LIC Plan : महिला आणि मुलींसाठी LICची खास योजना; जाणून घ्या कोणती?

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

LIC Plan : LIC ही भारतातील सर्वात मोठी विमा कंपनी आहे. LIC कडून सर्व प्रकारच्या ग्राहकांना एकपेक्षा एक योजना ऑफर केल्या जातात. ज्या तुमच्या भविष्यासाठी खूप उत्तम मानल्या जातात. अशातच LICने महिला आणि मुलींसाठी एक विशेष योजना आणली आहे. जी साध्य उत्तम ठरत आहे.

LIC च्या या योजनेत मॅच्युरिटीवर तुम्हाला मोठी रक्कम मिळते. जर कोणी महिलांसाठी सर्वोत्कृष्ट योजना शोधत असेल, तर हा तुमच्यासाठी चांगला पर्याय ठरू शकतो. या योजनेचे नाव म्हणजे LIC आधार शिला योजना. चला ही योजना कशी काम करते आणि याचे फायदे जाणून घेऊया.

दीर्घकालीन अधिक नफा

ही योजना खास महिलांसाठी तयार करण्यात आली आहे. LIC आधार शिला योजनेत गुंतवणूक करून दीर्घ मुदतीत चांगला नफा मिळवता येतो. ही एक नॉन-लिंक्ड, वैयक्तिक जीवन विमा योजना आहे. या प्लॅनमध्ये 8 वर्षांच्या मुलीपासून 55 वर्षांच्या महिलेच्या नावावर गुंतवणूक करता येते.

आर्थिक सुरक्षा कव्हरेज

एलआयसी आधार शिला योजनेत गुंतवणूक करणाऱ्या पॉलिसीधारकाचा मृत्यू झाल्यास त्याच्या कुटुंबाला आर्थिक मदत दिली जाते. पॉलिसीधारक जिवंत राहिल्यास मॅच्युरिटीवर एकरकमी रक्कम दिली जाते. गुंतवणूक करण्यापूर्वी वैद्यकीय प्रमाणपत्र द्यावे लागते. कारण त्यात फक्त निरोगी महिलाच गुंतवणूक करू शकतात.

विम्याची रक्कम किती आहे?

योजनेंतर्गत, किमान रु. ७५,००० आणि कमाल रु. ३,००,००० मूळ विम्याची रक्कम म्हणून उपलब्ध आहे. यामध्ये मासिक, त्रैमासिक, सहामाही आणि वार्षिक आधारावर प्रीमियम भरला जातो. योजनेतील मुदतपूर्तीसाठी पॉलिसीधारकाचे कमाल वय 70 निश्चित केले आहे. यामध्ये मॅच्युरिटीवर एकरकमी रक्कम दिली जाते.

एलआयसी आधार शिला योजनेसाठी पात्रता?

या योजनेत आठ ते ५५ वर्षे वयोगटातील कोणतीही महिला गुंतवणूक करू शकते. पॉलिसीची मुदत किमान 10 वर्षे आणि कमाल 20 वर्षे आहे.