Investment In SIP: मुलां-मुलींच्या लग्नाचा बार उडवाल धुमधडाक्यात! वाचा किती गुंतवणूक कराल तर मिळतील 20 लाख

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

nvestment In SIP:- भविष्यकालीन आर्थिक गरजा पूर्ण करण्याच्या दृष्टिकोनातून गुंतवणुकीला खूप मोठे महत्त्व असते. परंतु गुंतवणूक करण्याला जितके महत्त्व आहे त्यापेक्षा त्या गुंतवणुकीतून आपल्याला परतावा किती मिळणार याचा विचार करणे देखील तितकेच गरजेचे असते.

त्या दृष्टिकोनातून अनेक वेगवेगळ्या पर्यायांच्या माध्यमातून गुंतवणूक करत असतात. आपल्याला माहित आहेच की गुंतवणुकीचे अनेक पर्याय उपलब्ध आहेत. परंतु यामध्ये एसआयपीत केलेली गुंतवणूक ही खूप फायद्याची ठरते व तुम्ही जर दीर्घकालीन एसआयपीमध्ये गुंतवणूक केली तर एक चांगला निधी उभा करू शकतात.

तुम्हाला शेअर बाजारामध्ये थेट गुंतवणूक करायची नसेल तर तुमच्यासाठी एसआयपी हा चांगला पर्याय आहे. या गुंतवणुकीचा वापर तुम्ही तुमच्या मुला मुलींचे शिक्षण आणि लग्नासाठी करू शकतात. त्या अनुषंगाने आपण एसआयपी कॅल्क्युलेटर नुसार किती गुंतवणूक केल्यावर तुम्हाला जास्तीचा परतावा मिळेल हे पाहणार आहोत.

 वीस लाख रुपये मिळवायचे असतील तर किती गुंतवणूक करावी लागेल?

मुला मुलींच्या शिक्षणाची व लग्नाची काळजी प्रत्येक पालकाला असते. त्यामुळे त्या दृष्टिकोनातून गुंतवणूक लवकरात लवकर सुरू करणे खूप गरजेचे आहे. त्यामुळे भविष्यकालीन आर्थिक अडचणीच्या वेळी खर्च पूर्ण करता यावा याकरिता एसआयपीमध्ये गुंतवणूक करणे महत्त्वाचे आहे. एसआयपी म्हणजे सिस्टिमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लान होय.

यामध्ये पद्धतशीरपणे गुंतवणूक केली जाते. यामध्ये तुम्हाला एका नियमित कालावधीत ठराविक रक्कम जमा करणे गरजेचे असते. समजा तुम्हाला एसआयपीमध्ये गुंतवणूक करून 20 लाख रुपयांचा फंड तयार करायचा असेल तर एसआयपी कॅल्क्युलेटर नुसार तुम्हाला प्रत्येक महिन्याला 25 हजार रुपये गुंतवणूक करणे गरजेचे आहे.

त्यानुसार तुमचे एका वर्षांमध्ये तीन लाख रुपये गुंतवणूक होते. गुंतवणूक तुम्हाला पाच वर्षापर्यंत करणे गरजेचे आहे. संपूर्ण पाच वर्षांमध्ये तुमचे 15 लाख रुपये यामध्ये जमा होतात. समजा तुम्ही या केलेल्या गुंतवणुकीवर तुम्हाला जर बारा टक्क्यांचा वार्षिक परतावा मिळेल. तसेच महत्त्वाचे म्हणजे या व्याजावर तुम्हाला चक्रवाढ व्याजाचा लाभ देखील मिळतो.

तुम्हाला व्याजावर व्याज देखील मिळु शकते.यामध्ये तुम्हाला एसआयपी गुंतवणुकीवर एकूण पाच लाख 62 हजार 159 रुपये व्याज मिळेल. ही योजना परिपक्व अर्थात मॅच्युरेट झाल्यानंतर तुम्हाला गुंतवणुकीची रक्कम आणि व्याजाची रक्कम मिळून एकत्रित 20 लाख 62 हजार 159 रुपये मिळतात.

फक्त यामध्ये लक्षात ठेवण्याची गोष्ट म्हणजे तुम्हाला एसआयपीच्या माध्यमातून चांगला नफा मिळवायचा असेल तर तुम्हाला दीर्घ कालावधीसाठी गुंतवणूक करणे गरजेचे असते. तसेच शेअर मार्केटमधील जे काही चढ उतार होतात त्याचा देखील एसआयपी

च्या परताव्यावर परिणाम करत असतात. त्यामुळे तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला घेऊन यामध्ये गुंतवणूक करावी.