Investment Plan: अशा प्रकारची गुंतवणूक तुम्हाला बनवेल करोडपती! वाचा करोडपती बनण्याचा मार्ग

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Investment Plan:- बचत आणि बचतीची गुंतवणूक ही भविष्यातील आर्थिक गरजा किंवा काही आपत्कालीन परिस्थितीसाठी खूप महत्त्वाचे असते. दुसरे महत्त्वाचे म्हणजे चांगल्या ठिकाणी गुंतवणूक केल्यामुळे भविष्यकाळात येणारा परतावा हा देखील खूप महत्त्वाचा असतो. त्यामुळे गुंतवणूक करताना गुंतवणूकदार सर्वप्रथम गुंतवणूक केल्यानंतर तिची सुरक्षितता आणि मिळणारा परतावा या महत्त्वाच्या गोष्टी डोळ्यासमोर ठेवून त्या पद्धतीने नियोजन करतात.

गुंतवणुकीसाठीचे अनेक पर्याय सध्या उपलब्ध आहेत व ज्याच्या त्याच्या पसंतीने किंवा ज्या ठिकाणी जास्त फायदा मिळेल किंवा जास्त परतावा मिळेल अशा ठिकाणी व्यक्ती गुंतवणूक करत असतो. सध्या वाढत्या महागाईमुळे  जितका जास्त पैसा जमा करता येईल तितके खूप महत्त्वाचे असते.

तसेच प्रत्येकाला श्रीमंत व्हायचे असते व श्रीमंतीचा मार्ग हा बचत आणि चांगल्या ठिकाणी केलेल्या गुंतवणुकीतून जातो. त्याच अनुषंगाने आपण गुंतवणुकीचा असा पर्याय बघणार आहोत ज्या माध्यमातून तुम्ही गुंतवणूक सुरक्षित देखील ठेवू शकतात व  चांगला परतावा मिळवून करोडपती होण्याच्या दिशेने वाटचाल करू शकतात व तो पर्याय आहे म्युच्युअल फंड होय.

कोणता म्युच्युअल फंड गुंतवणुकीतून जास्त परतावा देतो?

तुम्हाला गुंतवणूक करायची आहे व ती म्युच्युअल फंडामध्ये करायची असेल तर इक्विटी म्युच्युअल फंड हा पैसे गुंतवणुकीसाठी खूप उत्तम पर्याय आहे. यामध्ये तुम्ही तुमची छोटीशी बचत एसआयपीच्या माध्यमातून गुंतवून एक मोठा फंड तयार करू शकतात. तुम्ही जर दहा वर्षात सतत म्युच्युअल फंडातील एसआयपीमध्ये गुंतवणूक केली तर तुम्हाला कमीत कमी 12 टक्के वार्षिक परतावा मिळण्याची शक्यता असते.

यामध्ये तुमची गुंतवणूक वाढवण्यासाठी समजा तुम्ही नुकतेच एखादी नोकरी किंवा व्यवसायाची सुरुवात केलेली आहे व तुम्ही तुमच्या आयुष्याच्या कारकिर्दीच्या पहिल्या टप्प्यात असाल तर तुम्ही दहा वर्षाचे टार्गेट ठेवून या कालावधीमध्ये एक कोटी रुपयांचा फंड तयार करू शकता.

याकरिता तुम्हाला महिन्याच्या अर्थात मासिक एसआयपीमध्ये  वार्षिक स्टेप अपचा पर्याय निवडणे गरजेचे आहे व विशिष्ट कालावधीनंतर या माध्यमातून तुमचे एसआयपी मधील योगदान वाढते. या पर्यायाची जर तुम्ही निवड केली तर तुमची एसआयपी रक्कम प्रत्येक वर्षी काही टक्क्यांनी वाढू शकते. तसेच तुम्ही तुमचे आर्थिक उत्पन्नातील वर्षाची वाढ व तुमच्या आर्थिक उद्दिष्ट यानुसार एसआयपी मधील गुंतवणुकीची रक्कम वाढवू शकता.

 दर महिन्याला किती गुंतवणूक करावी?

दहा वर्षांमध्ये तुम्ही एसआयपीद्वारे एक कोटी रुपयांचा फंड उभा करू शकतात परंतु त्याकरिता तुम्हाला वार्षिक स्टेप अप 20% ठेवावा लागेल व या ठिकाणी जर एसआयपी कॅल्क्युलेटर नुसार वार्षिक 12 टक्के परताव्यासाठी तुम्ही 21 हजार रुपयांच्या मासिक एसआयपी ने सुरुवात करणे गरजेचे आहे. अशा पद्धतीने तुम्ही अंदाजे 12% परतावा, वार्षिक स्टेप अप 20% आणि दहा वर्षाचा कालावधी असल्यास तुम्ही एक कोटींचा निधी जमा करू शकतात.

जर एसआयपी कॅल्क्युलेटरचा विचार केला तर त्यानुसार दहा वर्षानंतर तुमची एकूण गुंतवलेली रक्कम 65 लाख 41 हजार 588 रुपये असली तर ३८,३४५५६ रुपये त्यावर परतावा मिळेल. अशा पद्धतीने तुम्ही एसआयपीच्या मॅच्युरिटी पर्यंत एक कोटी तीन लाख 76,144 रुपयांचा निधी जमा करू शकता. त्यामुळे गुंतवणूक तज्ञांच्या सल्ल्याने जर तुम्ही व्यवस्थित एसआयपी मध्ये गुंतवणूक केली तर काही वर्षात तुम्ही कोट्याधीश होऊ शकतात.