Kisan Credit Card: सोप्या पद्धतीने किसान क्रेडिट कार्ड मिळवा आणि कमी व्याजदरात 3 लाख कर्ज घ्या! वाचा अर्ज करण्याची पद्धत

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Kisan Credit Card:- शेतकऱ्यांना शेतीच्या विविध कामांकरिता पैशांची गरज भासते व पैसा वेळेवर उपलब्ध होणे खूप गरजेचे असते. शेती करत असताना शेतकऱ्यांना अनेक प्रकारच्या अडचणींना तोंड द्यावे लागते. यामध्ये सर्वात मोठी समस्या ही नैसर्गिक आपत्ती आणि बाजारभावातील घसरण या असतात.

दोन्ही समस्यांमुळे आर्थिक दृष्ट्या शेतकरी अडचणीत येतात. एखादा हंगाम नैसर्गिक आपत्तीमुळे वाया गेला तर पुढच्या हंगामासाठी शेतकऱ्यांना पैसा लागतोच. त्यामुळे शेतकऱ्यांना शेतीसाठी पैसा पेरणीच्या काळामध्ये वेळेवर उपलब्ध होणे खूप गरजेचे असते.

दृष्टिकोनातून अडचणीच्या काळात शेतकऱ्यांना पैशांची मदत व्हावी या दृष्टिकोनातून केंद्र आणि राज्य सरकारच्या माध्यमातून देखील अनेक योजना राबवण्यात येतात. त्यामुळे आर्थिक अडचण किंवा कर्जाच्या विळख्यात अडकलेल्या शेतकऱ्यांसाठी या योजनांचे महत्त्व अनन्यसाधारण आहे.

अशीच एक योजना म्हणजे किसान क्रेडिट कार्ड हे होय. शेतकऱ्यांना वेळेवर शेतीसाठी पैसा उपलब्ध करून देण्याच्या दृष्टिकोनातून किसान क्रेडिट कार्ड योजना ही खूप महत्त्वाची आहे. याकरता तुम्ही देखील किसान कार्ड करिता अर्ज करून शेती करिता पैसा उपलब्ध करू शकतात. त्यामुळे या लेखात आपण किसान क्रेडिट कार्ड बद्दलची महत्वाची माहिती घेऊ.

 किसान क्रेडिट कार्ड म्हणजे नेमके काय?

अगदी क्रेडिट कार्ड सारखे किसान क्रेडिट कार्ड असते व ते शेतकऱ्यांना कृषी उपकरणाच्या खरेदी पासून तर पिक उत्पादनासाठी व शेतीविषयी इतर आवश्यक खर्च करण्यासाठी पैसा उपलब्ध करून देते. आजकाल हा पैसा कर्ज स्वरूपात असतो मात्र वेळेवर शेतकऱ्यांना उपलब्ध होत असल्यामुळे शेतकऱ्यांच्या शेती विषयी गरजा पूर्ण केल्या जातात.

 किसान क्रेडिट कार्ड कसे बनवावे लागते?

1- तुम्हाला देखील किसान क्रेडिट कार्ड हवे असेल तर त्याकरिता तुम्हाला पीएम किसान योजनेचे अधिकृत संकेतस्थळ म्हणजेच pmkisan.gov.in वर जावे लागेल व त्या ठिकाणी किसान क्रेडिट कार्ड फॉर्म डाउनलोड करावा लागेल.

2- हा फॉर्म संपूर्णपणे भरल्यानंतर व त्यासाठी आवश्यक कागदपत्रे जोडल्यानंतर तो तुम्हाला जवळच्या बँकेमध्ये जमा करायचा आहे. तुम्ही पात्रता किंवा इतर गोष्टी पूर्ण करत असाल तर बँके कडून तुम्हाला किसान क्रेडिट कार्ड दिले जाते.

3-याव्यतिरिक्त तुम्ही किसान क्रेडिट कार्ड साठीचा फॉर्म तुमच्या जवळच्या बँकेतून देखील मिळवू शकतात.

 किसान क्रेडिट कार्डच्या अर्जासाठी लागतात ही कागदपत्रे

किसान क्रेडिट कार्ड करिता अर्ज करण्यासाठी अर्जदारांना त्याचे पॅन कार्ड, आधार कार्ड तसेच अर्जदाराचा पासपोर्ट आकाराचा फोटो, शपथ पत्र(यामध्ये तुम्ही कुठल्याही बँके कडून कर्ज घेतले नाही त्याबद्दलची माहिती असते.)

 किसान क्रेडिट कार्ड शेतकऱ्यांसाठी का आहे फायद्याचे?

किसान क्रेडिट कार्डच्या माध्यमातून शेतकऱ्यांना नऊ टक्के प्रति वर्ष व्याजदराने तीन लाख रुपयांपर्यंतचे कर्ज मिळते. परंतु सरकारच्या माध्यमातून व्याजावर दिलासा दिला जात असून यावर दोन टक्के अनुदान देखील मिळते. जर शेतकऱ्यांनी वेळेवर व्याज भरले तर त्याला सरकार स्वतंत्रपणे तीन टक्के सबसिडी देते. म्हणजे तुम्हाला या कर्जावर नऊ टक्के नव्हे तर एकूण चार टक्के एवढेच व्याज द्यावे लागते.

अशा पद्धतीने तुम्ही किसान क्रेडिट कार्डच्या माध्यमातून तुमच्या शेतीच्या आवश्यक आर्थिक गरजा भागवू शकतात.