Investment Tips: फक्त 150 रुपयांची बचत तुम्हाला मिळवून देईल 22 लाखापेक्षा जास्त पैसे! पण कशी? वाचा माहिती

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

“थेंबे थेंबे तळे साचे” ही उक्ती बचतीच्या बाबतीत खूप महत्त्वपूर्ण असून तुमची काही रुपयांची थोडी थोडी बचत देखील कालांतराने पैशांचा मोठा झराच तुम्हाला निर्माण करून देऊ शकते इतकी क्षमता या छोट्या बचतीमध्ये असते. फक्त तुमची बचत ही चांगल्या योजनांमध्ये गुंतवणे हे फार महत्त्वाचे आहे.

कारण भविष्यकालीन आर्थिक गरजांच्या दृष्टिकोनातून बचत व गुंतवणूक या गोष्टींना अनन्यसाधारण महत्त्व आहे. कारण भविष्यामध्ये मुलांचे शिक्षण, घरातील लग्न कार्यासारखे समारंभ, अचानक आणि अनपेक्षितपणे उद्भवणारे हॉस्पिटलचे खर्च याकरता तुम्ही बचत करून त्या पैशांची व्यवस्थित गुंतवणूक करणे खूप गरजेचे आहे. गुंतवणूक करण्यासाठी तुम्हाला लाखो रुपयांची आवश्यकता असते असे नाही.

तुम्ही अगदी छोटीशी रक्कम बचत करून तिच चांगल्या योजनांमध्ये गुंतवली तर तुम्ही दीर्घकालीन गुंतवणुकीच्या माध्यमातून चांगला पैसा जमा करू शकतात. अशा अनेक योजना आहेत की त्या गुंतवणुकीवर खूप चांगल्या पद्धतीने परतावा देतात. परंतु यामध्ये सिस्टिमॅटिक इन्वेस्टींग प्लान म्हणजेच पद्धतशीर गुंतवणूक ही खूप महत्त्वाची असून या माध्यमातून तुम्ही कमीत कमी गुंतवणुकीत देखील दीर्घ कालावधीत चांगला फंड जमा करू शकता.

 एसआयपी गुंतवणूक म्हणजे नेमके काय?

सिस्टिमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन म्हणजेच पद्धतशीर गुंतवणूक योजना ही खूप महत्त्वाची असून या माध्यमातून तुम्ही म्युच्युअल फंडामध्ये गुंतवणूक करू शकतात. साधारणपणे शेअर बाजाराशी निगडित असलेली ही  संकल्पना असून शेअर बाजारासारखी पैसे बुडण्याची भीती मात्र यामध्ये नसते.

शेअर बाजारातील जोखमीपासून तुम्हाला लांबच राहायचे असेल तर तुमच्याकरिता एसआयपी गुंतवणूक खूप पावरफुल ठरू शकते. गुंतवणूक तज्ञांच्या असा विश्वास आहे की जर एसआयपी मध्ये दीर्घ कालावधी करिता गुंतवणूक केली तर तुमची गुंतवणुकीची रक्कम जोखीम पासून मुक्त राहते व तोट्यापासून देखील तुम्ही तिला वाचवू शकतात. त्यामध्ये तुम्ही ठराविक रक्कम ठराविक कालावधीत गुंतवणूक गरजेचे असते.

 एसआयपी कॅल्क्युलेटर नुसार 150 रुपये गुंतवून 22 लाख कसे कमवता येतात?

जर तुम्ही या एसआयपी प्लॅन विषयी माहिती घेतली तर तुम्हाला यामध्ये दररोज 150 रुपये गुंतवणूक गरजेचे आहे. जेव्हा तुम्ही दररोज 150 रुपये गुंतवणूक कराल तेव्हा तुम्ही एका महिन्यामध्ये तब्बल साडेचार हजार रुपयांची गुंतवणूक यामध्ये कराल. एक वर्षाचा विचार केला तर एक वर्षात तुम्ही दीडशे रुपये प्रमाणे 54 हजार रुपयांची गुंतवणूक करतात.

ही गुंतवणूक तुम्हाला नियमितपणे पंधरा वर्षांसाठी करणे गरजेचे राहील व या पंधरा वर्षात तुमचे एसआयपीमध्ये आठ लाख दहा हजार रुपये  जमा होतील. दुसरी बाब म्हणजे जर आपण दीर्घकालीन एसआयपी मध्ये गुंतवणूक केली तर साधारणपणे 12 टक्क्यांचा वार्षिक परतावा आपल्याला मिळू शकतो.

जर तुम्हाला देखील 12 टक्क्यांचा परतावा मिळाला तर आकडेवारीनुसार तुम्हाला पंधरा वर्षात 14 लाख 60 हजार 592 रुपये इतकेच व्याज मिळेल. जेव्हा तुमची एसआयपी परिपक्व होते.तेव्हा तुमची गुंतवलेली रक्कम म्हणजेच आठ लाख दहा हजार व मिळणाऱ्या व्याजाची रक्कम 14 लाख 60 हजार 592 ही दोघं मिळून एकूण रक्कम होते 22 लाख 70 हजार 592 रुपये म्हणजेच  तुम्हाला पंधरा वर्षात रोज 150 रुपयाची गुंतवणूक एसआयपी मध्ये केली तर अशा पद्धतीने 22 लाखापेक्षा जास्त पैसे मिळू शकतात.