बेरोजगारी ही भारतीय अर्थव्यवस्थेपुढील सगळ्यात मोठी ज्वलंत समस्या असून यामध्ये दरवर्षी वाढ होताना दिसून येत आहे. कारण दरवर्षी कॉलेज आणि विद्यापीठांमधून पदव्या घेऊन बाहेर निघणाऱ्यांची संख्या आणि त्या मनाने उपलब्ध होणाऱ्या नोकऱ्या या खूपच कमी असल्याने साहजिकच बेरोजगार तरुण-तरुणींची संख्या प्रचंड प्रमाणात वाढत आहे.
याकरिता या समस्येवर उपाय एकच आहे तो म्हणजे नोकरी नाही म्हणजे व्यवसायांकडे वळणे हा होय. याच्यात पण एक समस्या असते ती म्हणजे पैसा. तुम्हाला कुठल्याही प्रकारचा व्यवसाय सुरू करायचा असेल तर त्याकरिता पैसा हा लागणारच त्यामुळे देखील व्यवसाय करण्याची इच्छा असून देखील अनेक तरुण तरुणी यांना व्यवसायाकडे येता येत नाही.
त्यामुळे सरकारच्या माध्यमातून सुशिक्षित बेरोजगार व गरजू व्यक्तींना व्यवसायाकरिता पैसा उपलब्ध व्हावा याकरिता अनेक योजना राबवल्या जातात. यातील जर आपण महाराष्ट्र सरकारची वसंतराव नाईक कर्ज योजना पाहिली तर ही एक महत्त्वाची कर्ज योजना असून या माध्यमातून व्यवसायाकरिता एक लाख रुपयांपर्यंत बिनव्याजी कर्ज मिळते. जवळपास हे कर्ज 40 प्रकारच्या व्यवसायांसाठी उपलब्ध करून देण्यात आलेले आहे. याचीच माहिती या लेखात घेऊ.
या 40 व्यवसायांना मिळते एक लाख रुपयांपर्यंत बिनव्याजी कर्ज
पावर टिलर, मत्स्यव्यवसाय, कृषी क्लिनिक, पेंट शॉप, हार्डवेअर शॉप, सायबर कॅफे,संगणक प्रशिक्षण,झेरॉक्स, स्टेशनरी, सलून व्यवसाय, ब्युटी पार्लर, मसाला उद्योग, पापड उद्योग, मिरची मसाला कांडप उद्योग, वडापाव विक्री केंद्र, भाजी विक्री केंद्र, चहा स्टॉल, सॉफ्ट टॉईज विक्री केंद्र, डीटीपी वर्क, स्वीट मार्ट,
ड्राय क्लीनिंग सेंटर, हॉटेल, टायपिंग इन्स्टिट्यूट, ऑटो रिपेरिंग वर्कशॉप, मोबाईल रिपेरिंग, गॅरेज, फ्रिज रिपेरिंग, एसी रिपेरिंग, चिकन आणि मटन शॉप, इलेक्ट्रिक शॉप, आईस्क्रीम पार्लर, मासळी विक्री, भाजीपाला आणि फळ विक्री, किराणा दुकान, टेलिफोन बूथ आणि आठवडे बाजारामध्ये छोटेसे दुकान इत्यादी करिता हे एक लाख रुपयांपर्यंत कर्ज उपलब्ध करून दिले जाते.
वसंतराव नाईक कर्ज योजनेसाठी आवश्यक कागदपत्रे
आधार कार्ड लिंक असलेले बँक खात्याचा तपशील, उत्पन्नाचा दाखला( अर्जदाराच्या एकत्रित कौटुंबिक वार्षिक उत्पन्न एक लाखापेक्षा जास्त नसावे.), रहिवासी दाखला, आधार कार्ड, रेशन कार्ड, पासपोर्ट साईज फोटो, जातीचा दाखला आणि शपथ पत्र इत्यादी कागदपत्रे लागतात.
या योजनेत कोणाला प्राधान्य दिले जाते?
वसंतराव नाईक कर्ज योजनेअंतर्गत शासनाच्या कौशल्य विकास विभागाच्या माध्यमातून व शासकीय तसेच निमशासकीय संस्थांच्या मधून तांत्रिक प्रशिक्षण घेतलेले अनुभवी तरुण मुले व मुली यांना या कर्ज योजनेअंतर्गत कर्जाकरिता प्राधान्य देण्यात येईल व त्यासोबत निराधार आणि विधवा महिलांना ताबडतोब प्राधान्य देण्यात येते.
कर्ज कसे दिले जाते व त्याचे हप्ते कसे असतात?
या कर्ज योजनेत योग्य लाभार्थ्याची निवड व मंजूर प्रकरणात आवश्यक कागदपत्रांची पूर्तता केल्यानंतर कर्ज वितरण केले जाते. कर्ज वितरण करताना प्रामुख्याने…
1- मिळणाऱ्या एक लाखापैकी पहिला हप्ता 75 हजार रुपये इतका दिला जातो.
2- दुसरा हप्ता हा पंचवीस हजार रुपये प्रत्यक्ष व्यवसाय सुरू झाल्यानंतर साधारणपणे तीन महिने पूर्ण झाले की जिल्हा व्यवस्थापकांच्या तपासणी अभिप्रायानुसार मिळतो.
या योजनेअंतर्गत एक लाख रुपयांपर्यंतच्या व्यवसाय प्रकल्पाकरिता महामंडळाच्या माध्यमातून शंभर टक्के म्हणजे एक लाख रुपये कर्ज सुविधा मिळते. जे कर्जदार नियमित कर्ज परतफेड करतील अशा लाभार्थ्यांना कुठल्याही पद्धतीचे व्याज यावर आकारण्यात येत नाही.
कर्ज परतफेड ही नियमित 48 समान मासिक हप्त्यांमध्ये मुद्दल 2085 रुपये प्रत्येक महिन्याला परतफेड करावी लागते. परंतु जे कर्जदार नियमितपणे कर्जाची परतफेड करणार नाहीत त्यांना जेवढे कर्जाची रक्कम थकबाकी होतील त्या रकमेवर वार्षिक चार टक्के इतके व्याज आकारण्यात येते.
वसंतराव नाईक वैयक्तिक/ गट कर्ज व्याज परतावा योजनेच्या अटी
1- त्यामध्ये अर्जदाराचे वय किमान 18 ते कमाल 55 वर्ष असावे.
2- अर्जदाराने आधार कार्ड लिंक असलेले बँक खात्याचा तपशील सादर करावा.
3- या योजनेअंतर्गत एका वेळी कुटुंबातील एका व्यक्तीला लाभ घेता येतो.
4- अर्जदाराने महामंडळाच्या म्हणजेच केंद्र व राज्य सरकारच्या महामंडळाच्या कोणत्या योजनेचा तो थकबाकीदार नसावा.
5- अर्जदाराचे एकत्रित कौटुंबिक वार्षिक उत्पन्न एक लाख रुपयापेक्षा जास्त नसावे.
6- तसेच अर्जदार हा महाराष्ट्राचा रहिवासी असणे गरजेचे आहे व तो हे विमुक्त जाती/ भटक्या जमाती/ विशेष मागास प्रवर्गातील असेल तर प्राधान्य दिले जाते.
महत्त्वाचे
एकदा कर्ज दिल्यानंतर त्याची परतफेड ही वितरण झाल्याच्या 90 दिवसानंतर सुरू होते.