Loan On Pan Card: पॅन कार्डचा वापर करून मिळेल 50 हजार रुपये वैयक्तिक कर्ज! जाणून घ्या कसा करायला अर्ज? वाचा माहिती

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Loan On Pan Card:- जीवनामध्ये आपल्याला अचानकपणे पैशांची गरज भासते व अशावेळी आपल्याला हवा असलेला पैसा आपल्याकडे शिल्लक राहतोच असं नसते. त्यामुळे बरेच व्यक्ती बँक किंवा इतर वित्तीय संस्थांच्या माध्यमातून पर्सनल लोनचा पर्याय स्वीकारतात.

तसेच बँकांच्या माध्यमातून जर कर्ज घ्यायचे असेल तर बरीच कागदपत्रे व बँकांच्या नियम व अटींची पूर्तता करणे गरजेचे आहे व काही कालावधीनंतर आपल्याला अशा प्रकारचे बँकांच्या माध्यमातून कर्ज मिळत असते. परंतु तात्काळ कर्ज जर हवे असेल तर मात्र तुमच्याकरिता तात्काळ कर्ज कसे मिळते हे माहीत असणे खूप गरजेचे आहे.

आता बऱ्याच नॉन बँकिंग फायनान्स कंपनी अर्थात एनबीएफसीकडून व बँकेच्या माध्यमातून आधार कार्ड आणि पॅन कार्डचा वापर करून झटक्यात कर्ज मिळू शकते. त्यामध्ये तुम्हाला पॅन कार्डचा वापर करून देखील कर्ज घेता येते. याबद्दलचीच माहिती आपण या लेखात घेऊ.

 पॅन कार्डच्या माध्यमातून घेता येईल तुम्हाला पर्सनल लोन

समजा तुम्हाला वैयक्तिक अर्थात पर्सनल लोन हवे असेल तर तुम्ही ते पॅन कार्डच्या माध्यमातून देखील घेऊ शकतात. याकरता तुम्हाला पॅन कार्ड सोबतच काही महत्त्वाची कागदपत्रे देखील आवश्यक असतात. यामध्ये जर तुम्हाला वैयक्तिक कर्ज हवे असेल तर तुम्ही पॅन कार्ड च्या माध्यमातून पन्नास हजार रुपये पर्यंतचे कर्ज मिळवू शकतात.

पॅन कार्ड वरून कर्ज घेण्यासाठी सगळ्यात अगोदर म्हणजे तुमचा सिबिल स्कोर उत्तम असणे गरजेचे आहे व तरच तुम्हाला या माध्यमातून कर्ज मिळते. साधारणपणे कमीत कमी 700 क्रेडिट स्कोर असणे गरजेचे आहे  व त्यासोबतच तुमचा निश्चित असा उत्पन्नाचा स्त्रोत असणे देखील गरजेचे आहे.

जर आपण उत्पन्नाची किमान अट पाहिली तर ती वेगवेगळ्या बँकांची वेगवेगळी आहे. यामध्ये सामान्यपणे विचार केला तर कमीत कमी तुमचे महिन्याला उत्पन्न हे पंधरा हजार रुपये असणे गरजेचे आहे. तसेच वय हे 21 ते 58 वर्षांच्या दरम्यान असावे. अशा प्रकारच्या कर्जाकरता तुम्ही कोणत्याही एनबीएफसी किंवा बँकेच्या वेबसाईटच्या माध्यमातून ऑनलाईन अर्ज करू शकतात. किंवा संबंधित कंपनीच्या कार्यालयामध्ये किंवा बँकेत जाऊन तुम्ही या संबंधीचा फॉर्म सबमिट करून देखील अर्ज करू शकतात.

 या प्रकारच्या कर्जासाठी कोणती कागदपत्रे लागतील?

पॅन कार्डद्वारे जर तुम्हाला कर्ज घ्यायचे असेल तर त्याकरिता अर्ज करण्याकरिता तुमच्याकडे काही कागदपत्रे असणे गरजेचे आहे. यामध्ये पॅन कार्ड सोबत तुमच्याकडे आधार कार्ड असणे गरजेचे आहे. तसेच तुम्ही जर पगारदार कर्मचारी असेल तर तुमच्याकडे तुमच्या पगाराची पावती म्हणजेच सॅलरी स्लिप, पासपोर्ट साईज फोटो तसेच बँकेचा खाते क्रमांक आणि मोबाईल क्रमांक इत्यादी गोष्टी आवश्यक असतात.

अशा पद्धतीने तुम्ही पॅन कार्डच्या माध्यमातून पन्नास हजारापर्यंत वैयक्तिक कर्ज मिळवू शकतो.