Loan Foreclosure:- बँकेच्या माध्यमातून वेगवेगळ्या प्रकारचे कर्ज मिळण्याची प्रक्रिया आता सुलभ आणि सोपी झाल्यामुळे व्यक्ती अनेक वैयक्तिक गरजा पूर्ण करण्यासाठी, घर, कार खरेदी इत्यादी गोष्टी करिता बँकेकडून कर्ज घेतात. एवढेच नाहीतर शिक्षणासाठी देखील बँका कर्ज देत असतात. या घेतलेल्या कर्जाची परतफेड आपल्याला निश्चित केलेल्या हप्त्यांमध्ये परतफेड करायचे असते.
यामध्ये घेतलेली काही कर्जे अल्पमुदतीची असतात तर होमलोन सारखी कर्जे हे दीर्घ कालावधीचे असतात. होमलोन घेतले तर त्याचा कालावधी 15 ते 20 वर्षापर्यंत देखील असू शकतो व इतके दिवस त्या कर्जाची परतफेड हप्त्यांच्या स्वरूपामध्ये करावी लागते. बऱ्याचदा यामुळे आर्थिक ओढाताण देखील होते.
त्यामुळे होम लोन सारख्या कर्जाच्या बाबतीत बरेच कर्जदार हे कर्ज परतफेडीचा जो काही कालावधी असतो त्या कालावधी पूर्वी कर्जाची परतफेड करतात व मुदतीपूर्वीच कर्ज खाते बंद करता तो यालाच लोन फोरक्लोजर असे म्हणतात. परंतु या पद्धतीने कर्जाची परतफेड म्हणजेच लोन फोरक्लोजरसाठी बँकांचे काही नियम असतात व ते तुम्हाला माहिती असणे गरजेचे असते.
लोन फोरक्लोजर चार्ज कुणाला भरावे लागत नाहीत?
बऱ्याचदा अनेक व्यक्ती पर्सनल लोन, शैक्षणिक कर्ज, बिझनेस लोन, बाईक लोन आणि कार लोन घेतात. या प्रकारच्या कर्जामध्ये देखील लोन फोरक्लोजरचा पर्याय दिलेला असतो. परंतु यामध्ये प्रत्येकालाच फोरक्लोजर चार्जेस किंवा शुल्क भरावे लागत नाहीत. याबाबतीत रिझर्व बँक ऑफ इंडियाचा एक नियम आहे
व त्यानुसार बघितले तर तुम्ही जर कर्ज घेताना ते फ्लोटिंग व्याजदरावर घेतले असेल म्हणजेच आरबीआय कडून व्याजदरात जसा बदल होईल तसा बदल तुम्ही घेतलेल्या कर्जावरील व्याज दरात होत असतो.
अशा पद्धतीने जर तुम्ही फ्लोटिंग व्याज दरावर कर्ज घेतले असेल व त्याची तुम्हाला मुदतपूर्व परतफेड करायची असेल तर त्यावर तुम्हाला कुठल्याही प्रकारचा फोर क्लोजर शुल्क द्यावा लागत नाही. परंतु या उलट तुम्ही मुदतपूर्वी म्हणजे फिक्स व्याजदरावर कर्ज घेतलेले असेल व तुम्हाला ते मुदतीपुर्वी बंद करायचे असेल तर तुम्हाला फोरक्लोजर चार्ज आकारला जातो.
कर्ज मुदतीपूर्व परतफेड केल्यावर देखील बँका का आकारता शुल्क?
यामध्ये प्रत्येक बँकेचे फोर क्लोजर चार्जेस वेगवेगळ्या असतात. तर कर्जदाराने मुदतपूर्व कर्जाची परतफेड केली तर त्याच्यावरचा कर्जाचा बोजा कमी होतो. परंतु यात मात्र बँकांचे नुकसान होते. त्यामुळे बँक अशा पद्धतीने कर्ज मुदतपूर्व परतफेड केल्यावर फोरक्लोजर शुल्क आकरतात.
यामध्ये साधारणपणे तुमचे जी काही थकीत रक्कम असेल त्याच्या पाच टक्क्यांपर्यंत हा चार्जेस असू शकतो. जेव्हा तुम्ही कर्ज घेतात तेव्हा पूर्ण कराव्या लागणाऱ्या कागदपत्रांमध्ये याबद्दलची माहिती दिलेली असते व त्यामुळेच तुम्ही कर्ज घेण्याअगोदर फोर क्लोजर बद्दलची अटी किंवा माहिती तपासून घेणे गरजेचे आहे.