक किमतीचे मालमत्तेची खरेदी किंवा विक्रीचा व्यवहार केला परंतु तो करताना रोखीने केला तर अशा व्यवहाराची तपास यंत्रणा चौकशी करू शकतात. एवढेच नाही तर एकाच वेळी एक लाखापेक्षा अधिक रकमेचा व्यवहार डेबिट किंवा क्रेडिट कार्डच्या माध्यमातून करण्यात आला तरी यंत्रणा चौकशी करू शकतात.

 किती रुपयाच्या रोखीच्या व्यवहारावर दंड लागू शकतो?

समजा बँकेतून जर एक कोटींपेक्षा जास्तीचे रक्कम काढून घेतले जात असेल तर त्या व्यक्तीला दोन टक्का इतका टीडीएस भरणे गरजेचे असते. तसेच दुसरे म्हणजे एका वेळी 20 लाख किंवा त्यापेक्षा अधिक रक्कमेचा रोखीच्या स्वरूपात व्यवहार करण्यात आला असेल तरीदेखील संबंधित यंत्रणा त्यावर दंड आकारू शकते.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe