National Pension Scheme : निवृत्तीनंतर पैशांचे नो टेंशन…! येथे गुंतवणूक करून महिन्याला मिळवा 50 हजार रुपयांपर्यंत पेन्शन !

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

National Pension Scheme : भविष्याच्या दृष्टीने सर्वजण गुंतवणूक करण्यावर भर देत आहेत. म्हतारपणाचे आयुष्य अगदी आरामात जावे म्हणून प्रत्येक जण चांगल्या पेन्शन योजनेत गुंतवणूक करत आहेत. अशातच सरकारद्वारे देखील उत्तम पेन्शन योजना चालवल्या जातात, त्यातीलच एक म्हणजे नॅशनल पेन्शन सिस्टीम.

नॅशनल पेन्शन सिस्टीम ही सरकारी योजना आहे. त्याच्या मदतीने, महिना पगार मिळवणारे लोक त्यांचे निवृत्तीचे नियोजन सहज करू शकतात. या योजनेचा फायदा असा आहे की वयाच्या 18 व्या वर्षापासून ही योजना सुरू करता येते. यामुळे तुमचे पैसे वाढण्यास अधिक वेळ मिळतो आणि तुम्ही निवृत्तीसाठी तुम्ही मोठा निधी जमा करू शकता.

नॅशनल पेन्शन सिस्टमद्वारे सेवानिवृत्तीचे नियोजन कोण करू शकतो?

NPS केंद्र सरकारने 1 जानेवारी 2004 रोजी सुरू केले होते. सुरुवातीला हे फक्त सरकारी कर्मचाऱ्यांसाठी होते, पण नंतर ते सर्वसामान्यांसाठी खुले करण्यात आले. यानंतर देशातील प्रत्येक व्यक्ती निवृत्तीसाठी या योजनेत गुंतवणूक करू शकतो.

NPS कसे काम करते?

NPS ही दीर्घकालीन योजना आहे. ते PFRDA द्वारे चालवले जाते. 18 ते 70 वर्षे वयोगटातील कोणतीही व्यक्ती यामध्ये गुंतवणूक करू शकते. वयाच्या ६० वर्षांनंतर एनपीएसमध्ये जमा केलेल्या रकमेपैकी ६० टक्के रक्कम काढता येते. उर्वरित ४० टक्के रक्कम अ‍ॅन्युइटीमध्ये गुंतवावी लागेल. हा पैसा पेन्शन देण्यासाठी वापरला जातो. विशेषतः NPS मध्ये 9 ते 12 टक्के दराने परतावा मिळतो.

कर लाभ

त्याच वेळी, NPS मध्ये आयकराच्या कलम 80C अंतर्गत 1.5 लाख रुपयांपर्यंत सूट आणि कलम 80 CCD1B अंतर्गत 50 हजार रुपयांपर्यंतचे फायदे आहेत. त्याची खास गोष्ट म्हणजे यामध्ये मिळणारी रक्कम करमुक्त आहे.

50 हजारापर्यंत पेन्शन मिळवू शकता

NPS कॅल्क्युलेटरनुसार, जर 25 वर्षांच्या व्यक्तीने 60 वर्षांपर्यंत दरमहा 6,531 रुपये दिले तर 60 वर्षांनंतर अंदाजे 50 हजार रुपये पेन्शन मिळेल. यावेळी 27,43,020 रुपये गुंतवेल आणि 2,50,02,476 रुपये जमा केले जातील. यामध्ये 2,22,59,456 रुपये नफा मिळेल.