New FD Interest Rate Of Indusind Bank:- मुदत ठेव म्हणजेच एफडी हा एक गुंतवणुकीचा सर्वात लोकप्रिय आणि विश्वासार्ह पर्याय म्हणून ओळखला जातो. गुंतवणुकीची सुरक्षितता आणि चांगला परतावा मिळण्याच्या दृष्टिकोनातून देशातील मोठ्या प्रमाणावर गुंतवणूकदार विविध बँकांच्या मुदत ठेव योजनांना प्राधान्य देतात व मोठ्या प्रमाणावर एफडी करतात.
भारतातील जवळपास सर्वच बँकांमध्ये एफडी करता येते व यामध्ये प्रत्येक बँकेचे व्याजदर हे वेगवेगळे असतात. व्याजदरांमध्ये पडणारा फरक जर बघितला तर तो किती कालावधीसाठी एफडी केली आहे? यानुसार देखील वेगवेगळा असतो व सामान्य नागरिक व ज्येष्ठ नागरिक यांच्यामध्ये देखील व्याजदरात फरक पडत असतो.
अगदी याच अनुषंगाने जर बघितले तर तुम्हाला जर एफडी करायची असेल व जास्त व्याज मिळवायचे असेल तर सध्या इंडसइंड बँक हा तुमच्यासाठी उत्तम पर्याय ठरू शकतो. कारण या बँकेने नुकतेच मुदत ठेवींवरील व्याजदरात वाढ केलेली आहे
व आता ही वाढ केल्यानंतर एफडी केल्यावर 3.50% ते 7.99 टक्क्यांपर्यंत व ज्येष्ठ नागरिकांना चार टक्क्यांपासून ते 8.49 टक्क्यांपर्यंत वार्षिक व्याज मिळणार आहे. हे व्याजदरातील बदल तीन कोटी रुपयांपेक्षा कमी एफडीवर करण्यात आलेले असून 26 नोव्हेंबर पासून एफडी वरील हे नवीन व्याजदर बँकेने लागू केलेले आहेत.
वाचा इंडसइंड बँकेत एफडी केल्यावर मिळणारे नवीन व्याजदर
1- सात ते 30 दिवसांच्या एफडीवर- सामान्य नागरिकांना 3.50% तर वरिष्ठ नागरिकांना चार टक्के
2- 31 दिवस ते 45 दिवस- सामान्य नागरिकांना 3.75% तर वरिष्ठ नागरिकांना 4.25%
3- 46 दिवस ते 120 दिवस- सामान्य नागरिकांना 4.75% तर वरिष्ठ नागरिकांना 5.25%
4- 121 दिवस ते 180 दिवस- सामान्य नागरिकांना पाच टक्के ते वरिष्ठ नागरिकांना 5.50%
5- 181 दिवस ते 210 दिवस- सामान्य नागरिकांना 5.85% तर ज्येष्ठ नागरिकांना 6.35%
6- 211 ते 269 दिवस- सामान्य नागरिकांना 6.10% तर ज्येष्ठ नागरिकांना 6.60%
7- 270 ते 354 दिवस– सामान्य नागरिकांना 6.35% तर ज्येष्ठ नागरिकांना 6.85%
8- 355 ते 364 दिवस- सामान्य नागरिकांना 6.50% तर ज्येष्ठ नागरिकांना सात टक्के
9- एक वर्ष ते एक वर्ष पाच महिन्यांपर्यंत- सामान्य नागरिकांना 7.75 टक्के तर ज्येष्ठ नागरिकांना 8.25%
10- एक वर्ष पाच महिने ते एक वर्ष सहा महिन्यापेक्षा कमी- सामान्य नागरिकांना 7.99% तर ज्येष्ठ नागरिकांना 8.49%
11- एक वर्ष सहा महिने ते दोन वर्ष- सामान्य नागरिकांना 7.75 टक्के तर ज्येष्ठ नागरिकांना 8.25 टक्के
12- दोन वर्ष ते 61 महिन्यांपेक्षा कमी- सामान्य नागरिकांना 7.25% तर ज्येष्ठ नागरिकांना 7.75%
13- 61 महिने आणि त्यापेक्षा जास्त- सामान्य नागरिकांना सात टक्के तर ज्येष्ठ नागरिकांना 7.50%
14- पाच वर्ष कालावधी- सामान्य नागरिकांना 7.25% तर जेष्ठ नागरिकांना 7.75 टक्के