Investment Tips: तुमचा पैसा दुप्पट वाढवायचा असेल तर ‘या’ मॅच्युअल फंड योजना ठरतील फायद्याच्या! वाचा ए टू झेड माहिती

Ajay Patil
Published:
nippon matual fund scheme

Investment Tips:- गुंतवणुकीसाठी अनेक पर्याय उपलब्ध असल्यामुळे बरेच जण चांगला परतावा मिळण्याच्या दृष्टिकोनातून आणि केलेली गुंतवणूक सुरक्षित राहील हा उद्देश डोळ्यासमोर ठेवून गुंतवणूक करतात. प्रामुख्याने अजून देखील बँकांमध्ये एफडीच्या स्वरूपात केलेली गुंतवणूक बरेच जण सुरक्षित मानतात व ती सुरक्षित असते देखील.

परंतु बँका व्यतिरिक्त आता बरेच जण वेगवेगळ्या प्रकारचे शेअर्स खरेदी करणे म्हणजेच एकंदरीत शेअर  बाजारातील गुंतवणूक, एलआयसी सारख्या नामांकित कंपन्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक करतात. परंतु गुंतवणूक करताना नेहमी गुंतवणुकीचे सुरक्षितता आणि मिळणारे रिटर्न्स या बाबी खूप महत्त्वाच्या असतात.

यामध्ये गेल्या काही वर्षांपासून म्युच्युअल फंडात  केलेली गुंतवणूक आणि यामध्ये गुंतवणूकदारांची वाढती संख्या खूप महत्त्वाची बाब आहे. आपण पाहिले तर अनेक चांगल्या म्युच्युअल फंड कंपन्यांनी गुंतवणूकदारांना खूप चांगले रिटर्न्स देण्याचे काम केलेले आहे.

म्युच्युअल फंड योजनांचा विचार केला तर यामध्ये निप्पॉन म्युच्युअल फंड  योजनांनी गेल्या काही वर्षांमध्ये दोन ते तीन पटींनी परतावा गुंतवणूकदारांना दिलेला आहे. उदाहरणच घ्यायचे झाले तर निप्पॉन म्युच्युअल फंडच्या सगळ्या योजनांनी गेल्या तीन वर्षांमध्ये प्रत्येक वर्षाला सरासरी 30%  परतावा दिलेला आहे. याचा अनुषंगाने आपण या लेखात निप्पॉन म्युच्युअल फंडाच्या टॉप योजना कोणत्या आहेत त्याबद्दल माहिती घेणार आहोत.

निप्पॉन म्युच्युअल फंडच्या टॉप योजना

1- निप्पॉन इंडिया पॉवर अँड इन्फ्रा म्युच्युअल फंड योजना एक खूप चांगली योजना असून या योजनेचा विचार केला तर गेल्या तीन वर्षापासून गुंतवणूकदारांना गुंतवणुकीवर चांगला परतावा दिला आहे. जर गेल्या तीन वर्षाचा परताव्याची सरासरी पाहिली तर ती दरवर्षी 39.12% इतकी राहिली आहे व हा फंड तीन वर्षात एक लाख रुपयांवरून तीन लाख 12 हजार रुपयांवर गेला आहे.

2- निप्पॉन स्मॉल कॅप मॅच्युअल फंड म्युच्युअल फंडची ही देखील योजना खूप महत्त्वपूर्ण असून या योजनेने देखील गेल्या तीन वर्षापासून चांगला परतावा देण्यामध्ये सातत्य ठेवलेले आहे. तीन वर्षाच्या परताव्याची वार्षिक सरासरी पाहिली तर ती 44.38% इतकी राहिली आहे. गेल्या तीन वर्षात हा फंड एक लाख रुपयांवरून तीन लाख 69 हजार रुपयांवर गेला आहे.

3- निप्पॉन इंडिया मल्टी कॅप म्युच्युअल फंड गेल्या तीन वर्षापासून चांगला परतावा देण्यामध्ये या योजनेदेखील सातत्य ठेवले असून गेल्या तीन वर्षाचा या योजनेचा दरवर्षी परताव्याची सरासरी पाहिली तर ती 39.11% इतकी राहिली आहे. गेल्या तीन वर्षात हा फंड एक लाख रुपयांवरून तीन लाख 17 हजार रुपयांवर गेला आहे.

4- निप्पॉन इंडिया ग्रोथ म्युच्युअल फंड ही योजना देखील उत्तम परतावा देण्यासाठी प्रसिद्ध आहे व गेल्या तीन वर्षाची परताव्याची दरवर्षीचे सरासरी पाहिली तर ती 35.34% इतकी आहे व तीन वर्षांमध्ये एक लाख रुपयाचा फंड हा 2.84 लाख रुपये इतका झाला आहे.

5- निप्पॉन इंडिया बँकिंग अँड फायनान्शिअल सर्विसेस म्युच्युअल फंड योजना म्युच्युअल फंडची ही योजना देखील गेल्या तीन वर्षापासून चांगला परतावा देण्यामध्ये प्रसिद्ध ठरली असून गेल्या तीन वर्षात हा परतावा सरासरी दरवर्षी 35.51% इतका राहिला असून तीन वर्षांमध्ये हा फंड एक लाख रुपयांवरून 2.83 लाख रुपये इतका झाला आहे.

6- निप्पॉन इंडिया लार्ज कॅप म्युच्युअल फंड ही योजना देखील गेल्या तीन वर्षापासून सातत्याने चांगला परतावा देत असून गेल्या तीन वर्षात हा परतावा दरवर्षी 31.06% टक्के इतका राहिला आहे. तीन वर्षांमध्ये हा फंड एक लाख रुपयांवरून 2.50 लाख इतका वाढला आहे.

7- निप्पॉन इंडिया फोकस्ड इक्विटी म्युच्युअल फंड– ही देखील योजना तीन वर्षापासून सातत्याने चांगला परतावा देण्यासाठी प्रसिद्ध आहे. या योजनेचा तीन वर्षाचा जर आपण परतावा देण्याचा दर वर्षाचा दर पाहिला तर तो सरासरी 30.14% इतका राहिलेला आहे. हा फंड तीन वर्षांमध्ये एक लाख रुपयांवरून 2.44 लाख रुपयांपर्यंत गेला आहे.

8- निप्पॉन इंडिया व्हॅल्यू मॅच्युअल फंड योजना गेल्या तीन वर्षापासून या फंडाने देखील सातत्याने चांगला परतावा गुंतवणूकदारांना दिला आहे व तीन वर्षांमध्ये सरासरी 30.05% प्रति वर्ष या दराने परतावा राहिला असून तीन वर्षांमध्ये हा फंड एक लाख रुपयांवरून 2.43 लाख रुपयांपर्यंत झाला आहे.

त्यामुळे गुंतवणूक तज्ञांच्या सल्ल्याने तुम्ही निप्पॉन म्युच्युअल फंड योजनांचा फायदा गुंतवणुकीसाठी घेऊ शकता.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe