Investment Scheme: ‘या’ योजनेत पैसे गुंतवून मिळू शकतात 1 कोटी रुपये; मिळते 7.1% व्याज, समजून घ्या या योजनेतील गुंतवणुकीचे संपूर्ण कॅल्क्युलेशन

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Investment Scheme:- सध्या बाजारामध्ये गुंतवणुकीसाठी अनेक उत्तम असे पर्याय उपलब्ध असून प्रत्येक गुंतवणूकदार गुंतवणूक करताना गुंतवणुकीची सुरक्षितता आणि मिळणारा परतावा या दृष्टिकोनातून गुंतवणूक पर्याय निवडत असतात. यामध्ये अनेक सरकारच्या योजनांचा समावेश असून त्यासोबत बँकांच्या मुदत ठेव योजना,

पोस्ट ऑफिसच्या अनेक अल्पबचत योजना अलीकडच्या कालावधीत गुंतवणुकीसाठी सगळ्यात मोठ्या प्रमाणावर ट्रेंड वाढत चाललेला आहे तो म्हणजे म्युच्युअल फंड एसआयपी होय. परंतु या सगळ्या योजनांमध्ये जर आपण पब्लिक प्रॉव्हिडंट फंड अर्थात पीपीएफ या योजनेच्या अनुषंगाने पाहिले तर ही योजना गुंतवणुकीसाठी खूप महत्त्वाची आहे.

तुम्ही या नवीन सुरू झालेल्या आर्थिक वर्षांमध्ये जर या योजनेत गुंतवणूक केली तर मार्च 2025 पर्यंत तुमची आर्थिक स्थिती मजबूत होईलच, परंतु तुम्हाला करमाफीचा देखील फायदा या माध्यमातून मिळतो.

या योजनेच्या माध्यमातून सध्या 7.1% वार्षिक व्याजदर दिला जात असून कर सवलतीचा लाभ देखील या योजनेतील गुंतवणुकीवर मिळतो. पब्लिक प्रॉव्हिडंट फंड ही अशी एक योजना आहे की यामध्ये तुम्ही एक कोटी रुपयांपेक्षा जास्तचा फंड तयार करू शकता. या योजनेची संपूर्ण माहिती या लेखात घेऊ.

 पीपीएफ योजनेमध्ये खाते उघडण्यासाठी किती पैसे लागतात?

पब्लिक प्रॉव्हिडंट फंड अर्थात पीपीएफ योजनेमध्ये जर खाते उघडायचे असेल तर कमीत कमी पाचशे रुपये तुम्हाला लागतात. या योजनेत जर तुम्हाला गुंतवणूक सुरू करायची असेल तर एका आर्थिक वर्षांमध्ये कमीत कमी पाचशे रुपये जमा करणे गरजेचे असते व यासोबतच दीड लाख रुपये कमाल मर्यादा निश्चित करण्यात आलेली आहे.

 या योजनेचा पूर्ण होण्याचा म्हणजेच परिपक्वता कालावधी किती आहे?

पब्लिक प्रॉव्हिडंट फंड खाते हे पंधरा वर्षांमध्ये मॅच्युअर्ड अर्थात परिपक्व होते. योजना परिपक्व झाल्यानंतर तुम्ही गुंतवलेले संपूर्ण पैसे काढू शकतात. परंतु यामध्ये एक बाब लक्षात ठेवावी की जर तुम्हाला पैशांची आवश्यकता नसेल तर तुम्ही प्रत्येकी पाच वर्षांसाठी या कालावधीत वाढ करू शकतात. परंतु मुदत पूर्ण होण्यापूर्वी तुम्हाला एक वर्ष अगोदरच ही वाढ करावी लागते.

 या योजनेत गुंतवणूक केल्यानंतर किती वर्षापर्यंत पैसे काढता येत नाहीत?

पब्लिक प्रॉव्हिडंट फंड खाते उघडल्यानंतर पाच वर्षापर्यंत या खात्यातून तुम्हाला कुठल्याही पद्धतीने पैसे काढता येत नाहीत. म्हणजेच या योजनेचा लॉक इन पिरेड पाच वर्षाचा आहे. परंतु हा कालावधी पूर्ण झाल्यानंतर तुम्ही फॉर्म-2 भरून पैसे काढू शकतात. परंतु जर तुम्ही अशा पद्धतीने अगोदरच पैसे काढत असाल तर तुमच्या फंडातून एक टक्के कपात केली जाते. हे यामध्ये लक्षात ठेवा.

 तुम्ही पीपीएफ योजनेतून एक कोटी कसे जमा करू शकता?

समजा तुम्हाला देखील या योजनेमध्ये गुंतवणूक करून एक कोटी रुपयांचा निधी तयार करायचा असेल तर तुम्हाला 25 वर्षे यामध्ये प्रत्येक महिन्याला साडेबारा हजार रुपये गुंतवणूक गरजेचे राहील. तसेच दुसरे म्हणजे जर प्रत्येक महिन्याला तुम्ही दहा हजार रुपये गुंतवायला सुरुवात केली तर 25 वर्षानंतर तुम्हाला अंदाजे 81 लाख 76 हजार रुपये मिळतील.

 पीपीएफ योजनेत खाते कुणाला कुठे उघडता येते?

पब्लिक प्रॉव्हिडंट फंड योजनेमध्ये कोणत्याही व्यक्तीला खाते उघडता येते. या योजनेचे खाते तुम्ही पोस्ट ऑफिस किंवा बँकेत उघडू शकतात. समजा तुम्हाला जर एखाद्या अल्पवयीन व्यक्तीच्या माध्यमातून खाते उघडायचे असेल तर त्या वतीने कोणतेही इतर व्यक्ती ते खाते उघडू शकते.