Multibagger Share : 1.50 रुपयांच्या ‘या’ शेअरने बनवले करोडपती, पहा कोणता आहे शेअर?

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Multibagger Share : प्रत्येक गुंतवणूकदाराला शेअर बाजारात गुंतवणूक करून कमी वेळात जास्त पैसे कमवायचे असतात, पण याचा फायदा दीर्घकालीन गुंतवणूकदारला जास्त होतो, शेअर्स अनेकदा दीर्घकाळात जबरदस्त परतावा देतात. अशातच इंडो काउंट- होम टेक्सटाईल (Indo Count textile) शेअर्सनी आपल्या गुंतवणूकदारांना दीर्घकालीन समृद्ध केले आहे आणि ते आणखी वाढण्याची अपेक्षा आहे. हा मल्टीबॅगर शेअर 11 वर्षांपूर्वी 1.50 रुपयांपेक्षा कमी किमतीत उपलब्ध होता आणि आज तो शेअर 250 रुपयांच्या जवळ पोहोचला आहे.

या शेअर्समध्‍ये सलग 3 ट्रेडिंग दिवसांत झपाट्याने वाढ झाली आहे आणि 1 वर्षातील उच्चांक गाठला आहे. त्याच वेळी, हा स्टॉक गेल्या 5 महिन्यांत 147 टक्क्यांनी वाढला आहे. यामध्ये आणखी काही गती येणे बाकी असून गुंतवणूकदारांनी इच्छा केल्यास नफा कमावता येईल, असे बाजारातील तज्ज्ञांचे मत आहे. देशांतर्गत ब्रोकरेज फर्म आयसीआयसीआय सिक्युरिटीजने म्हटले आहे की, हा स्टॉक सध्याच्या पातळीपासून 19 टक्क्यांनी वाढण्याची अपेक्षा आहे.

आज बीएसईवर कंपनीचे शेअर्स 2.64 टक्क्यांच्या वाढीसह 248.80 रुपयांवर बंद झाले. त्याच वेळी, NSE वरील शेअर्स 246.65 च्या पातळीवर पोहोचले आहेत. ब्रोकरेजने 295 रुपयांचे लक्ष्य ठेवून खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. कंपनीचा विश्वास आहे की, कंपनीचे शेअर्स सध्या खूप मजबूत स्थितीत आहेत.

17 ऑगस्ट 2012 रोजी हा शेअर 1.49 रुपये होता. आज तो 248 च्या पुढे गेला आहे. या दरम्यान, स्टॉकने 16,598 टक्के परतावा दिला आहे. जर एखाद्याने या शेअरमध्ये 60,000 रुपये सुद्धा गुंतवले असते आणि आपली गुंतवणूक कायम ठेवली असती तर तो आज करोडपती झाला असता.

त्याच वर्षी, हा स्टॉक मार्चमध्ये 101 रुपयांच्या पातळीवरून 147 टक्क्यांनी वाढून 6 महिन्यांत 248 रुपयांची पातळी ओलांडला आहे. म्हणजेच या शेअरने केवळ दीर्घ मुदतीतच नाही तर अल्पावधीतही जबरदस्त परतावा दिला आहे. कंपनीच्या व्यवसायाबद्दल सांगायचे तर, ती चादर, गादी-रजाई आणि उशा तयार करते.