Income Tax Rule: तुम्ही घरामध्ये किती कॅश ठेवू शकतात? काय आहेत यासंबंधीचे महत्त्वाचे नियम? वाचा ए टू झेड माहिती

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Income Tax Rule:- आज आपण अनेक बातम्यांमध्ये वाचतो किंवा ऐकतो की आयकर विभागाच्या माध्यमातून बऱ्याच ठिकाणी छापे पडतात व अशा छापेमारीत मोठ्या प्रमाणावर रोकड जप्त करण्यात येते. त्यामुळे आपल्याला बऱ्याचदा मनामध्ये प्रश्न येत असेल की नेमके यासंबंधी आयकर विभागाचे नियम काय आहेत?

किंवा आपण घरामध्ये किती रोकड म्हणजेच कॅश ठेवू शकतो? कारण जर आपण यासंबंधी विचार केला तर या बाबतीत देखील काही महत्त्वाचे नियम आहेत. या नियमांना धरूनच तुम्हाला घरामध्ये रोकड  ठेवता येते. जरी आज पैशांचे व्यवहाराच्या बाबतीत डिजिटलायझेशन म्हणजेच ऑनलाइन पद्धत मोठ्या प्रमाणावर वापरली जात असली तरीदेखील भारतामध्ये बऱ्याच कुटुंबांमध्ये घरात पैसे ठेवण्याची जी काही अगोदरची पारंपारिक पद्धत होती तीच वापरली जाते.

बरेच व्यक्ती बँकेत पैसे ठेवण्याऐवजी मोठ्या प्रमाणामध्ये पैसे घरी ठेवतात. या अनुषंगाने तुम्ही घरामध्ये किती रोकड ठेवू शकतात हे तुम्हाला माहीत असणे खूप गरजेचे आहे. त्यामुळे या लेखात याबाबत आयकर विभागाचे नेमके काय नियम आहेत? हे देखील तुम्हाला माहीत असणे गरजेचे आहे. यासंबंधीचीच माहिती आपण या लेखात घेऊ.

 काय म्हणतो याबाबत आयकर खात्याचा नियम?

जर आपण याबाबत आयकर कायदा पाहिला तर त्यानुसार घरात तुम्ही जे काही पैसे ठेवतात त्यावर कोणत्याही प्रकारचे बंधन नाही. परंतु जर यदा कदाचित आयकर विभागाच्या माध्यमातून छापा टाकला गेला तर संबंधित व्यक्तीला घरात असलेली रोकड नेमकी कुठून आली आहे म्हणजेच तिचा स्त्रोत नेमका काय आहे हे उघड करणे गरजेचे राहील. तुमचे जे काही उत्पन्न आहे त्यापेक्षा जास्त रक्कम नसणे गरजेचे आहे.

समजा तुमच्या उत्पन्नापेक्षा जर जास्तीची रक्कम तुमच्या घरामध्ये रोख स्वरूपात आढळून आली तर तिचा हिशोब तुम्हाला देणे गरजेचे आहे नाहीतर तुम्ही अडचणीत येऊ शकतात. या माध्यमातून आयकर अधिकाऱ्यांकडून तुम्हाला दंड देखील ठोठावला जाऊ शकतो. यामध्ये एकूण रकमेच्या 137% पर्यंत दंड होऊ शकतो व एवढेच नाही तर तुमचे पैसे देखील जप्त केले जाऊ शकतात.

 आयकर विभागाच्या नियमानुसार तुम्ही किती रोकड ठेवू शकता?

1- यामध्ये सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे कोणत्याही व्यक्तीला कर्ज किंवा ठेवीकरिता वीस हजार रुपये किंवा त्याहून जास्तीचे रोख रक्कम स्वीकारण्याची परवानगी नाही. हाच नियम स्थावर मालमत्तेच्या हस्तांतरणाला देखील लागू होतो.

2- कोणत्याही आर्थिक वर्षांमध्ये जर तुम्ही वीस लाख रुपयांपेक्षा जास्त रोखीने व्यवहार केला तर त्याचे स्त्रोत आणि खाते माहीत नसल्यास दंड देखील लागू केला जाऊ शकतो.

3- जर आपण याबाबत सीबीडीटी म्हणजे सेंट्रल बोर्ड ऑफ डायरेक्ट टॅक्सेशनचा विचार केला तर त्यांच्या मते एकावेळी 50,000 पेक्षा जास्त रक्कम जमा करण्याकरिता किंवा तेवढी रक्कम काढण्याकरता तुम्हाला पॅन क्रमांक आणि इतर आवश्यक तपशील देणे गरजेचे आहे.

4- एखाद्या खातेदाराने जर एका वर्षामध्ये वीस लाख रुपये जास्त रोख रक्कम जमा केली तर त्याला पॅन आणि आधार माहिती प्रदान करण्यास आवश्यक राहील.

5- समजा एखाद्या व्यक्तीने 30 लाख रुपयांपेक्षा जास्त रकमेची जी काही मालमत्ता आहे तिची विक्री किंवा खरेदी रोखीने केली तर कोणताही भारतीय नागरिक तपास यंत्रणेच्या घेऱ्यात येऊ शकतो.

6- तुमचा एखाद्या व्यक्तीने क्रेडिट आणि डेबिट कार्डच्या माध्यमातून पेमेंट केले व ते एका वेळी एक लाख रुपयांपेक्षा जास्त केले तर त्या व्यक्तीविरुद्ध चौकशी केली जाऊ शकते.

7- तसेच एका दिवसामध्ये सात नातेवाईकांकडून सुमारे दोन लाख रुपये जरी रोख रक्कम घ्यायची राहिली तरी तुम्ही ती घेऊ शकत नाही. अशा प्रकारचे पेमेंट तुम्हाला बँकेच्या माध्यमातूनच करणे गरजेचे आहे.