LPG Cylinder : नवीन एलपीजी कनेक्शन महागले, आता तब्बल एवढे अतिरिक्त पैसे मोजावे लागणार

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

LPG : जर तुम्ही एलपीजी कनेक्शन (LPG connection) घेण्याचा विचार करत असाल तर तुम्हाला पूर्वीपेक्षा जास्त पैसे खर्च करावे लागतील. इकॉनॉमिक टाईम्सच्या बातमीनुसार, कंपन्यांनी आता १६ जूनपासून नवीन घरगुती एलपीजी कनेक्शनसाठी सिक्युरिटी डिपॉझिटमध्ये (security deposit) ७५० रुपयांची वाढ केली आहे.

नवीन किंमत 2,200 रुपये प्रति कनेक्शन आहे. यापूर्वी नवीन एलपीजी कनेक्शनसाठी १४५० रुपये मोजावे लागत होते.

नवीन कनेक्शन (New connection) घेताना तुम्ही दोन सिलिंडर खरेदी केल्यास तुम्हाला 4,400 रुपये डिपॉझिट भरावे लागेल. याचा अर्थ ग्राहकांना प्रत्येकी 14.2 किलो वजनाचे दोन सिलिंडर खरेदी करण्यासाठी १५०० रुपये अतिरिक्त शुल्क द्यावे लागेल.

एलपीजीच्या किमतींशिवाय रेग्युलेटरच्या किमतीही वाढल्या आहेत. रेग्युलेटर (Regulator) घेण्यासाठी ग्राहकांना २५० रुपये द्यावे लागतील, जे आधी १५० रुपये होते.

तर, ५ किलोच्या सिलिंडरसाठी, ग्राहकांना अनामत रक्कम म्हणून ८०० रुपयांऐवजी ११५० रुपये द्यावे लागतील. प्रत्येक नवीन कनेक्शनसोबत येणाऱ्या पाईप आणि पासबुकसाठी अनुक्रमे १५० रुपये आणि २५ रुपये भरावे लागतील.