LIC Policy:- पैसा कमावण्याला जितके महत्त्व आहे तितकेच त्या पैशांची बचत आणि चांगल्या ठिकाणी गुंतवणूक करणे या गोष्टीला खूप महत्त्व आहे. कारण तुम्ही पैसा कितीही कमावला. परंतु त्या पैशांची बचत करून योग्य ठिकाणी गुंतवणूक केली नाही तर तुमच्याकडे पैसा राहत नाही अशा परिस्थितीत तुमचा कितीही पैसा कमावलेला वाया जातो.
त्यामुळे भविष्यकालीन आर्थिक गरजांच्या दृष्टिकोनातून पैशांची बचत आणि गुंतवणूक खूप महत्त्वाची बाब आहे. त्यामुळे बाजारात उपलब्ध असलेल्या वेगवेगळ्या प्रकारच्या गुंतवणूक पर्यायांमध्ये गुंतवणूक करणे गरजेचे असते.
गुंतवणूक पर्याय निवडताना तुमची गुंतवणूक सुरक्षित राहील व परतावा चांगला मिळेल अशा गुंतवणूक योजनांमध्ये गुंतवणूक करणे हिताचे ठरते व अशाच ठिकाणी गुंतवणूकदार गुंतवणूक करत असतात. जर आपण उपलब्ध असलेल्या गुंतवणूक पर्यायांचा विचार केला तर यामध्ये एलआयसी हा एक उत्तम पर्याय असून एक विश्वासहार्य म्हणून देखील एलआयसी कडे पाहिले जाते.
एलआयसीच्या माध्यमातून अनेक आकर्षक योजना असून तुम्ही तुमच्या भविष्याच्या दृष्टिकोनातून एखाद्या चांगल्या योजनेमध्ये गुंतवणूक करून पैसेही सुरक्षित ठेवू शकता व चांगला परतावा देखील मिळवू शकतात.
याच अनुषंगाने आपण या लेखांमध्ये एलआयसीच्या ‘जीवन शांती’ त्या महत्त्वाच्या योजनेबद्दल माहिती घेणार आहोत. ही योजना गुंतवणुकीसाठी एक चांगला पर्याय ठरू शकते.
कसे आहे एलआयसीच्या जीवन शांती योजनेचे स्वरूप?
एलआयसीच्या जीवन शांती योजनेमध्ये तुम्हाला एकदा गुंतवणूक करता येऊ शकते व या माध्यमातून पेन्शनची सुविधा ताबडतोब मिळवणे शक्य आहे. एलआयसीच्या या योजनेचे सगळ्यात महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे या माध्यमातून तुम्हाला परतावा चांगला मिळतोच.
परंतु तुमची गुंतवणूक देखील सुरक्षित राहते. यासोबतच तुम्हाला विम्याचा देखील लाभ मिळतो. जर तुम्ही एलआयसीच्या या जीवन शांती योजनेमध्ये गुंतवणूक केली तर तुमचे आणि तुमच्या कुटुंबाचे आर्थिक दृष्टिकोनातून भविष्य अगदी सुरक्षित राहण्यास मदत होते.
या योजनेमध्ये तुम्ही किमान दीड लाख रुपये गुंतवू शकतात व गुंतवणुकीसाठीची कमाल मर्यादा नाही. ही एक सिंगल प्रीमियम योजना आहे. म्हणजेच या योजनेमध्ये तुम्हाला एकाच वेळी रक्कम भरून या योजनेचा फायदा घेता येतो व यानंतर एलआयसीच्या माध्यमातून तुम्हाला संपूर्ण आयुष्यभर एका ठराविक अंतराने नियमितपणे काही रक्कम दिली जाते.
ही रक्कम तुम्ही तुमच्या सोयीनुसार मासिक, त्रीमासिक, सहामाही आणि वार्षिक आधारावर घेऊ शकतात. यामध्ये जेव्हा तुम्ही एकरकमी पैसे भरतात तेव्हा निवडलेल्या पेमेंट कालावधीनुसार तुम्हाला लगेच पैसे मिळू शकतात.
जर तुम्ही मासिक पेमेंटचा पर्याय निवडला तर तुम्हाला पहिल्या महिन्यापासून पेमेंट मिळायला लागते. ज्या व्यक्तींना तरुण वयामध्ये गुंतवणूक करून त्यांचे म्हातारपण आर्थिकदृष्ट्या समृद्ध व सुरक्षित करायचे असेल तर हा पर्याय चांगला आहे. यामध्ये डिफर्ड एनयूटी असून त्यामध्ये तुम्ही सिंगल प्रीमियम भरून गुंतवणूक करू शकता व यामध्ये ठराविक वर्षांनी पेमेंट मिळवू शकतात.
या योजनेच्या माध्यमातून पेन्शनचा लाभ कसा मिळवाल?
या योजनेमध्ये तुम्ही गुंतवणूक केली तर पाच, दहा, पंधरा किंवा वीस वर्षानंतर तुम्हाला पेन्शन सुरू करता येऊ शकते.तसेच या व्यतिरिक्त तात्काळ देखील तुम्हाला पेन्शन सुविधेचा लाभ घेता येतो. जीवन शांती पॉलिसी घेण्यासाठी किमान वय तीस वर्षे असणे गरजेचे आहे.
कमीत कमी जीवन शांती योजनेमध्ये दीड लाख रुपयांची गुंतवणूक करणे आवश्यक आहे. पेन्शनच्या बाबतीत जर पाहिले तर आपण एका उदाहरणाने ते समजून घेऊ. समजा तुम्ही या योजनेत 15 लाख रुपये वीस वर्षासाठी गुंतवले व तुम्हाला प्रत्येक महिन्याला या माध्यमातून 26 हजार रुपये पर्यंत पेन्शन मिळते.
जर तुम्हाला ही पेन्शन वार्षिक स्वरूपात घ्यायची असेल तर ती तीन लाख 12 हजार रुपये तुम्हाला वर्षाला मिळतील. या लाभाशिवाय या योजनेत मृत्यू लाभ देखील समाविष्ट करण्यात आलेला आहे. म्हणजेच जर पॉलिसीधारकाचा मृत्यू झाला तर त्यानंतर त्याच्या कुटुंबाला किंवा नॉमिनीला इतर लाभांसह पेन्शन दिली जाते.