Money Astrology:- पैसा हे जीवनातील साध्य नसून जीवन जगण्याचे साधन आहे असे म्हटले जाते व साधनच जर मनुष्याकडे नसेल तर माणूस जीवन कसे जगेल? हा देखील एक मोठा प्रश्न निर्माण होतो. त्यामुळे आपल्याकडे असलेल्या पैशांची योग्य पद्धतीने काळजी घेणे व पै पै जोडून त्याच्यात वाढ करणे खूप गरजेचे असते. जेव्हा व्यक्ती सकाळी उठतो तेव्हापासून तर अगदी रात्री झोपी जाण्यापर्यंत अनेक गोष्टींसाठी पैसा लागतोच आणि तो जर तुमच्याकडे नसेल तर मात्र जीवन जगणे कठीण होते.
तुमच्याकडे असलेल्या पैशाची योग्य काळजी घेणे व त्याचा गैरवापर टाळणे खूप गरजेचे आहे. पैशांचा अनावश्यक ठिकाणी वापर केला तर मात्र तुम्हाला रस्त्यावर येण्यापासून कोणीच वाचवू शकणार नाही हे तितकेच खरे आहे. याबाबत जर आपण ज्योतिषशास्त्राच्या दृष्टिकोनातून बघितले तर ज्योतिषशास्त्रामध्ये देखील संपत्तीचा संबंध हा ग्रह आणि नक्षत्रांच्या प्रभावाशी जोडलेला असून ज्योतिष शास्त्रानुसार पैशांचा गैरवापर करणारे लोक ग्रहांच्या नकारात्मक प्रभावाचे शिकार होतात
व अशा व्यक्तींच्या पाठीमागे नेहमी दारिद्र्य लागल्याचे आपल्याला दिसून येते. याबाबत पैशांचा गैरवापर माणसाला कशाप्रकारे रस्त्यावर आणून ठेवू शकतो किंवा कोणत्या सवयी माणसाला उद्ध्वस्त करू शकतात? याचा अभ्यास करणे देखील तितकेच गरजेचे आहे. जेणेकरून आपण अशाच सवयींपासून मुक्त होऊन पैसा वाचवू शकतो व समृद्ध आयुष्य जगू शकतो.
पैशांच्या बाबतीतल्या या सवयी आयुष्य करतात उध्वस्त
1- अनावश्यक खर्च करण्याची सवय– बऱ्याच जणांकडे जेव्हा थोडाफार पैसा येतो किंवा अचानकपणे काही मार्गाने पैसा येतो तेव्हा इतरांना दाखवण्याकरिता कोणत्याही महागड्या वस्तू खरेदी करण्याची अनेक जणांना सवय असते. अशाप्रकारे पैशांचा वापर करणे म्हणजे हा पैशांचा गैरवापरच आहे. आपल्या इन्कम पेक्षा जर आपण जास्त खर्च करत असाल तर कर्ज हळूहळू वाढत जाते व अशा पद्धतीने व्यक्ती कर्जाच्या ट्रॅपमध्ये अडकतो व कंगाल होतो.
2- कमावलेल्या पैशांचा गैरवापर– बरेच व्यक्ती त्यांनी कमावलेले पैसे जुगार किंवा इतर अनावश्यक गोष्टींच्या आहारी जाऊन खर्च करतात. अशाप्रकारे पैसा खर्च करण्याची सवय जर असेल तर व्यक्तीची आर्थिक परिस्थिती बिघडते. तसेच बरेच जण काही ठिकाणी कुठलीही माहिती न घेता गुंतवणूक करतात
व त्या ठिकाणी पैसे अडकवतात व खूप मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान करून घेतात. बऱ्याच जणांना पैशांच्या लालसेपोटी सट्टा किंवा जुगार खेळण्याची सवय असते व अशा सवयींमुळे व्यक्ती दारिद्र्याच्या खाईत ढककलला जातो.
3- दुसऱ्या व्यक्तींवर अवलंबून राहणे– काही जणांना नेहमी पैशांच्या बाबतीत किंवा इतर गोष्टींसाठी दुसऱ्या व्यक्तींकडून अपेक्षा असते. काही गरजा पूर्ण करण्यासाठी दुसऱ्या व्यक्तींवर अवलंबून राहणे ही बाब तुम्हाला आर्थिक दृष्ट्या व मानसिक दृष्ट्या देखील कमकुवत बनवते पैसे कमवण्यासाठी कुठलेही काम न करण्याची सवय जळू शकते. त्यामुळे अशा पद्धतीने कुठलेही काम न करणे किंवा पैसा असेल तर तो वाया घालवणे इत्यादी सवयी संपत्ती नष्ट करण्याला कारणीभूत ठरतात.
4- नकारात्मक विचार करणे– बरेच व्यक्ती कुठल्याही गोष्टीत कायम निगेटिव्ह म्हणजेच नकारात्मक विचार करत असतात. अशा व्यक्तींना स्वतःची जी काही क्षमता आहे त्यावर विश्वास नसतो व त्यामुळे संधी मिळून देखील ते संधीचे सोने करत नाहीत.
यामुळे पैसे कमावण्याची संधी मिळून देखील पैसे कमवता येत नाहीत. स्वतः काहीही न करता इतरांची संपत्ती पाहून जळफळाट होणे इत्यादी अवगुण असलेली व्यक्ती स्वतःच आयुष्य उध्वस्त करत असतात.
5- पैशांचे महत्व न कळणे– बऱ्याच लोकांकडे पैसा असतो. परंतु त्या पैशाचे महत्त्व त्यांना नसते. कोणत्याही ठिकाणी पैसा खर्च करत असतात व अशा लोकांवर लक्ष्मीची अवकृपा होण्याची शक्यता असते व असे लोक दारिद्री व्हायला वेळ लागत नाही. त्यामुळे पैशांचा गैरवापर करणे किंवा पैसा वाया घालवणे यामुळे स्वतः आर्थिक संकट निर्माण करून घेण्यात येते व आयुष्य जगणे कठीण होऊन बसते.