Investment In Gold: सोन्यातील गुंतवणूक करणार श्रीमंत! पुढच्या दिवाळीपर्यंत ‘इतके’ दर वाढण्याची शक्यता, वाचा का वाढतील सोन्याचे दर?

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Investment In Gold:- कष्टाने कमावलेल्या पैशाची गुंतवणूक हा मुद्दा खूप महत्त्वाचा आणि तेवढा संवेदनशील देखील असतो. गुंतवणूक करताना  कोणत्याही ठिकाणी जेव्हा व्यक्ती गुंतवणूक  करत असतो तेव्हा तो केलेली गुंतवणूक सुरक्षित राहण्याच्या दृष्टिकोनातून आणि योग्य परतावा मिळावा याबाबतीत विचार करूनच गुंतवणूक करतो.

गुंतवणुकीसाठी बाजारामध्ये अनेक पर्याय उपलब्ध आहेत. परंतु या सगळ्या पर्यायांच्या तुलनेमध्ये सोन्यात केलेली गुंतवणूक हा एक सुरक्षित पर्याय म्हणून समजला जातो.भारताचा विचार केला तर भारतीयांमध्ये सोन्यामध्ये गुंतवणूक करण्याला मोठ्या प्रमाणावर पसंती दिली जाते.

गुंतवणूकच नव्हे तर स्त्रियांमध्ये दागिने बनवण्याच्या दृष्टिकोनातून देखील सोन्याचे महत्त्व असल्यामुळे सोन्याची खरेदी मोठ्या प्रमाणावर होत असते. याच अनुषंगाने जर तुम्हाला देखील सोन्यात गुंतवणूक करायचे असेल किंवा तुम्ही करत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी आहे.

 येणाऱ्या वर्षात सोने करणार आणखी श्रीमंत?

गुंतवणुकीसाठी सुरक्षित पर्याय म्हणून सोन्याकडे पाहिले जाते व या दृष्टिकोनातून भारतीय गुंतवणूकदार मोठ्या प्रमाणावर सोन्यात गुंतवणूक करतात. या गुंतवणुकीच्या दृष्टीने जर आपण जगभरातील विविध क्षेत्रातील सध्याची स्थिती पाहिली तर येणाऱ्या वर्षात सोन्याचे दर तेजीमध्येच राहण्याची शक्यता आहे.

जर आपण या क्षेत्रातील तज्ञांचा विचार केला तर त्यांच्यामध्ये वर्षभरामध्ये सोने 70 हजारांचा टप्पा पार करेल असा त्यांचा अंदाज आहे. तसेच ज्यांनी सोन्यामध्ये गुंतवणूक केली होती अशांना वर्षभरामध्ये खूप चांगल्या पद्धतीचे रिटर्न देखील मिळाले आहेत. सध्या सोन्याच्या दरात वाढ होत असून मध्यपूर्वेमध्ये जी काही भू-राजकीय अस्थिरता निर्माण झाली आहे

त्यामुळे ही परिस्थिती दिसून येत आहे. सोन्याच्या दरावर परिणाम करणाऱ्या घटकांचा विचार केला तर यामध्ये डॉलर,इंडेक्स, व्याजदर आणि खनिज तेलाचे दर यांचा देखील मोठा परिणाम होत असतो  व यामुळे येणाऱ्या कालावधीत देखील सोन्याच्या दरात तेजी राहील अशी शक्यता आहे.

 किती वाढू शकतात सोन्याचे दर?

जर आपण गेल्या तीन ते साडेतीन वर्षाचा सोन्याच्या दराचा विचार केला तर ते 2075 डॉलर प्रति औसच्या आसपास आहेत. या कालावधीमध्ये तीनदा सोन्याच्या दरांनी उच्चांक देखील स्थापित केला आहे. समजा जर सोन्याच्या पुरवठ्यावर काही प्रमाणामध्ये निर्बंध आणण्यात आले तर दरामध्ये वाढ होऊन ते 2250 ते 2400 डॉलर प्रति औस पर्यंत वाढण्याची शक्यता देखील आहे. जर या आकड्याचा भारतीय चलनात विचार केला तर भारतीय बाजारपेठेत सोन्याचे दर 68 ते 70 हजार पर्यंत जाण्याची शक्यता आहे.

 सोन्याच्या दरात तेजी येण्यासाठी हे घटक ठरतील प्रभावी

जर आपण जागतिक पातळीचा विचार केला तर सोन्याचे दर तेजीत राहण्यासाठी पुढील वर्षी अमेरिकेमध्ये राष्ट्राध्यक्षपदाची जी काही निवडणूक होत आहे ती देखील कारणीभूत ठरणार आहे. कारण फेडरल रिझर्व करून व्याजदरात काही प्रमाणात कपात करून अर्थव्यवस्थेमध्ये जास्त प्रमाणामध्ये पैसा राहण्याची शक्यता आहे व त्यामुळे सोन्याच्या खरेदीमध्ये वाढ होवून दरवाढ होऊ शकते. तसेच दुसरे कारण म्हणजे मध्यपूर्वेतील युद्ध लवकर थांबवण्याचे प्रयत्न झाल्यास खनिज  तेलाचे वाढणारे दर कमी होऊन सोन्याची खरेदी जास्त प्रमाणात होण्याची शक्यता आहे.

 सोन्याने तीन वर्षात दिला 20 टक्के परतावा

सोन्यामध्ये गुंतवणूक केलेल्या गुंतवणूकदारांचा विचार केला तर सोन्याच्या माध्यमातून 20 टक्क्याचा परतावा मिळालेला आहे. सन 2021-22 व 2022-23 या वर्षांमध्ये अनुक्रमे 10 आणि 20 टक्क्यांची वाढ झाली असून याचाच अर्थ सोन्याच्या आकर्षणामध्ये देखील वाढ झालेली आहे. जर तीन वर्षांमध्ये धनत्रयोदशीला असलेल्या सोन्याच्या भावाचा अभ्यास करून जर वर्षभरात त्यापासून किती परतावा मिळाला याचा अभ्यास केला तर सोन्याने वीस टक्के परतावा दिल्याचे दिसून येते.