Milk Business: घ्या ‘या’ यंत्रांची मदत आणि दूध व्यवसाय करा फायदेशीर! मिळेल लाखोत नफा

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Milk Business:- अनेक शेतकरी शेतीला जोडधंदा म्हणून मोठ्या प्रमाणावर पशुपालन व्यवसाय करतात. पशुपालन व्यवसायामध्ये प्रामुख्याने दुधाचे उत्पादन हा प्रमुख आर्थिक उत्पन्नाचा स्त्रोत असतो. परंतु आपल्याला माहित आहे की दुधाच्या उत्पादनातूनच नव्हे तर दुधापासून अनेक पदार्थ तयार करून देखील आपण त्यांची विक्री करून लाखोत नफा मिळवू शकतो.

दुधापासून अनेक प्रकारचे दुग्धजन्य पदार्थ तयार करता येतात व त्या पदार्थांची व्यवस्थित पॅकिंग करून तुम्ही त्याची विक्री करू शकतात व तुमचा दूध व्यवसाय म्हणजे डेरी उद्योग मोठ्या प्रमाणावर वाढवू शकतात. जर तुम्हाला दुधापासून काही दुग्धजन्य पदार्थ  तयार करायचे असतील तर तुम्हाला त्याकरिता काही मशिनरीज म्हणजे यंत्राची आवश्यकता भासेल.

या व्यवसायाच्या वाढीसाठी तुम्ही चार प्रकारची जरी महत्त्वाची यंत्र घेतली तरी तुम्ही दुधापासून वेगवेगळ्या प्रकारच्या प्रक्रिया करू शकता व या पदार्थांच्या विक्रीतून तुमचा दूध व्यवसाय मोठ्या प्रमाणावर वाढवून लाखो रुपये मिळवू शकतात. त्यामुळे कुठली यंत्रे दूध व्यवसायासाठी तुम्हाला जास्तीचा नफा मिळवून देऊ शकतात त्यांची माहिती घेऊ.

 या चार यंत्रांचा वापर दूध व्यवसायातून मिळवून देईल तुम्हाला चांगला नफा

1- दूध प्रक्रिया यंत्र दूध प्रक्रिया यंत्र हे एक महत्वपूर्ण असे यंत्र असून या यंत्राचा वापर करून तुम्ही दूध, चीज तसेच तूप, मलई इत्यादी विविध उत्पादने तयार करू शकतात. या यंत्राच्या मदतीने तुम्ही दर्जेदार दुधापासून बनवलेले पदार्थ तयार करून ते विक्री करू शकतात.

समजा तुमचे बजेट जर कमीत कमी असेल तर तुम्ही एखादे लहान यंत्र घेऊन देखील सुरुवात करू शकतात. जरी या यंत्रांच्या किमतीचा विचार केला तर एका तासाला 80 लिटर दुधावर प्रक्रिया करण्याची क्षमता असलेले जर छोटे यंत्र खरेदी केले तर तुम्हाला फक्त 40 ते 50 हजार रुपये खर्च करावे लागतात.

2-मिल्क कुलर मशीन हे यंत्र देखील दूध प्रक्रिया उद्योगांमध्ये खूप महत्त्वाचे असून याचा वापर करून तुम्ही दूध थंड करू शकता या थंड केलेल्या दुधाचा वापर साठवणुकीसाठी करता येतो.

त्यासोबतच दुधाचा ताजेपणा टिकून ठेवण्यास आणि त्याचे लाईफ वाढवण्यामध्ये देखील याची खूप मोठ्या प्रमाणावर मदत होते. समजा तुम्हाला 250 लिटर ते दहा हजार लिटर दूध थंड करण्याची क्षमता असलेले मशीन खरेदी करायचे असेल तर तुम्हाला 70 ते 80 हजार रुपयांचा खर्च यासाठी करावा लागतो.

3- बॉटलिंग मशीन समजा तुम्हाला बाटली किंवा पॅकेटमध्ये दूध पॅकिंग करून विक्री करायचे असेल तर तुम्ही किरकोळ वितरणाकरिता दुधाच्या बाटल्या पॅकिंग आणि सीलबंद करून विकणे गरजेचे आहे व यासाठी तुम्हाला पॅकेजिंग आणि सील करण्यासाठी बाटलीबंद मशीन म्हणजेच बॉटलिंग मशीन ची आवश्यकता भासते.

आज आपण बाजारामध्ये जे वेगवेगळ्या ब्रँडचे दूध पाहतो. त्यातील बरेचसे दूध अशा मशीनच्या माध्यमातून पॅकिंग किंवा तयार केलेले असते. बॉटलिंग मशीन हे थोडे महाग असते व त्याची किंमत एक ते दोन लाख रुपये असते.

4- दही बनवण्याचे यंत्र आजकाल दुधासोबतच त्यापासून बनवलेल्या पदार्थांना देखील मोठी मागणी असून दुधापासून आपण दही तसेच इतर महत्त्वाचे पदार्थ बनवून ते विकू शकतो. यामध्ये जर तुम्हाला दही बनवून विक्री करण्याचे प्लॅनिंग असेल तर तुम्ही दही बनवण्याची मशीन खरेदी करू शकतात.

इंडिया मार्टच्या माध्यमातून तुम्हाला आकार आणि क्षमतेनुसार वेगवेगळ्या किमतींचे मशीन मिळतात. तुमचा बजेट कमी असेल तर तुम्ही लहानातले लहान मशीन विकून देखील हा व्यवसाय सुरू करू शकतात. दही बनवण्याचे यंत्र हे तुम्हाला 30 हजारापासून ते एक लाख रुपये पर्यंतच्या दरम्यान मिळते.