Investment Tips: गुंतवणूक करायची असेल तर सोन्यात करावी की रियल इस्टेटमध्ये? कुठे मिळेल जास्त पैसा? वाचा माहिती

Ajay Patil
Published:
investment tips

Investment Tips:- आपण जो काही कष्टाने पैसा कमावतो त्या पैशांची बचत करून त्या बचतीची गुंतवणूक चांगल्या ठिकाणी करणे हे भविष्यातील आर्थिक सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून खूप महत्त्वाची बाब आहे. त्यामुळे बरेच व्यक्ती हे गुंतवणूक करताना कोणत्या गुंतवणुकीतून जास्तीत जास्त परतावा म्हणजेच आर्थिक फायदा आपल्याला मिळेल याचा विचार करून गुंतवणूक करत असतात.

यापैकी बरेच जण म्युच्युअल फंड एसआयपी, विविध बँकांच्या मुदत ठेव ठेव योजना आणि पोस्ट ऑफिसच्या अनेक योजनांमध्ये गुंतवणूक करतात. त्यासोबतच सोन्यात देखील मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक करण्याचा कल दिसून येतो. तसेच प्लॉट किंवा जमीन, घर इत्यादी रियल इस्टेट सारखे क्षेत्र देखील गुंतवणूक केली जाते.

परंतु जर यामध्ये पाहिले तर गुंतवणूक करताना नेमकी रियल इस्टेट मध्ये करावी की सोन्यामध्ये? हा देखील प्रश्न बऱ्याच जणांसमोर पडतो. म्हणजे या दोघांपैकी कशात गुंतवणूक केल्याने आपल्याला चांगला फायदा मिळू शकतो हे खूप महत्त्वाचे असते. या अनुषंगाने या लेखात आपण दोघांपैकी कुठे आपल्याला पैसा गुंतवून चांगला फायदा मिळेल? याबद्दलची माहिती घेऊ.

सोन्यात गुंतवणूक करणे फायदेशीर ठरेल की रियल इस्टेटमध्ये
यामध्ये प्रामुख्याने तुम्ही नवीन गुंतवणूकदार असाल तर कमीत कमी गुंतवून आधी त्याचा फायदा घेणे खूप गरजेचे आहे. त्यामुळे सोन्यात गुंतवणूक करणे हा एक चांगला पर्याय नवीन गुंतवणूकदारांसाठी असू शकतो.

त्या तुलनेमध्ये जर रियल इस्टेट मधील गुंतवणुकीचा विचार केला तर या गुंतवणुकीमध्ये तुम्हाला अतिरिक्त कर लाभ सोबत नियमित स्वरूपात उत्पन्न निर्माण करण्याची क्षमता तयार होऊ शकते. व्यावसायिक किंवा निवासी रियल इस्टेटमध्ये मासिक भाड्याच्या स्वरूपामध्ये तुम्हाला उत्पन्न मिळू शकते. जे सोन्यामध्ये तुम्हाला शक्य नाही.

गुंतवणुकीच्या परताव्यानुसार पाहिले तर

गुंतवणूक परताव्यानुसार विचार केला तर वाढत्या भाड्यामुळे रिअल इस्टेट वार्षिक परतावा पंधरा टक्के देऊ शकते. तर सोन्याचा वापर तुम्ही महागाईपासून स्वतःला वाचवण्यासाठी करू शकतात. म्हणजेच सोन्यापासून जो काही परतावा मिळतो तो महागाई शी सुसंगत असतो. परंतु सोन्यातील गुंतवणुकीतील परतावा केवळ नाममात्र असू शकतो. त्या दृष्टिकोनातून रियल इस्टेट हा एक स्थिर गुंतवणूक पर्याय असून यामध्ये केलेल्या गुंतवणुकीच्या बाबत जोखीम मात्र कमी असते.

सोन्याच्या गुंतवणुकीचा विचार केला तर याचा व्यवहार एक्सचेंजवर होतो यामुळे गुंतवणुकीत प्रचंड अस्थिरता असण्याची शक्यता असते. तसेच रिअल इस्टेट मध्ये गुंतवणूक करत असेल तर जास्त प्रमाणात पैसा लागू शकतो. यामध्ये तुम्हाला घेतलेले कर्ज परतफेडण्यापासून ते सिमेंट तसेच गृहनिर्माण वित्त, बांधकामासाठी लागणारे साहित्य आणि इतर अनेक गोष्टी मोठ्या प्रमाणावर रियल इस्टेट वर अवलंबून आहेत

व यामुळे मोठ्या प्रमाणात अनौपचारिक आणि प्रत्यक्ष रोजगाराच्या संधी देखील निर्माण होतात. त्यामुळे मोठ्या प्रमाणावर अर्थव्यवस्थेला देखील आधार मिळतो. सोन्यात केलेल्या गुंतवणुकीच्या तुलनेत रियल इस्टेट मधील गुंतवणूक ही सुरक्षित गुंतवणूक असण्यासोबतच ठराविक कालावधीत चांगला परतावा देखील देऊ शकते.

तसेच मालमत्ता तुम्ही भाड्याने देऊन देखील त्या माध्यमातून उत्पन्न मिळवू शकतात. रियल इस्टेटमधील गुंतवणुकीवर तुम्ही चांगल्या प्रकारचा कर लाभा सारखे अनेक फायदे मिळवू शकतात त्यामुळे सोन्याच्या तुलनेत रियल इस्टेट मधील गुंतवणूक हा एक गुंतवणुकीसाठी उत्तम पर्याय आहे.

सोने आणि रियल इस्टेट गुंतवणुकीतील प्रमुख मुद्दे
सोन्यात केलेली गुंतवणूक एका पिढीतून दुसऱ्या पिढीकडे ट्रान्सफर करता येऊ शकते तसेच यातील गुंतवणुकीचा सर्वात मोठा फायदा म्हणजे गुंतवणुकीसाठी लागणारी रक्कम ही कमीत कमी असू शकते. म्हणजेच तुम्ही यामध्ये 1000 रुपयापासून गुंतवणूक सुरू करू शकतात.

तसेच तुम्हाला अचानकपणे काही पैशांची गरज भासली तर तुम्ही गरजेनुसार सोने विकून रोख रक्कम मिळवू शकतात. त्यातून जर रियल इस्टेटचा विचार केला तर त्यासाठी गुंतवणूक करण्यात करिता मोठ्या प्रमाणावर पैसे लागतात. तसेच गुंतवणूकदाराकडे जास्त काळ होल्डिंग पावर असणे खूप गरजेचे आहे.

त्यामुळे दीर्घकालीन गुंतवणुकी करिता हा एक उत्तम पर्याय आहे. दीर्घ कालावधीनंतर रियल इस्टेट मधील मालमत्तेचे मूल्य कालांतराने वाढत जाते व योग्य ठिकाणी योग्य प्रकारे गुंतवणूक केल्यास रियल इस्टेट तुम्हाला प्रचंड आणि अविश्वसनीय पद्धतीचा नफा देऊ शकते. त्यामुळे गुंतवणूकदारांनी त्यांच्या सगळ्या आर्थिक क्षमतेचा विचार करून गुंतवणूक करणे गरजेचे आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe