अपघात किंवा आजारपणामुळे नोकरी किंवा काम करणे अशक्य होत आहे का? तर अशावेळी कामाला येईल इन्कम प्रोटेक्शन इन्शुरन्स; वाचा संपूर्ण माहिती

बिकट परिस्थितीमध्ये तुम्हाला कामाला येऊ शकतो तो म्हणजे इन्कम प्रोटेक्शन इन्शुरन्स हा पर्याय होय.हा इन्शुरन्सचा प्रकार खूप महत्त्वाचा असून कुटुंबाच्या भविष्याची जबाबदारी निश्चित करण्याच्या कामी एखाद्या कठीण कालावधीमध्ये कुटुंबाचे जीवनमान सुरळीत राहील या दृष्टिकोनातून इन्कम प्रोटेक्शन इन्शुरन्सचे महत्व अनन्यसाधारण आहे.

Ajay Patil
Published:
income protection insurance

Income Protection Insurance:- जीवन हे अनिश्चित आणि धकाधकीचे असल्याचे म्हटले जाते व ते तितकच खरे आहे. जीवन जगत असताना व्यक्तीवर कोणत्या वेळेला कशी परिस्थिती उद्भवेल याचा कुठल्याही प्रकारचा नेम नसतो.

समजा सगळे काही सुरळीत चालू आहे व तुम्ही कुटुंबातील कर्ते आहात आणि अचानकपणे एखादा अपघात झाला किंवा तुम्हाला एखाद्या आजाराने ग्रासले व त्यानंतर नोकरी किंवा काम करणे तुम्हाला अशक्य होत असेल तर मात्र नंतर कुटुंबाची आर्थिक सुरक्षेच्या दृष्टिकोनातून खूप मोठी हेळसांड अशा वेळेस होऊ शकते.

अशावेळी तुमच्याकडे जर आर्थिक सुरक्षा नसेल तर मात्र खूप मोठ्या समस्या निर्माण होतात. बिकट परिस्थितीमध्ये तुम्हाला कामाला येऊ शकतो तो म्हणजे इन्कम प्रोटेक्शन इन्शुरन्स हा पर्याय होय.

हा इन्शुरन्सचा प्रकार खूप महत्त्वाचा असून कुटुंबाच्या भविष्याची जबाबदारी निश्चित करण्याच्या कामी एखाद्या कठीण कालावधीमध्ये कुटुंबाचे जीवनमान सुरळीत राहील या दृष्टिकोनातून इन्कम प्रोटेक्शन इन्शुरन्सचे महत्व अनन्यसाधारण आहे.

इन्कम प्रोटेक्शन इन्शुरन्स म्हणजेच उत्पन्न संरक्षण विमा म्हणजे काय?
एखाद्या वेळेस अपघात झाला किंवा आजारपणामुळे तुम्ही काम करू शकत नसाल तर हा विमा तुम्हाला आर्थिक मदत पुरवण्याचे काम करतो. तज्ञांच्या मते हा विमा अनेक प्रकारे तुम्हाला मदत करू शकतो….

1- महागाई पासून संरक्षण- सध्या महागाई प्रचंड प्रमाणात वाढली असून अशावेळी वाढत्या किमतींचा प्रभाव या विम्याच्या मदतीने कमी करता येऊ शकतो.

2- राहणीमानाचा दर्जा राखण्यास मदत करतो- इन्कम प्रोटेक्शन विमा हा तुमच्या आणि तुमच्या कुटुंबाच्या दैनंदिन गरजा पूर्ण करण्यास मदत करतो. जेणेकरून तुम्ही काम जरी करत नसाल तरी अशा परिस्थितीत तुमच्या कुटुंबाचा राहणीमानाचा दर्जा घसरत नाही.

3- तणाव कमी करतो- इन्कम प्रोटेक्शन इन्शुरन्स घेतला असेल तर कुटुंबाची आर्थिक सुरक्षितता राहते व त्याची खात्री आपल्याला असते. त्यामुळे अपघात किंवा आजारपणाची स्थिती उद्भवली तरी मानसिक ताण कमी होतो किंवा तो येत नाही.

4- आर्थिक नियोजनामध्ये मदत- इन्कम प्रोटेक्शन इन्शुरन्स हा तुमच्या नियमित उत्पन्नाचा स्त्रोत देखील बनु शकतो व तुमच्या बचतीचे रक्षण करतो. म्हणजेच अपघात किंवा आजारपणा सारखी आपत्कालीन परिस्थिती उद्भवली तरी तुम्हाला तुमची बचत खर्च करावी लागत नाही व तुमच्या बचतीचे संरक्षण होते व तुम्हाला योग्य प्रकारे आर्थिक नियोजन करता येते.

इन्कम प्रोटेक्शन इन्शुरन्स घेताना ही काळजी घ्या

1- कुटुंबाच्या गरजा समजून घ्याव्या- तुमच्या अनुपस्थितीमध्ये किंवा तुम्ही काम करत नसाल अशा परिस्थितीमध्ये तुमच्या कुटुंबाला महिन्याला किती उत्पन्न लागते हे अगोदर जाणून घ्यावे. म्हणजे तुमच्या कुटुंबाचा महिन्याचा खर्च अगोदर समजून घ्यावा.

2- पॉलिसीचे प्रकार समजून घ्यावेत- यामध्ये काही पॉलिसी नियमितपणे महिन्याला उत्पन्न देतात तर काही मृत्यूवर एकरकमी रक्कम देतात. तुमच्या कुटुंबाची गरज पाहून योग्य पर्याय निवडावा.

3- विमा हप्ता म्हणजेच प्रीमियमची तुलना करावी- विम्याच्या प्रीमियमची रक्कम तुमचे वय तसेच आरोग्य आणि कव्हरेज यावर अवलंबून असते. त्यामुळे या सगळ्या गोष्टींचा विचार करून तुम्ही वेगवेगळ्या पॉलिसींच्या किमती पहाव्यात व तुम्हाला जी योग्य वाटेल ती योजना निवडावी.

4- इन्कम प्रोटेक्शन इन्शुरन्स हे तुमच्या आणि तुमच्या कुटुंबासाठी आर्थिक सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून महत्त्वाचे पाऊल ठरू शकते.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe