LIC Pension Scheme: एलआयसीच्या ‘या’ योजनेत एकदाच गुंतवणूक करा आणि प्रत्येक महिन्याला पेन्शन मिळवा! वाचा माहिती

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

LIC Pension Scheme:- भविष्यकालीन आर्थिक सुरक्षितता ही प्रत्येकाच्या जीवनासाठी खूप महत्त्वाची असून याकरिता आपण जो काही पैसा कमवतो त्याची योग्य ठिकाणी गुंतवणूक करणे गरजेचे असते. चांगल्या योजनांमध्ये गुंतवणूक केली तर आपल्या गुंतवणुकीतून मिळणारा परतावा देखील चांगला असतो व आपल्याला त्या माध्यमातून चांगला आर्थिक फायदा होतो.

जर आपण गुंतवणुकीच्या योजना पाहिल्या तर त्या अनेक योजना असून गुंतवणूकदार म्युच्युअल फंड एसआयपी तसेच शेअर मार्केट, विविध बँकांच्या मुदत ठेव योजना आणि एलआयसीच्या अनेक योजनांना प्राधान्य देतात. यामध्ये जर आपण एलआयसीचा विचार केला तर अनेक योजना या परताव्याच्या दृष्टिकोनातून खूप महत्त्वाच्या असून मोठ्या प्रमाणावर एलआयसीच्या योजनांना गुंतवणूकदारांकडून प्राधान्य देण्यात येते.

यामध्ये जर आपण एलआयसी ची सरल पेन्शन योजना पाहिली तर ही योजना खूप महत्वपूर्ण असून यामध्ये तुम्हाला एकदा गुंतवणूक करून प्रत्येक महिन्याला बारा हजार रुपये पेन्शन मिळू शकणार आहे. त्यामुळे या लेखात आपण एलआयसीच्या या सरल पेन्शन योजनेची माहिती घेऊ.

 कसे आहे एलआयसीच्या सरल पेन्शन योजनेचे स्वरूप?

सरकारी क्षेत्राशिवाय खाजगी क्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणावर कर्मचारी काम करतात व या कर्मचाऱ्यांकरिता देखील गुंतवणुकीच्या अनेक संधी उपलब्ध आहेत. याकरिता कर्मचारी एलआयसीचे सरल पेन्शन योजनेमध्ये गुंतवणूक करू शकतात व या योजनेमध्ये गुंतवणूक केली तर तुम्हाला दर महिन्याला बारा हजार रुपयांची पेन्शनचा लाभ मिळतो.

एलआयसीच्या सरल पेन्शन योजनेमध्ये तुम्हाला फक्त एकदाच पैसे भरणे गरजेचे असते व त्यानंतर मात्र तुम्ही दर महिन्याला बारा हजार रुपये पेन्शनचा लाभ मिळवू शकतात. समजा जर वयाच्या 60 व्या वर्षी तुम्ही या योजनेमध्ये दहा लाख रुपयांची गुंतवणूक केली तर वर्षाला तुम्हाला 58 हजार 950 रुपये या माध्यमातून मिळतात.

सरल पेन्शन योजनांमध्ये तुम्हाला जो काही परतावा मिळतो तो तुमच्या गुंतवणुक रकमेवर अवलंबून असतो. ही योजना तुम्ही ऑनलाईन आणि ऑफलाईन या दोन्ही स्वरूपामध्ये घेऊ शकतात. या योजनेमध्ये तुम्ही 12,000 रुपयांची गुंतवणूक करून सुरुवात करू शकतात व जास्तीत जास्त पैसे गुंतवणूकीवर यामध्ये कुठल्याही प्रकारची मर्यादा नाही.

साधारणपणे 40 ते 80 वयोगटातील लोकांसाठी ही योजना महत्त्वाची आहे. हे सिंगल पेमेंट पॉलिसी असून एका व्यक्तीसाठी ही पॉलिसी असते. तोपर्यंत पॉलिसीधारक जिवंत असतो तोपर्यंत या योजनेच्या माध्यमातून पेन्शनचा लाभ मिळत राहतो. या योजनेच्या माध्यमातून लाईफ अन्यूटी सह शंभर टक्के परतावा आणि परचेस प्राईस देखील मिळते.